Monday, 26 October 2020

अर्थशास्त्रावरील प्रश्न सरावासाठी.




१) कोणत्या मूल्यांकनाच्या एककास “कागदी सोने” म्हणतात ?

   1) युरो डॉलर 

   2) एस. डी. आर. 

   3) पेट्रो डॉलर   

 4) जी. डी. आर.


उत्तर :- 2✔️✔️


२) खालील विधाने विचारात घ्या.

   अ) ॲडम स्मिथ ने तुलनात्मक खर्च सिध्दांत मांडला.

   ब) अन्योन्य मागणी सिध्दांत व्यापार शर्तीची निश्चिती स्पष्ट करतो.

   क) डेनिस रॉबर्टसन यांनी वृध्दिचे इंजिन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार असे वर्णन केले आहे.

   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) अ व ब  

  2) ब व क 

   3) अ व क    

4) वरीलपैकी सर्व

उत्तर :- 2✔️✔️



३) कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते ?

   1) नाबार्ड   

  2) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

   3) स्टेट बँक ऑफ इंडिया

    4) वरील सर्व

उत्तर :- 1✔️✔️




४) भारतातील लघुउद्योगांची प्रमुख समस्या कोणती आहे ?

   1) कच्च्या मालाचा अभाव   

   2) अपु-या पायाभुत सुविधा

   3) आधुनिकीकरण   

   4) कामगारांची अनुपलब्धता

उत्तर :- 2✔️✔️




५) सहकारी विपणन संस्थांनी या हेतूने महत्वाची भूमिका पार पाडली आहे.

   अ) शेती उत्पादनाच्या ‍किंमती स्थिर करण्यासाठी मदत करणे. 

   ब) सभासदांना गोदामाच्या सुविधा पुरविणे.

   क) गैरव्यवहारापासुन सभासदांचे संरक्षण करणे.  

    ड) शेतक-यांना दीर्घकालीन कर्जपुरवठा करणे.

   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) अ फक्त  

  2) अ आणि ब फक्त 

   3) अ, ब आणि क  

  4) अ, ब आणि ड

उत्तर :- 3✔️✔️

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...