Sunday, 30 July 2023

ज्वालामुखी


पृथ्वीच्या पृष्ठभागी जमिनीला भेग अथवा नळीसारखे भोक पडून त्याद्वारे जमिनीखालच्या खोलवर भागातील तप्त शिलारस (मॅग्मा) बाहेर येऊन पृष्ठभागावर वाहणे, तसेच स्फोटक वायुलोट आणि राखेसदृश्य असे खडकांचे लहानमोठे कण बाहेर फेकले जाणे, या क्रियेला ज्वालामुखी क्रिया म्हणतात.


 सर्वसामान्य ज्वालामुखी क्रियेत मध्यवर्ती नळीच्या वाटे तप्त शिलारस बाहेर येऊन नळीभोवती लाव्हा आणि राख यांची रास साचते व शंकूच्या आकाराचा उंचवटा तयार होत जातो, त्याला ज्वालामुखी हे नाव देतात.


ज्वालामुखी हे जळणारे पर्वत आहेत असा पूर्वी समज होता. ज्वालामुखीतून बाहेर उफाळणारे तप्त वायूचे लोट, धुरासारखे दिसणारे खडकांच्या सूक्ष्म कणांचे फवारे आणि उसळून सांडणारा तप्त शिलारस या सर्वांवरून ही एक पेटलेली निसर्गाची भट्टी आहे, असे वाटणे साहजिक होते. त्यामुळेच ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या खडकांच्या लहानमोठ्या कणांनाही ‘राख’, ‘अंगार’ (निखारे) अशीच नावे दिली गेली आहेत. पण भौतिक किंवा रासायनिक दृष्ट्या ज्वाला ‘ज्वलन’ म्हणता येईल अशी कोणतीही क्रिया ज्वालामुखी क्रियेत घडून येत नसते. क्वचित बाहेर पडणाऱ्या वायूंपैकी गंधकाची वाफ किंवा हायड्रोजन यांचे ज्वलन होते, पण ते एकूण क्रियेच्या मानाने अगदी नगण्य असते.


जमिनीवर येण्यापूर्वी भूपृष्ठाखाली काही खोलीवर असणाऱ्या तप्त द्रवाला शिलारस म्हणतात. शिलारस म्हणजे केवळ खडक वितळून तयार होणारा रस नव्हे. त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अनेक वायू विरघळलेल्या अवस्थेत असतात. काही कारणाने या शिलारसावर असलेल्या खडकात भेगेसारखे दुर्बल प्रतल किंवा मार्ग सापडला की, दाबाखाली असणारा असा शिलारस पृष्ठभागाकडे येऊ लागतो.


 तो जसजसा पृष्ठभागाकडे घुसत जातो तसतसा वरच्या खडकांचा भार कमी होऊन शिलारसातील वायूंचा दाब वाढू लागतो. शेवटी सोडावॉटरच्या बाटलीचे बूच उडावे तसा वरचा टोपण खडक उडवून देऊन शिलारस उसळून जमिनीवर सांडतो.


शिलारस पृष्ठभागावर आला की, त्यात विरघळलेले बहुतेक वायू कमी-अधिक स्फोटकपणे किंवा शांतपणे बाहेर पडू लागतात. ज्या शिलारसातून बहुतेक वायू निघून गेले आहेत अशा द्रवाला लाव्हा म्हणतात.


मध्यवर्ती निर्गम द्वाराभोवती लाव्हा व राख यांची रास साचून तयार झालेल्या शंकूच्या आकाराच्या डोंगराचे तोंड ज्वालामुखी उद्रेकातील स्फोटाने उडून गेल्यामुळे किंवा खालचा शिलारस निघून जाऊन खाली पोकळी झाल्यामुळे बाजूच्या कडांचा आधार जाऊन त्या आत कोसळल्याने शंकूच्या माथ्याशी बशीसारखा खोलगट भाग तयार होतो, त्याला ‘कुंड’ म्हणतात. 


अशाप्रकारे सर्वसामान्य केंद्रीय उद्रेकात शंकू-कुंड रचनेचे ज्वालामुखी तयार होतात. काही उद्रेकांत मध्यवर्ती नळीच्या ऐवजी जमिनीत अरुंद व लांब भेग पडून तीतून लाव्हा बाहेर पडून आसपासच्या प्रदेशात थरांच्या रूपाने पसरतो. 


ही क्रिया बराच काळ चालू राहून आसपासच्या प्रदेशातील लहान मोठ्या दऱ्या भरून जातात व लाव्हा थरांचा पठारी प्रदेश निर्माण होतो. अशा ज्वालामुखी क्रियेला ‘भेगी उद्रेक’ म्हणतात.


केंद्रीय उद्रेकात लाव्हा नेहमीच मधल्या नळीतून बाहेर न येता कित्येकदा वर येताना खालच्या पातळीवरच बाजूने एखाद्या आडव्या भेगेतून तो बाहेर येऊन मुख्य शंकूच्या उताराच्या बाजूवर उपद्वारातून त्याचा उद्रेक होतो व तेथे उपशंकू तयार होतो.

 इटलीतील एटना या ज्वालामुखीच्या बाजूवर अशी २०० हून अधिक उपद्वारे व उपशंकू तयार झालेली आहेत.


ज्वालामुखीनिर्मितीची कारणे :


 ज्वालामुखी क्रियेचे सर्वांत प्रमुख अंग म्हणजे निर्गम द्वारातून तप्त शिलारस व वायू बाहेर पडणे हे असते. पूर्वी एकेकाळी असा समज होता की, पृथ्वीच्या पृष्ठभागी असणाऱ्या घन कवचाखाली सर्व जागी द्रव स्थितीतील शिलारस भरलेला असावा आणि वेळोवेळी ज्वालामुखींच्या वाटेने तो जमिनीवर येत असावा. 


परंतु भूकंपीय तरंगांच्या अभ्यासातून मिळालेल्या पृथ्वीच्या अंतरंगासंबंधीच्या माहितीवरून असे सिद्ध झाले आहे की, पृथ्वीचा बाहेरचा किमान २,९०० किमी. जाडीचा भाग पूर्णतया घन स्थितीत असला पाहिजे. म्हणजेच कवचाच्या खाली कोठेही मोठ्या प्रमाणात कायम स्वरूपाचा शिलारसाचा साठा असणे शक्य नाही. 


मात्र स्थानिक क्षेत्रात लहान कोठ्यांच्या (कप्प्यांच्या) स्वरूपात वेळोवेळी शिलारसाची निर्मिती होत असावी आणि असा तयार झालेला शिलारस कवचाच्या उथळ भागात येऊन त्याच्यापासून अंतर्वेशी अग्निज खडकांच्या राशी तयार होत असाव्यात, तसेच काही भाग ज्वालामुखी क्रियेने भूपृष्ठावर येत असावा अशी कल्पना आहे [⟶ अग्निज खडक].


शिलारस नेमका कोणत्या जागी, किती खोलीवर, केव्हा आणि कसा निर्माण होतो यांचे पुरेसे ज्ञान अद्याप झालेले नाही. भूपृष्ठीय परिस्थितीत सर्वसामान्य अग्निज खडकांचा वितळबिंदू १,०००° ते १,५००° से. असतो. भूपृष्ठापासून जसजसे खोल जावे तसतसे दर ३२ मी. खोलीला १° से.या प्रमाणात तापमान वाढत जाते. खोलीनुसार तापमान वाढण्याचे हे प्रमाण असेच राहिले, तर सु. ३० किमी. खोलीवर खडक वितळण्याइतके तापमान वाढलेले असेल.


 परंतु खोलीनुसार वरच्या खडकांच्या वजनामुळे दाबही वाढत जातो आणि वाढत्या दाबाप्रमाणे खडक वितळण्याचा बिंदूही वाढतो. त्यामुळे ३२ किमी. खोलीवर खडक वितळण्याइतके तापमान असूनही वाढत्या दाबामुळे तेथील खडक न वितळता घन राहतात.


 जर अशा जागी काही कारणाने खडकांवरील दाब तात्पुरता कमी झाला किंवा तापमानात बरीच वाढ झाली, तर तेवढ्या क्षेत्रातील खडक वितळून त्यांचा शिलारस होणे शक्य आहे.

ज्वालामुखी उद्रेकांचे प्रकार:

 ज्वालामुखीच्या उद्रेकांचे भेगी आणि केंद्रीय असे दोन ठळक प्रकार पडतात. भेगी उद्रेकात पृष्ठभागी पडलेल्या लांब भेगांतून अत्यंत तरल आणि सुवाही बेसाल्ट लाव्ह्याचे पूर पृष्ठावरून वाहत जाऊन जमिनीला समांतर थरात पसरतात. या प्रकारच्या उद्रेकाचे उत्तम उदाहरण आइसलँडमधील १७८३ सालचा उद्रेक होय. त्यावरून अशा उद्रेकांना आइसलँडी उद्रेक म्हणतात.

केंद्रीय उद्रेकामध्ये एखाद्या नळीसारख्या मध्यवर्ती निर्गम द्वारातून लाव्हा व अग्निदलिक पदार्थ बाहेर पडून ते द्वाराभोवती साचतात. लाव्ह्याचे रासायनिक संघटन व तापमान, विशेषतः लाव्ह्यात असणाऱ्या वायूंचे प्रमाण व दाब यांनुसार केंद्रीय उद्रेकाचे अनेक प्रकार होतात. त्यांतील महत्त्वाच्या प्रकारांचे वर्णन येथे दिले आहे.

1. हवाई प्रकार :
 यामध्ये मध्यवर्ती निर्गम द्वारातून अत्यंत सुवाही अशा लाव्ह्याचे निस्सारण होत असते. लाव्ह्यातील वायू शांतपणे बाहेर पडतात. क्वचित प्रसंगी कुंडात असलेल्या लाव्ह्याच्या पृष्ठावरून वेगाने बाहेर पडणाऱ्या वायूंच्या धक्क्यामुळे तप्त लाव्ह्याचे फवारे उडतात व ते वाऱ्याच्या झोतात सापडून लाव्ह्याच्या थेंबांचे तारेसारखे लांब काचतंतू तयार होतात. त्यांना ‘पेली’ या पॉलिनेशियन अग्निदेवतेवरून ‘पेलीचे केस’ असे म्हणतात. 
हवाई प्रकारच्या उद्रेकांमुळे विस्तिर्ण आकारमानाचे ढाल ज्वालामुखी तयार होतात.

हवाई उद्रेकाचा एक दुय्यम प्रकार लाव्हा तलाव हा आहे. ढाल ज्वालामुखीच्या कटाहात अत्यंत तप्त व तरल लाव्हा असतो. तलावाच्या मध्यातून वर येणारा तप्त लाव्हा चोहोबाजूंना काठाकडे वाहत जातो आणि काठाशी पुन्हा आत बुडून हे अभिसरणाचे चक्र चालू राहते. अशा प्रकारे काठाबाहेर लाव्हा न सांडता कटाहात दीर्घकाल एखाद्या तलावाप्रमाणे द्रव लाव्हा राहतो. 

कीलाउआ ज्वालामुखीतील हालेमाऊ माऊ नावाच्या कुंडामध्ये १८२३ पासून १९२४ पर्यंतच्या काळात असा लाव्हा तलाव तयार झालेला होता.

2. स्ट्राँबोली प्रकार :
 लाव्ह्याचा दाटपणा जसजसा वाढत जातो आणि त्याचा सुवाहीपणा कमी होतो, तसतसा लाव्ह्यातील वायू बाहेर पडण्यास होणारा अडथळा वाढत जातो व उद्रेकाचे स्वरूप अधिकाधिक स्फोटक होत जाते. हवाई लाव्ह्यापेक्षा काहीसा कमी सुवाही लाव्हा कुंडात उघडा पडला म्हणजे त्याच्या पृष्ठभागावरील थर घट्ट होतो आणि त्याच्याखाली अडकून पडलेले वायू साचत राहून मधून मधून धक्क्याने सौम्य स्फोटांच्या रूपाने निसटत राहतात. 

हे स्फोट ठराविक कालावधीने, तालबद्धतेने किंवा सातत्याने होत असतात. स्फोटामुळे लाव्ह्याचे लहान मोठे थेंब व गोळे हवेत फेकले जाऊन त्यांचे बाँब, लॅपिली, अंगार इ. पदार्थ होतात. अधिक जोराच्या स्फोटात तप्त लाव्ह्याचे कारंजे वर उडून त्याचा प्रकाशमान फवारा दिसतो. 
सिसिली बेटाच्या उत्तरेस असलेल्या लिपारी समूहातील ज्वालामुखींपैकी स्टाँबोली या ज्वालामुखीत अशी क्रिया दिसत असल्यामुळे या प्रकाराला त्याचे नाव मिळाले आहे. मॅक्सिकोतील पारीकूटीन हा ज्वालामुखीही स्ट्राँबोली प्रकारचा होता.

3. व्हल्कॅनी प्रकार : 
लिपारी समूहातील व्हल्कॅनो नावाच्या ज्वालामुखीवरून हे नाव दिले आहे. या प्रकांरातील लाव्हा बराच दाट असून कुंडात तो थिजून त्याचा घट्ट खडक होतो. थिजलेल्या कवचाखाली असलेल्या लाव्ह्यात बराच काळ वायू साचत राहून अखेर त्याचा दाब इतका वाढतो की, वरच्या कवचाच्या ठिकऱ्या उडवून फार मोठ्या प्रमाणात स्फोटक उद्रेक होतो. घनीभूत लाव्ह्याच्या कवचाचे लहान मोठे तुकडे आणि वायू यांचा प्रचंड लोट आकाशात खूपच उंच उसळून त्याचा फूलकोबीसारखा माथ्याशी विस्तारणारा ढग बनतो. हा ढग काळा दिसतो. 

दीर्घकाल निद्रिस्त असलेल्या ज्वालामुखीतून जेव्हा पुन्हा नव्याने उद्रेकाची सुरुवात होते तेव्हाचा उद्रेक व्हल्कॅनी प्रकाराने होतो. या उद्रेकाने नळीच्या तोंडाशी असलेला अडथळा उडवून देऊन नळी मोकळी करण्याचे कार्य होते.
4. व्हीस्यूव्हिअसी प्रकार : 

हा व्हल्कॅनी प्रकाराचाच पण अधिक उग्र स्फोटक आविष्कार आहे. दीर्घकालापर्यंत बाह्यतः निद्रिस्त असलेल्या ज्वालामुखीत नळीच्या खाली असणाऱ्या शिलारसातील वायूंचे प्रमाण व दाब वाढत वाढत इतके वाढते की, शेवटी नळीचे तोंड उडवले जाऊन अत्यंत उग्र स्फोटक रीत्या खालचा तप्त शिलारस बाहेर भिरकावला जातो.

 शिलारसावरील दाब एकदम कमी झाल्यामुळे त्यातील वायू मुक्त होऊन शिलारसाचे रूपांतर फेसाळ लोटात होते. हा लोट आकाशात खूप उंचीपर्यंत चढून त्याचा माथा विस्तारतो. फुलकोबीसारख्या आकाराचा हा विस्तारणाचा ढग तळपत्या शिलारसाच्या सूक्ष्म थेंबांमुळे प्रकाशमान झालेला असतो.

 व्हीस्यूव्हिअस ज्वालामुखीच्या १९०६ सालच्या स्फोटक उद्रेकात वायूचा स्तंभ १० किमी. उंचीपर्यंत उसळला होता व सतत २० तासांपर्यंत वायूचा लोट बाहेर येत होता.या वायूच्या लोटामुळे ४५० मी. व्यासाचे नळीसारखे भोक पोखरले गेले.

5. प्लिनी प्रकार :
 हा व्हीस्यूव्हिअसी प्रकाराचा पण अत्यंत उग्र स्वरूपाचा स्फोटक उद्रेक आहे. या प्रकारात वर उसळणारा वायूचा लोट कित्येक किमी. उंच चढून विस्तारतो, त्यामुळे आसपासच्या विस्तृत प्रदेशात राखेचा वर्षाव होतो. 
व्हीस्यूव्हिअसच्या इ. स. ७९ सालच्या उग्र स्फोटक उद्रेकाचे वर्णन धाकटे प्लिनी यांनी लिहून ठेवले आहे, त्यावरून हे नाव दिले आहे. या उद्रेकात पाँपेई व हर्क्यूलॅनियम ही दोन मोठी शहरे नष्ट झाली व याच उद्रेकाचे जवळून निरीक्षण करण्याच्या प्रयत्नात थोरले प्लिनी (धाकट्या प्लिनींचे चुलते) यांचा अंत झाला.

6.पेली प्रकार : 
या उद्रेकात लाव्ह्याचा दाटपणा आणि वायूंची स्फोटकता यांची परमावधी होते. नळीच्या वरच्या भागात थिजून घट्ट झालेल्या लाव्ह्याचे टोपण इतके जाड झालेले असते की, खालच्या बाजूस लाव्ह्यात साचत असलेल्या वायूला ते उडवून देणे अशक्य होते.

 वरच्या बाजूने सुटकेचा मार्ग न उरल्याने वायूने भारलेला शिलारस नळीच्या बाजूला भेग पाडून तेथून बाहेर वाट काढतो व उतारावरून तप्त शिलारसाचे लोढें खाली वाहू लागतात. शिलारस बाहेर पडताच त्यातील वायू मुक्त होऊन त्याचा फेसाळ प्रवाह बनतो. 
या प्रवाहाच्या खालच्या बाजूने बाहेर पडणाऱ्या वायूंचा वंगणासारखा उपयोग होऊन घर्षणरहित झालेल्या उतारावरून शिलारसाचे अतितप्त फेसाळ लोंढे प्रचंड वेगाने खाली धाव घेतात. 

क्वचित प्रसंगी त्यांचा वेग ताशी १६० किमी.पर्यंत जातो. उतारावरून वेगाने धाव घेणारे हे लोंढे काळे वा तळपते (प्रकाशमान) असतात. त्यांना ‘न्ये आर्दांत’ असे फ्रेंच नाव आहे. मार्टिनिक बेटावरील माँ पले या ज्वालामुखीचा १९०२ मध्ये अशा प्रकारचा उद्रेक होऊन त्यात पायथ्याचे ३० हजार वस्तीचे सेंट पिअरे हे शहर काही क्षणांत बेचिराख झाले.

ज्वालामुखी क्रियेचे परिणाम :

 ज्वालामुखींच्या उद्रेकाने माणसांचे अतोनात नुकसान होते. राखेने व वायूने पिके नष्ट होतात. वेली व झाडे करपतात. क्वचित संपूर्ण शहरेही लाव्हा रसाने व राखेने बुडून जातात. 
असे असूनही ज्वालामुखी उद्रेकाची टांगती तलवार डोक्यावर बाळगून अशा प्रदेशात माणूस वस्ती करण्यास का उद्युक्त होतो, याचे आश्चर्य ज्वालामुखी प्रदेशापासून दूर राहणाऱ्यांना नेहमीच वाटत आलेले आहे. 
पण ज्वालामुखीचे कार्य केवळ विध्वंसक असते असे नव्हे, तर भूवैज्ञानिक दृष्ट्या ज्वालामुखी क्रियेमुळे भूकवचाच्या खडकात नवीन भर पडत असल्यामुळे हे कार्य रचनात्मक समजले जाते. 

चक्री वादळे, भूकंप , प्रचंड पूर इ. नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान ज्वालामुखी उद्रेकाने होणाऱ्या नुकसानीपेक्षा कितीतरी जास्त असते. इ.स. ७९ ची पाँपेईवर किंवा १९०२ मध्ये सेंट पिअरेवर कोसळलेली आपत्ती ही विरळा घडणारी घटना आहे.

 महायुद्धामुळे किंवा प्रतिवर्षी रस्त्यांवर होणाऱ्या मोटार वाहनांच्या अपघातांमुळे होणाऱ्या मानवी हत्येची  बरोबरी ज्वालामुखी करू शकत नाहीत. ज्वालामुखी उद्रेकाच्या धोक्याबरोबरच ज्वालामुखी प्रदेशातील सुपीक जमिनीचे आकर्षण माणसाला असते. लाव्ह्याचे अपक्षयजन्य (वातावरणीय प्रक्रियांनी तयार झालेले) पदार्थ वनस्पतींना आवश्यक अशा पोषक द्रव्यांनी परिपूर्ण  असतात.

ज्वालामुखीचे प्रकार:

ज्वालामुखींचे वर्गीकरण त्यांच्या  विस्फोटक स्थितीनुसार आणि पृष्ठभागावर विकसित केलेल्या लेयरच्या आधारे  केले जाते.

1.शील्ड ज्वालामुखी

लाव्हा दूरपर्यंत वाहतो म्हणून शिल्ड ज्वालामुखी जगातील सर्वात मोठे ज्वालामुखी आहेत. 
 ते मोठ्या उंचीवर तसेच जास्त अंतरावर आढळतात. 
शिल्ड volcano कमी उतार असलेले आणि जवळजवळ पूर्णतः गोठलेले लावापासून बनलेले आहेत. हे ज्वालामुखी बहुतेक बेसाल्टपासून बनलेले असतात, एक प्रकारचा लावा जो उकळतो तेव्हा अतिशय द्रव असतो.

 ते सर्वसाधारणपणे कमी स्फोटक असतात, परंतु जर पाणी उकळत असेल तर ते विस्फोटक बनू शकतात. येणारा नविन लाव्हा फव्वाराच्या स्वरूपात येतो आणि वरच्या शंकूकार दिशेने उत्सर्जित होतो.

2.सिंडर कोन ज्वालामुखी

हे अतिवृद्ध इग्निअस खडक आणि आकारात लहान असतात. हे स्कोरिया म्हणूनही ओळखले जाते. 
त्यात लहानलहान, दाणेदार सिंडर्स आणि जवळजवळ लावा नसलेली ओलकॅनो असतात. त्यांच्याकडे वरच्या बाजूला एक लहान क्रेटर असते आणि खूप जास्त  बाजूचा उतार असतो.
3. संयुक्त(composite) ज्वालामुखी

संयुक्त ज्वालामुखी मध्यम आकाराच्या बाजूचा आकारात असतात.कधीकधी, त्यांच्या शिखरांमध्ये त्यांच्याकडे लहान craters आहेत.

त्यांना स्ट्रेटो असेही म्हणतात कारण त्यामध्ये वाळूच्या थरांच्या मिश्रित घनदाट लावा प्रवाहांचे स्तर असतात. बेसाल्टापेक्षा थंड आणि अधिक ऍक्टिव्ह लावाच्या विस्फोटाने संयुक्त ज्वालामुखींचे वर्णन केले जाते. हे ज्वालामुखी बहुतेकदा  विस्फोट होऊन तयार होतात.

 पायरोक्लास्टिक पदार्थ आणि राख मोठ्या प्रमाणावर लावासह ग्राउंडमध्ये त्यांचा मार्ग शोधतात. ही सामग्री व्हेंट ओपनिंगच्या परिसरात जमा होते आणि लेयरची निर्मिती करते आणि त्यामुळे त्याला संयुक्त ज्वालामुखी पर्वत म्हणून ओळखतात.

4.कॅल्डेरा

पृथ्वीवरील ज्वालामुखीचे सर्वात मोठे स्फोटक कॅल्डेरा आहे. ते सामान्यतः इतके विस्फोटक असतात की जेव्हा ते उडतात तेव्हा ते कोणत्याही उंच संरचनेऐवजी स्वत: वर पडतात.

त्यांचे स्फोट हे दर्शवितात की त्याचा मेग्मा चेंबर मोठा आणि जवळच्याच भागामध्ये दिसून येतो.  कॅल्डेरा इतका वेगळा असतो की मोठ्या प्रमाणावरील विस्फोट झाल्यानंतर  मोठा उद्रेक होऊन लाव्हा बाहेर पडतो आणि क्रेटर एक लहान, जास्त वाळूचा ज्वालामुखीय खोलगट भाग असतो जो फवाऱ्यावाटे बाहेर पडतो.

ज्वालामुखीय लँडफॉर्म

ज्वालामुखीय विस्फोटक द्रव्यातुन सोडल्या जाणार्या लाव्हाचे रुपांतर अग्निज खडकात होते. 
लाव्हा थंड होण्याच्या स्थानावरून अग्निज खडकांना वर्गीकृत केले आहे:

ज्वालामुखीय अग्निजन्य खडक- यांना extruisve अग्निज खडक म्हणून देखील ओळखले जातात. रॉक कूलिंग पृथ्वीच्या पृष्ठभागावर होते. उदा. बेसाल्ट, अँथ्रेसाईट इ.

प्लुटोनिक अग्निजन्य खडक - या खडकांना Intrusive अग्निज खडक म्हणून देखील ओळखले जाते. खडकाचे शीतकरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर नसून क्रस्टमध्ये होते.
 उदा. ग्रॅनाइट, गॅबरो, डायओराइट इत्यादी. प्लुटोनिक अग्निज खडक त्यांच्या स्वरुपात खालील प्रकारांमध्ये विभागली जातात.

बाथोलिथ: मोठ्या डोमच्या आकाराच्या स्वरूपात खोल भागात असून चुंबकीय पदार्थांचे एक मोठे स्थान आहे. हे ग्रॅनिटिक भाग आहे.

लॅकोलिथ्स: मोठ्या डोमच्या आकारात intrusive भागाचा पातळी खाली आणि पाईप सारखी  असते. पृथ्वीच्या खाली ,संयुक्त ज्वालामुखी सारखी संरचना आहे.

लापोलिथ: ते आकारात saucer(उथळ बशी) आकाराचे आहेत, आकाशाकडे concave आहेत.

फॅकोलिथ्स: नागमोडी वळणात  पदार्थांचे  स्त्रोत  खाली निश्चित करण्यासाठी एक विशिष्ट नळीच्या आकाराचे आहे.

शीट: ते  आग्निज खडकांच्या क्षितिज समांतर भागाजवळ आहेत. पातळ स्तराना शीट म्हटले जाते आणि जाड आडव्या डिपॉझिटला सिल्स असे म्हणतात.

डाईक्स: जेव्हा लाव्हा क्रॅकमधून बाहेर येतात तेव्हा ते ग्राउंडला जवळजवळ लंबरुप बनवतात आणि डाईक्स नावाच्या संरचनेसारख्या उभ्या भेगामध्ये बनतात.

ज्वालामुखींचे वितरण

जगभरातील ज्वालामुखींचे वितरण खाली दिल्याप्रमाणे तीन बेल्टमध्ये आढळतात:

सर्कम पॅसिफिक बेल्ट

मिड-वर्ल्ड माउंटन बेल्ट

आफ्रिकन रिफ्ट व्हॅली बेल्ट

ज्वालामुखी तीव्र फोल्डिंग आणि फौल्टिंगच्या प्रदेशांशी संबंधित आहेत. ते किनार्यावरील पर्वत, बेटांवर आणि महासागराच्या मध्यभागी असतात. महाद्वीपमधील आंतरिक भाग ज्वालामुखी पासूनसामान्यतः मुक्त असतात. 

बहुतेक सक्रिय ज्वालामुखी प्रशांत(पॅसिफिक) महासागरिय प्रदेशात आढळतात.



No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...