Thursday, 11 January 2024

अवध किंवा औंध तह

१७६४ मध्ये मोगल सम्राट दुसरा शाह आलम, त्याचा वजीर व अयोध्येचा (अवध किंवा औंध) सुभेदार शुजाउद्दौला व बंगालच्या सुभेदार मीर कासिम यांची संयुक्त आघाडी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यात बक्सार गावापाशी झालेली लढाई म्हणजेच बक्सरची लढाई होय.



तर बक्सारच्या लढाईत पराभूत झालेल्या शासकांशी कोणता व्यवहार करावा हे क्लाइव्हला ठरवायचे होते (1765 ला क्लाइव्ह पुन्हा बंगालचा गव्हर्नर झाला होता हे इथे लक्षत घ्या). 


त्यासाठी तो अवधला गेला आणि त्याने अवधचा नबाब शुजा उदौला ह्याच्याशी अलाहाबादचा तह केला.ह्या तहानुसार खालील अटींवर शुजाला त्याचे राज्य परत देण्यात आले.

अलाहाबाद आणि कोरा हे जिल्हे नबाबाने मुघल सम्राट शह आलम याला परत द्यावेत.युद्धनुकसान भरपाई म्हणून शुजाने रु. ५० लक्ष कंपनीला द्यावेत


काशीचा शासक बळवंत सिंह ह्याला त्याचा प्रदेश परत करावा.

अवध राज्याचे अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून संरक्षण कंपनी करेल. त्यासाठी कंपनीच्या लष्कराचा खर्च नबाब करेल. नबाबानेही कंपनीला गरजेनुसार निःशुल्क सेवा द्यावी.

No comments:

Post a Comment