Monday, 5 October 2020

अर्मेनिया-अझरबैजान युद्ध


🔰अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातला दशकांपासून सुरू असलेला सीमावाद 27 सप्टेंबर 2020 रोजी पुन्हा एकदा उफाळून आला. दोनही देश वादग्रस्त नागोर्नो-काराबाखच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत.


🔴नागोर्नो-काराबाख प्रदेश


🔰नागोर्नो-काराबाख हा 4,000 किलोमीटरवर पसरलेला डोंगराळ प्रदेश आहे. तिथे अर्मेनियातले ख्रिश्चन आणि मुस्लीम तुर्क राहतात. सोव्हियत संघादरम्यान ते अझरबैजानमधले एक स्वायत्त क्षेत्र होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या परिसराला अझरबैजानचा भाग समजले जाते. परंतु, तिथे बहुतांश अर्मेनियाचे नागरिक राहतात.


🔰1980च्या दशकाच्या शेवटापासून ते 1990च्या दशकापर्यंत चाललेल्या युद्धात 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि 10 लक्षाहून अधिक लोकांचे स्थलांतर झाले. त्यादरम्यान फुटीरवादी गटांनी नागोर्नो-काराबाखच्या काही भागांवर ताबा मिळवला होता. परंतु, 1994 सालामधल्या युद्ध विरामानंतरही तिथे सातत्याने संघर्ष चालू आहेत.


🔴पार्श्वभूमी


🔰अर्मेनिया आणि अझरबैजान ही आशिया खंडातली शेजारी-शेजारी राष्ट्रे आहेत. दोन्ही देश एकेकाळी सोवियत संघाचे भाग होते. दोन्ही देश यूरोपच्या अगदी जवळ आहेत.


🔰दोन्ही देश सोवियत संघाचे भाग होते. 1980च्या दशकात जेव्हा सोवियत संघाचे पतन झाले, तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये वाद सुरु झाला. नागोर्नो-काराबाख या भागावरुन उभय देशांमध्ये वाद आहे. हा भाग अर्मेनिया आणि अझरबैजानच्या सीमेवर आहे. 1991 साली दोन्ही देशांमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. तीन वर्षांच्या संघर्षानंतर रशियाने हस्तक्षेप केल्याने 1994 साली युद्धविराम देण्यात आला होता.


🔰आतरराष्ट्रीय कायद्यानुसार हा भाग अजरबैजानचा आहे, परंतु त्यावर अर्मेनियातल्या टोळ्यांचा ताबा आहे. त्यामुळे आर्मेनियन सैन्याने हा भाग आपल्या ताब्यात ठेवला आहे. या भागात नेहमीच तणावाची स्थिती राहिली आहे.


🔰अर्मेनिया हा पश्चिम आशिया आणि युरोपच्या काकेशस क्षेत्रात वसलेला एक पर्वतीय देश आहे. देशाची राजधानी येरेवन हे शहर आहे आणि द्राम हे राष्ट्रीय चलन आहे.


🔰अझरबैजान हा आशिया आणि युरोपमधला एक देश आहे, ज्यास कॅस्परियन समुद्र आणि काकेशस पर्वत सीमारेषा आहे. बाकू ही अझरबैजानची राजधानी आहे आणि अझरबैजानी मनात हे राष्ट्रीय चलन आहे.

No comments:

Post a Comment