Friday, 2 October 2020

आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना


- केंद्र सरकारच्या या आरोग्य योजनेने नुकताच १ कोटी उपचाराचा टप्पा गाठला आहे.

- मेघालय स्थित पूजा थापा या १ कोटी व्या लाभार्थी ठरल्या. त्यांनी या योजनेंतर्गत शिलॉंग रुग्णालयात उपचार घेतला.

- या निमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आरोग्य धारा या वेबिनार शृंखलेमधल्या पहिल्या वेबिनारचे २१ मे रोजी उद्घाटन केले.


● योजनेबद्दल 


- सुरुवात: २३ सप्टेंबर २०१८ (रांची, झारखंड) 

- शिफारस : राष्ट्रीय आरोग्य धोरण २०१७ 

- अंमलबजावणी करणारी यंत्रणा : राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण

- लाभार्थी निवड: सामाजिक-आर्थिक जात गणना २०११ नुसार

- जगातील सर्वात मोठा शासकीय अनुदानीत आरोग्य सेवा कार्यक्रम 

- प्रमुख घटक : १) आरोग्य आणि कल्याण केंद्र (HWC), २) प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY)


● TimeLine 


- १५ ऑगस्ट २०१८-योजनेची घोषणा 

- २३ सप्टेंबर २०१८-योजनेची सुरुवात 

- ११ डिसेंबर २०१८-५ लाख लाभार्थी 

- २ जानेवारी २०१९ - राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची स्थापना (योजनेला १०० दिवस पूर्ण) 

- १४ ऑक्टोबर २०१९-५० लाख लाभार्थी 

- ४ एप्रिल २०२० : योजने अंतर्गत कोविड १९ची मोफत तपासणी व इलाज 


● योजनेंतर्गत मिळणारे लाभ:


- रुग्णालयांमध्ये दुय्यम आणि तृतीयक आरोग्य उपचारासाठी प्रति कुटुंबासाठी दर वर्षी ५ लाखांपर्यंत निधी 

- रुग्णालयात दाखल होण्याच्या ३ दिवस आधी आणि १५ दिवसानंतर विनामूल्य आरोग्य उपचार आणि औषधे 

- कौटुंबिक आकार, वय किंवा लिंग यावर कोणतीही मर्यादा नाही.


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...