Wednesday, 7 October 2020

चाणक्य व चंद्रगुप्त मौर्य



मुख्य लेख: चंद्रगुप्त मौर्य


मौर्य साम्राज्याची स्थापना साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याने चाणक्य या तक्षशिला येथील त्याच्या शिक्षकाच्या मदतीने केली. आख्यायिकांनुसार, चाणक्य मगध प्रांतात गेला. मगधामध्ये नंद घराण्यातील धनानंद हा जुलमी राजा राज्य करीत होता. त्याने चाणक्याला अपमानित केले. सूड घेण्याच्या निर्धाराने चाणक्याने ही जुलमी सत्ता मोडून काढण्याची प्रतिज्ञा केली.दरम्यान, अलेक्झांडर या ग्रीक सम्राटाने बियास नदी ओलांडून भारतावर स्वारी केली होती. अलेक्झांडर बॅबिलोनला परत गेला तिथेच त्याचा इ.स.पू ३२३ साली मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या साम्राज्यात फूट पडली व त्याच्या क्षत्रपांनी (प्रांतशासक) आपापली अनेक वेगवेगळी विखुरलेली राज्ये तयार केली.


ग्रीक सेनापती युडेमस व पिथोन यांनी इ.स.पू. ३१६ पर्यंत राज्य केले. नंतर चंद्रगुप्ताने चाणक्याच्या मदतीने (जो त्याचा आता सल्लागार होता) त्यांना पराभूत केले. मगधातील सत्तेच्या जोरावर त्याने एक मोठे साम्राज्य तयार केले.

No comments:

Post a Comment