वलाटी
कोकण किनारपट्टीचा सह्याद्री पर्वताकडील पायथ्यालगतच्या भागाला वलाटी असे म्हणतात. उंची सरासरी 200 ते 300 मीटर असते, उतार तीव्र स्वरूपाचा आहे. डोंगराळ भाग, वेगाने वाहणाऱ्या नद्या, दऱ्याखोऱ्यांचा भाग हे या भागाचे वैशिष्ट्य सांगता येईल.
खलाटी:-
पश्चिमेकडील अरबी समुद्र लगतच्या सखल भागास खलाटी असे म्हणतात. या भागाची उंची 5 ते 15 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक असते. उतार सौम्य आहे. या भागात लहान मैदाने, खाड्या, वाळूचे दांडे, खाजणे, चौपाटी तसेच समुद्रलाटांनी तयार केलेली भूरूपे आढळतात.
No comments:
Post a Comment