Thursday, 29 October 2020

भारतीय टपाल सेवा आणि अमेरिकेची टपाल सेवा यांचा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने माहितीच्या आदान-प्रदानासाठी करार.



🔰27 ऑक्टोबर 2020 रोजी भारत सरकारची टपाल सेवा (इंडिया पोस्ट) आणि अमेरिकेची टपाल सेवा (USPS) यांच्यादरम्यान टपालांच्या वाहतूकीविषयी सीमाशुल्कविषयक (कस्टम) माहितीचे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आदान-प्रदान करण्यासाठी करार झाला.


🔴ठळक बाबी ...


🔰करारानुसार, आंतरराष्ट्रीय टपाल प्रत्यक्षात येण्यापूर्वी आणि त्याची इलेक्ट्रॉनिक माहिती एकमेकांसोबत सामायिक केली जाणार आहे. त्यामुळे टपाल गंतव्य देशामध्ये येण्याआधीच त्यासंबंधित सीमाशुल्कविषयक प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होणार आहे.


🔰करारामुळे दुसऱ्या देशातून प्रत्यक्ष टपाल आल्यानंतर सीमाशुल्कविषयक प्रक्रिया पूर्ण करण्याचा वेळ वाचणार आहे. विकसनशील देशांमध्ये जागतिक टपाल वितरण कार्यपद्धतीनुसार टपालाने येणाऱ्या वस्तूंची आधी सूचना विशिष्ट नियमांच्या अधीन राहून दिली जाते.

करारामुळे आंतरराष्ट्रीय टपाल सेवेमध्ये विश्वसनीयता, स्पष्टता आणि सुरक्षितता निर्माण होवून कार्यपद्धतीमध्ये सुधारणा होवू शकणार आहे.

पार्श्वभूमी


🔰भारताच्या दृष्टीने अमेरिका हे निर्यातीसाठी सर्वात अव्वल स्थान आहे. टपाल सेवेच्या माध्यमातून भारतातून अमेरिकेला वस्तू पाठविण्याचे प्रमाण जास्त आहे. 2019 साली जवळपास 30 टक्के पत्रे आणि वस्तूंची लहान पाकिटे अमेरिकेला पाठविण्यात आली होती. तसेच बाहेरच्या देशातून येणाऱ्या पाकिटांपैकी एकट्या अमेरिकेतून जवळपास 60 टक्के पाकिटे भारतामध्ये आली होती.


🔰आता नवीन सहकार्य करारानुसार, टपालाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निर्यात करणे सोईचे ठरणार आहे. त्यामध्ये भारतातून रत्ने व आभूषणे, औषधे आणि इतर स्थानिक उत्पादने अमेरिकेमध्ये पाठविणे सोईचे ठरणार आहे. करारामुळे लहान आणि मोठ्या निर्यातदारांना टपाल सेवेच्या  माध्यमातून ‘निर्यात सुलभता’ प्रदान करण्याचे उद्दिष्ट पूर्ण होवू शकणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...