Friday, 23 October 2020

भारतातून चहाची विक्रमी निर्यात.


🅾️भारताने यावर्षी चहाची विक्रमी निर्यात केली आहे. तब्बल ३५ वर्षांनंतर चहा निर्यातीत भारताला२३० दशलक्ष किलोचा टप्पा गाठण्यातयश आले आहे.गेल्या आर्थिक वर्षात देशातून २३२.९२ दशलक्ष किलो चहाचीनिर्यात झाली. 


🅾️तया मोबदल्यात देशाला ४,४९३.१० कोटी रुपये मिळालेआहेत. यापूर्वी १९८०-८१ या काणात २३१.७४ दशलक्ष किलो चहाची निर्यातझाली होती.गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निर्यातीचे प्रमाण१७ टक्क्यांनी वाढले आहे. रशिया, इराण, जर्मनी, पाकिस्तान, बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात आणिपोलंड यासारख्या देशांनी मोठ्या प्रमाणात चहाची खरेदी केल्याने निर्यातीत वाढ झाली आहे.


🅾️दशात लिलावाद्वारे विक्री झालेल्या चहालादेखील चांगली किंमत मिळाली आहे. लिलाव झालेल्या चहाची किंमत आणि प्रमाण अनुक्रमे ८.०५ टक्के व१७.८२ टक्क्यांनी वाढले, असे ताज्या अहवालात नमूद आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...