Wednesday, 21 October 2020

मक्तेदारीप्रकरणी गूगलविरुद्ध खटला.


🔰मक्तेदारी प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकेच्या न्याय विभागाने गूगलविरुद्ध खटला दाखल केला आहे. ऑनलाइन शोध आणि जाहिरात यावरील वर्चस्वाचा स्पर्धेला मारक ठरेल असा गैरवापर केल्याचा आणि पर्यायाने ग्राहकांना हानी पोहोचविल्याचा गूगलवर आरोप आहे.


🔰निकोप स्पर्धा असावी यासाठी सरकारने दावा दाखल करून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे मानले जात आहे. जवळपास २० वर्षांहूनही अधिक काळापूर्वी सरकारने मायक्रोसॉफ्टविरुद्धही दावा दाखल केला होता.


🔰सरकारकडून आणखीही काही कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत असून  गूगलविरुद्धची कारवाई ही सुरूवात असू शकते. सरकारने अ‍ॅपल, अमेझॉन आणि फेसबुक या कंपन्यांच्या तपासालाही न्याय विभाग आणि मध्यवर्ती व्यापार आयोगाला हिरवा कंदील दाखविला आहे.


🔰अनेक प्रतिस्पर्धी कंपन्यांना दूर सारून गूगलने आपली मक्तेदारी प्रस्थापित केली ती बाजारातील स्पर्धेसाठी हानिकारक आहे, असे अमेरिकेचे डय़ेपुटी अ‍ॅटर्नी जनरल जेफ रॉसन यांनी वार्ताहरांना सांगितले.

No comments:

Post a Comment