Friday, 16 October 2020

भारतमाला प्रकल्प‼️‼️



💼‘भारतमाला’ हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशाला भुपृष्ठ रस्त्यांद्वारे जोडण्यासाठीच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवविला जात आहे.


🔴ठळक बाबी


💼हा राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम (NHDP) यानंतर देशातला दुसरा सर्वात मोठा महामार्ग बांधकाम प्रकल्प आहे, ज्याच्याअंतर्गत देशात सुमारे 50,000 किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे.


💼समारे 25 हजार किलोमीटर रस्त्याचे जाळे भारताच्या सीमांवर बनविण्याची यात तरतूद आहे. यात आणखी समुद्र किनारी क्षेत्र, समुद्री बंदरे, धार्मिक व पर्यटनाच्या क्षेत्रांचा देखील अंतर्भाव आहे. तसेच, 100 जिल्हा मुख्यालयांचाही यात समावेश आहे.


💼परकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एकूण 34 हजार 800 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात येत आहे.


💼दशातली शहरे जोडणारा इकोनॉमिक कॉरिडॉर विकसित केला जाणार असून 9 हजार किलोमीटर रस्त्यांसाठी 1 लक्ष 20 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

भारताच्या शेजारी देशांसोबत दळणवळण वाढवण्यासाठी 


💼भारत-भुटान-बांगलादेश-नेपाळ-मान्यमार कॉरिडॉर विकसित केला जात आहे.


💼मालवाहतुकीच्या कार्यक्षम आणि वेगवान हालचालीसाठी सुलभ वाहतूक होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकल्पामधून विशेषकरून आर्थिक मार्गिका व वसाहती, सीमेवरील प्रदेश आणि दुर्गम भागांना दळणवळणाची व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...