धरणातील पाणी आवक जावक मापे बघा, किती पाणी येते वा जाते माहिती आहे कां ???
1) टीएमसी ( TMC) म्हणजे काय ??
2) क्युसेक (Cusec )म्हणजे काय ??
3) क्युमेक (Cumec ) म्हणजे काय??
सध्या सर्वदूर चांगला पाऊस होतो आहे, धरणे भरत आहेत, काही धरणांतून पाणीही सोडल्या जात आहे.इतके टीएमसी पाणी जमा झाले, तितके क्युसेक पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो. पण या संज्ञांचा नेमका अर्थ काय ???
आपणास फक्त "लिटर" ही संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवूया.
▪️पाणी मोजण्याची एकके
● स्थिर पाणी मोजण्याची एकके –
1) लिटर
2) घनफूट
3) घनमीटर
▪️धरणातील पाणी मोजण्याचे एकक – टीएमसी TMC (Thousand Million Cubic Feet) (अब्ज घनफूट)
● एक टीएमसी म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (01 अब्ज) इतके घन फूट.
1 टीएमसी = 28,316,846,592 लिटर्स
2) वाहते पाणी मोजण्याची एकके-
1) 1 क्यूसेक ( Cusec )– एका सेकंदास एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्यूसेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 28.3 लिटर पाणी बाहेर पडते.
2) 1 क्युमेक (Cumec) - एका सेकंदास एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 1,000 लिटर पाणी बाहेर पडते.
● उदा.
पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता 1.97 टीएमसी आहे.
म्हणजेच त्यामध्ये 1.97 x 28.317 अब्ज लिटर्स पाणी मावते.
● याच धरणातून सध्या 500 क्युसेक पाणी नदीत सोडले जातआहे.
● म्हणजेच 500 x 27.317 लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.
◆ महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी असलेली 06 धरणे
1)उजनी 117.27 टीएमसी
2)कोयना 105.27 टीएमसी
3)जायकवाडी 76.65 टीएमसी ( पैठण )
4)पेंच तोतलाडोह 35.90 टीएमसी
5) वारणा 34.40 टीएमसी
6) पूर्णा येलदरी 28.56 टीएमसी
No comments:
Post a Comment