💢परस्ताविक
भारतीय संघराज्य व्यवस्थेमंधे तीन पातळ्यांवर शासनाचे कार्य चालते.
1) संघराज्य
2) घटकराज्य
3) स्थानिक
स्थानिक शासन संस्था म्हणजे स्थानिक भागातील जनतेचे स्वत:चे प्रश्न सोङविण्यासाठी निवडून दिलेल्या प्रतिनीधीच्या शासन संस्था होय. साधारणत: राज्य पातळीखालील सर्व शासनसंस्था म्हणतात.
💢 सथानिक जनतेला स्थानिक पातळीवरील सार्वजनिक व्यवहाराची व्यवस्था पाहण्याच्या कार्यात सहभागी करून घेणे हा स्थानिक शासनसंस्थेचा प्रमुख हेतु आहे. तसेच त्याचे कार्यही अशा कायद्याचा तरतुदींनुसार चालते. मात्र त्यांच्या दैनंदिन कारभारात राज्यशासन हस्तक्षेप करीत नाही. आपल्याला आधिकारक्षेत्रात त्या स्वायत्त असतात आणि त्यांना बरेच निर्णयस्वातंत्रही असते. भारतात सर्वत्र स्थानिक शासनसंस्थेला "स्थानिक स्वराज्यसंस्था"असे म्हणण्याचा प्रघात आहे.
💢 भारतात स्थानिक स्वराज्यसंस्थाचे प्रमुख दोन प्रकार आहेत: ग्रामीण व शहरी.
73 व्या घटनादुरूस्ती कायद्यात विविध पातळ्यांवरील ग्रामीण स्वराज्य संस्थांना "पंचायत "या सामान्य नावाने संबोधले आहे,तर 74 व्या घटनादुरूस्ती कायद्यात विविध प्रकारच्या शहरी स्थानक स्वराज्य संस्थांना "नगरपालिका "या सामान्य नावाने संबोधले आहे.
💢 गरामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व्यवस्थेला "पंचायतराज " असेही संबोधले जाते. कलम 243 अन्वये, "पंचायत "म्हणजे ग्रामीण भागासाठी ग्राम पातळीवर, मधल्या पातळीवर व जिल्हा पातळीवर स्थापन करण्यात आलेली स्वराज्य संस्थां होय,
No comments:
Post a Comment