Thursday, 29 October 2020

मिरजेच्या पारंपरिक तंतुवाद्यांना नवे रंगलेपन



🔰सांगली : तंतुवाद्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिरजेतील तरुण कारागिरांनी बदलत्या काळाची मागणी ओळखून आता या पारंपरिक वाद्यांना बहुरंगी बनविले आहे. तंबोरे, सतारीच्या या नव्या रूपाला देश-परदेशातील कलाकारांचीही पसंती मिळत आहे.


🔰लाखेऐवजी आता ‘मेटॅलिक’ रंगाचा वापर करून मिरजेची सतार बहुरंगी बनवत असताना तिच्यातील स्वरामध्ये कोणताही बदल होणार नाही याची दक्षताही घेतली आहे.


🔰मिरज शहर दीडशे वर्षांहून अधिक काळ तंतुवाद्य निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. येथून परदेशातही तंतुवाद्यांची निर्यात केली जाते. येथे बनवलेल्या तंबोरा, सतार, दिलरुबा, सारंगी, ताऊस, रुद्रवीणा यांसारख्या वाद्यांना नामांकित कलाकारांकडून मागणी असते. 


🔰पारंपरिक पद्धतीमध्ये मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीच्या प्रारंभीच्या काळात पानाचा विडा कुटून त्यात थोडे पाणी मिसळून त्याचा लाल रंग तयार करून तो तंतुवाद्यांना देण्यात येत असे. नंतरच्या काळात लाखेच्या रंगाचा वापर करण्यात येऊ लागला. बत्ताशी आणि पत्रीलाख पातळ करून त्यात स्पिरीट मिसळून पिवळा, तपकिरी, जांभळा यांसारखे रंग देण्यात येऊ लागले. हे रंग देण्यात काही विशिष्ट कारागिरांनी हातखंडा मिळविला होता. गेली अनेक वर्षे  स्पिरीटमिश्रित रंगांतील वापर तंतुवाद्यांसाठी होत होता.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...