Thursday, 22 October 2020

दोन महिलांनी रसायनशास्त्राचे नोबेल पटकावण्याची ही पहिलीच वेळ


🔰जनुकीय संपादनासाठी वापरण्यात येणाऱ्या रेणवीय कात्र्यांच्या संशोधनाला यंदा रसायनाशास्त्राचे नोबेल जाहीर झाले.


🔰या संशोधनामुळे रोगकारक जनुके काढून अनेक आनुवंशिक आजार तसेच कर्करोगही बरा करता येणे शक्य आहे.


🔰रसायनशास्त्राचे हे नोबेल फ्रान्सच्या इमॅन्युएल शापेंटी आणि अमेरिकेच्या जेनिफर ए. डाउडना यांना विभागून देण्यात येणार आहे.

दोन महिलांनी रसायनशास्त्राचे नोबेल  पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांनी प्राणी आणि माणसातील सदोष जनुके काढून टाकण्यासाठीचे ‘क्रिस्पर’ किंवा ‘कॅस 9’ तंत्रज्ञान शोधून काढले होते.


🔰ही पद्धत वनस्पती व सूक्ष्मजीवातील घातक किंवा सदोष जनुके काढून टाकण्यासाठी वापरता येते.


🔰रणवीय कात्र्यांचे हे जनुकीय साधन विशेष परिणामकारक असल्याचे रसायनशास्त्राच्या नोबेल समितीचे अध्यक्ष क्लेस गुस्ताफसन यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...