● लोकसभा
- 17 वी लोकसभा निवडणूक नुकतीच संपन्न झाली.
- 4 जून 2014 (पहिले अधिवेशन) ते 3 जून 2019 हा 16 व्या लोकसभेचा कालावधी होता.
● सदस्य
- अधिकतम सदस्य संख्या 552 आहे. यामध्ये 530 सदस्य राज्याचे, 20 सदस्य केंद्रशासित प्रदेशाचे तर 2 सदस्य ऑंग्लो इंडियन (राष्ट्रपती नियुक्त) नेतृत्व करतात. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- 2019 मध्ये ऑंग्लो इंडियनच्या लोकसभेतील नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.
- सध्या सदस्य संख्या 545 आहे, यामध्ये 543 सदस्य राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाचे नेतृत्व करतात तर दोन सदस्य राष्ट्रपती नियुक्त आहेत.
- सर्वात शेवटी 1971 च्या जनगणनेनुसार 1977 मध्ये लोकसभेची सदस्य संख्या वाढवण्यात आली होती. आता 2026 नंतर ही संख्या वाढवण्यात येईल.
● संसद भवन
- राजधानी दिल्लीच्या मध्यवर्ती ठिकाणी 6 एकर परीसरात ही ऐतिहासिक वास्तू उभी आहे.
- 244 खांब आणि तीन मजल्यांची ही इमारत लोकशाहीचं प्रतिक आहे.
- लवकरच नवी संसद बांधली जाणार आहे.
● सेंट्रल हाॅल
- संसद भवनातील महत्त्वाची जागा.
- संसदेच्या दोन्ही गृहातील संयुक्त बैठकीला राष्ट्रपती येथेच संबोधित करतात.
- संविधान सभेच्या बैठका याच हाॅलमध्ये पार पडल्या होत्या. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- स्वातंत्र्यानंतर गव्हर्नर जनरलने भारताची सत्ता पंतप्रधानांकडे येथेच सोपवली होती.
- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचे पहिले भाषण "Tryst with Destiny" येथेच झाले होते.
- नव्याने निवडूण आलेल्या लोकसभा सदस्यांना शपथ घेण्याअगोदर आणि घेतल्यानंतर जवळपास 40 प्रकारचे अर्ज सादर करावे लागतात.
- संसद कार्यप्रणालीची माहिती देणारे साहित्य आणि एक पेन ड्राईव्ह प्रथमच यावेळी सदस्यांना देण्यात आला आहे. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- स्नेहलता श्रीवास्तव (लोकसभा महासचिव)
- सुमित्रा महाजन (16 वी लोकसभा सभापती)
- ओम बिर्ला (17 वी लोकसभा सभापती)
No comments:
Post a Comment