Saturday 24 October 2020

इडियन नॅशनल आर्मी


·         रासबिहारी बोस यांनी जपानमधील पौर्वत्य देशातील निवडक लोकांची नागासाकी येथे बैठक घेतली.


·         ज्ञानेश्र्वर देशपांडे देवनाथ दास यांनी प्रमुख कार्य केले.


·         रसबिहारी बोस यांनी हिंदी लोकांची एक परिषद 28 ते 30मार्च 1942 मध्ये टोकियो येथे भरवली जपान, मलाया,चीन, थायलंड, या देशातून अनेक हिंदी स्वातंत्र्य संघ स्थापना केली.


·         कोणत्याही प्रकारे परकियांचे अधिकार नसणारे स्वातंत्र्य हिंदुस्थानला प्राप्त करु देणे हा संस्थेचा उद्देश होता.


·         लीगचे पहिले अध्यक्ष म्हणून रासबिहारी बोस यांची निवड करण्याल आली रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगच्या अनेक शाखा स्थापन केल्या.


·         स्वातंत्र्याचे ध्येय साध्य करण्यासाठी रास बिहारी बोस यांनी टोकियो येथे आझाद हिंद फौजेची इंडियन नॅशनल आर्मी स्थापना केली.


·         कॅप्टन मोहन सिंग हे सरसेनापती झाले.


·         15 फेब्रुवारी 1942 रोजी जपानचे पंतप्रधान जनरल टोजो व रासबिहारी बोस यांनी हिंदी स्वातंत्र्याची घोषणा केली.


·         आझाद हिंद फौज आणि इंडियन इंडिपेन्डन्स लीगने ऑगस्ट 1942 पर्यत सिंगापूर बॅकॉक, रंगून जिंकलीे आझाद हिंद फौजेचे आणि हिंदी स्वातंत्र्य संघाचे मुख्य ठाणे बॅकॉकहून सिंगापूरला आणले.


·         आझाद हिंद फौजेच्या अधिकारावरुन मोहन सिंगला कमी करून जगन्नाथाराव भोसले यांना मेजर जनरल आणि सुप्रीम कमांडर म्हणून नियूक्त केले.


·         सुभाषचंद्र बोस 20 जून 1943 ला टोकियोला आले. रास बिहारी यांनी त्यांचे स्वागत केले.


·         त्यांनतर सिंगापूरला गेले. आझाद हिंद फौजेच्या निरनिराळया घटकांच्या भेटी घेतल्या.


·         5 जूलै 1943 रोजी सिंगापूर येथे नव्याने फौजेची स्थापना केली.


·         आठ दिवसातच राणी ऑफ झाशी रेजिमेंट ही स्त्री शाखा स्थापन केली.


·         25 ऑगस्ट 1943 रोजी आझाद हिंद सेनेचे अधिकृत नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी स्वीकारले.


·         स्वातंत्र्य लढयामध्ये आझाद हिंद सेनेने सुभाषचंद्र बोसच्या नेतृत्वाखाली प्रभावी कामगिरी केली. परंतु अखेरीस अपयश आले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...