Sunday, 4 October 2020

अतिउंचावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा!



- रोहतंग, हिमाचल प्रदेश मध्ये पंतप्रधान मोदी यांनी ज्या अटल बोगद्याचे उद्घाटन  केले, तो समुद्रसपाटीपासून १० हजार फूट उंचीवरचा महामार्गावरील जगातील सर्वात लांब बोगदा आहे.


-  मनाली ते लेह हे अंतर त्यामुळे ४६ कि.मी.ने कमी होणार असून प्रवासाचा कालावधी चार ते पाच तासांनी कमी होणार आहे.


- हा बोगदा ९.०२ कि.मी.चा असून तो मनाली ते लाहौल-स्पिती या भागांना जोडतो. आता सर्व हवामानात ही वाहतूक सुरू राहील, एरवी सहा महिने हिमवृष्टीमुळे या भागाचा संपर्क इतर देशापासून तुटत होता. 


- पीर पांजाल पर्वतराजीत ३ हजार मीटर म्हणजे १० हजार फूट उंचीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्याची बांधणी केली आहे. दक्षिण पोर्टल मनालीपासून २५ कि.मी अंतरावर व ३०६० मीटर उंचीवर आहे. उत्तर पोर्टल हे लाहौल खोऱ्यात सिसू येथील तेलिंग खेडय़ाजवळ ३०७१ मीटर उंचीवर आहे. 


- घोडय़ाच्या नालेसारखा त्यातील मार्गिकांचा आकार असून या प्रकल्पाला ३३०० कोटी रुपये खर्च आला आहे.


- अटलजींच्या मित्राचे स्वप्न पूर्ण

थोलांग, हिमाचल प्रदेश : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे मित्र अर्जुन गोपाल यांनी हिमाचल प्रदेशातील रोहतांग खिंडीतून बोगदा बांधल्यास सोयीचे होईल, अशी सूचना काही वर्षांपूर्वी केली होती. 


- गोपाल यांचे पुत्र अमर सिंह (वय ७५) यांनी सांगितले, की आमचे वडील १९९८ मध्ये दिल्लीत वाजपेयी यांना भेटले होते. त्या वेळी त्यांनी रोहतांग खिंडीतून बोगदा केल्यास लाहौल-स्पिती जिल्ह्य़ातील लोकांची सोय होईल अशी कल्पना मांडली. 


- त्यानंतर माझे वडील २००८ मध्ये निवर्तले, आता त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले असून त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही.

No comments:

Post a Comment