Thursday, 22 October 2020

मराठमोळे श्रीकांत दातार हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे नवे डीन

🔥भारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे डीन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दातार भारतीय वंशाच्याच असलेल्या नितीन नोहरीयाची जागा घेतील.


🔥“आर्थर लोव्हस डिकिन्सन बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे प्राध्यापक आणि हार्वर्ड बिझिनेस स्कूल (एचबीएस) येथील विद्यापीठातील वरिष्ठ सहकारी डीन श्रीकांत दातार हे हॉवर्ड बिझनेस स्कूलचे पुढील डीन असतील, अशी माहिती अध्यक्ष लॅरी बाको यांनी दिली. १ जानेवारी २०२१ पासून दातार या पदी रुजू होतील.


🔥“श्रीकांत दातार एक नाविन्यपूर्ण शिक्षक, एक प्रतिष्ठित विद्वान आणि एक अनुभवी प्राध्यापक आहेत,” असं नियुक्तीची घोषणा करताना बाको म्हणाले. व्यावसायीक शिक्षणाच्या भवितव्याविषयी ते अग्रगण्य विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. तसंच करोना महासाथीदरम्यान उद्र्भवलेल्या आव्हानंचा सामना करण्यासाठी हॉवर्ड बिझनेस स्तूलमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बाजवली आहे. हॉवर्ड बिझनेस स्तूलमध्ये गेली २५ वर्षे त्यांनी अनेक पदांवर आपली सेवा बजावली असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

No comments:

Post a Comment