Tuesday, 28 May 2024

भारताचा राष्ट्रध्वज

● सिस्टर निवेदिता यांनी तयार केलेल्या ध्वज

- 1904

- लाल रंग हा स्वातंत्र्य आणि विजयाचे प्रतिक 

- वज्र हे शक्तीचे प्रतीक आहे 

- वंदे मातरम् हे बंगाली भाषेत लिहिले आहे.


● वंदे मातरम् ध्वज

- 1906

- हिरवा, पिवळा आणि लाल रंगाचे आडवे पट्टे

- 8 कमळाची फुले जी 8 प्रांताची प्रतिक

- वंदे मातरम् हे हिंदीतील शब्द, सूर्य आणि चंद्र 


● बर्लिन समितीचा ध्वज

- 1907

- मादाम भिकाजी कामा यांनी बर्लिनमध्ये अनावरण केले

- केशरी, पिवळा, हिरवा रंग आणि 8 कमळाची फुले. माहिती संकलन वैभव शिवडे. 

- वंदे मातरम् हे हिंदीतील शब्द आणि सूर्य आणि चंद्राचे प्रतिक 


● होमरूल चळवळीतील ध्वज

- 1917

-युनियन जॅक हा ब्रिटिश सत्तेचा भाग होता 

- 7 स्टार (सप्तर्षी/उर्षा मुख्यतः)

- क्रिसेंट आणि वरती चंद्र आणि चांदणी


● काँग्रेसेचा ध्वज

- 1921

- पांढरा, लाल आणि हिरवा रंग

- या झेंड्यासाठी गांधीजींनी पांढरा पट्टा आणि चरखा सुचवला होता


● स्वराज ध्वज

- 1931

- तीन रंगाचा ध्वज स्विकारला

- धर्मनिरपेक्ष ध्वज केशरी, पांढरा, हिरवा आणि यावरती चरखा होता


● स्वतंत्र भारताचा ध्वज

- 1947

- 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेत हा ध्वज स्विकारण्यात आला 

- वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.

- मधल्या भागात पांढरा रंग आहे. या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.

- खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृध्दीचा बोध होतो.

- निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राच व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. माहिती वैभव शिवडे. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला 'अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते.


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...