Thursday, 1 October 2020

लिव्हरपूलचा सलग तिसरा विजय.



🔰गतविजेत्या लिव्हरपूलने यंदाच्या इंग्लिश प्रीमियर लीग मोसमाची धडाक्यात सुरुवात करताना सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.


🔰पिछाडीवर पडल्यानंतर लिव्हरपूलने पुनरागमन करत आर्सेनलचे आव्हान 3-1 असे मोडीत काढले.अलेक्झांड्रे लाकाझेट्टे याने 25व्या मिनिटाला आर्सेनलचे खाते खोलल्यानंतर तीन मिनिटांनी सादियो माने याने लिव्हरपूलला बरोबरी साधून दिली.


🔰34व्या मिनिटाला ट्रेंट अलेक्झांड्र-आरनॉल्ड  याच्याकडून मिळालेल्या क्रॉसवर अँड्रय़ू रॉबर्टसन याने गोल करत लिव्हरपूलला 2-1असे आघाडीवर  आणले.सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना दिओगो जोटा याने तिसरा गोल करत लिव्हरपूलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

No comments:

Post a Comment

Latest post

इंग्रजीतील 100 समानार्थी शब्द (Synonyms) आणि त्यांचे मराठीत अर्थ खाली दिले आहेत:

1️⃣ व्यक्तिमत्व व वर्तन (Personality & Behavior)  1. Brave – Courageous (शूर)  2. Honest – Truthful (प्रामाणिक)  3. Happy – Joyful (आनंद...