🔰बरिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाची करोना प्रतिबंधक लस तरुण आणि ज्येष्ठांमध्ये करोनाविरोधी प्रतिकारशक्ती तयार करण्यात यशस्वी ठरली आहे.
तर या आधी जुलैमध्ये ही लस 18 ते 55 वयोगटातील व्यक्तींमध्ये प्रभावी ठरत असल्याचे चाचण्यांत सिद्ध झाले होते. आता त्यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे.
🔰‘ऑक्सफर्ड’ची करोना प्रतिबंधक लस लवकर बाजारात येऊन आर्थिक आणि आरोग्य क्षेत्रातील मळभ दूर होण्याची आशा वाढली आहे. ऑक्सफर्ड लशीची निर्मिती अॅस्ट्राझेन्का ही कंपनी करणार आहे.
🔰अॅस्ट्राझेन्का कंपनीने म्हटले आहे, की प्रतिकारशक्तीतील वाढ तरुण व ज्येष्ठांमध्ये सारखीच असून ज्येष्ठांमध्ये लशीचे काही किरकोळ दुष्परिणाम दिसण्याचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे ही लस सर्व वयोगटांसाठी सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. ‘एझेडडी 1222’ ही लस सुरक्षित असल्याचे हे पुरावे अलीकडेच हाती आल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.
No comments:
Post a Comment