🔰35 वर्षानंतर भारताने आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) याच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे.
🔴ठळक बाबी....
🔰ILOच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्रम व रोजगार सचिव अपूर्व चंद्रा यांची निवड झाली आहे.ऑक्टोबर 2020 ते जून 2021 या काळासाठी ही निवड झाली आहे.येत्या नोव्हेंबरमध्ये प्रशासक मंडळाच्या होणाऱ्या बैठकीचे अध्यक्ष पद अपूर्व चंद्रा भूषवणार आहेत.
🔴आतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) विषयी....
🔰आतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) याची 1919 साली स्थापना झाली. जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे संस्थेचे मुख्यालय आहे. भारत ILO चा एक संस्थापक सदस्य आहे. सध्या या संघटनेचे 187 देश सभासद आहेत.
🔰रोजगार आणि कामगारांच्या हिताच्या दृष्टीने विविध ठराव, शिफारसी आणि राजशिष्टाचार यांच्या स्वरुपात आंतरराष्ट्रीय मापदंड प्रस्थापित करणे हे ILO ची मुख्य कार्य आहेत. भारताने आतापर्यंत ILO च्या 45 ठरावांना मान्यता दिली असून त्यापैकी 42 ठरावांना देशात प्रभावी करण्यात आले आहेत. त्यापैकी 4 ठराव मुलभूत किंवा प्रमुख ठराव आहेत.
🔰ILOचे प्रशासकीय मंडळ हे सर्वोच्च कार्यकारी मंडळ असून ते धोरण, कार्यक्रम, अर्थसंकल्प याबाबत आखणी करते आणि महासंचालकाची निवड करते.
No comments:
Post a Comment