1) पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?
1) बोस – आईनस्टाईन कंडनसेट 2) फर्मआयोनिक कंडनसेट
3) एरिक – कॅटरले कंडनसेट
4) कार्नेल टर्मस् कंडनसेट
उत्तर :- 1
2) धातूंचे क्षरण थांबविण्यासाठी खालील पध्दतींपैकी अयोग्य पध्दत कोणती ?
अ) गॅल्व्हॉनायझिंग – लोखंड/स्टील यांवर जस्ताचा थर लावणे.
ब) टायनिंग – कथिलचा थर लावणे (कलई करणे)
क) ॲनोडायझिंग – विद्युत अपघटनाव्दारे तांबे किंवा ॲल्युमिनीअमवर ऑक्साईडचा पातळ थर लावणे.
1) फक्त अ
2) फक्त ब
3) फक्त क
4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 2
3) खालीलपैकी कोणते क्षार हे डी.एन.ए. मध्ये असतात.
अ) एडीनीन – A ब) गुआनीन – G क) थायमिन – T ड) साइटोसीन – C
1) अ, ब
2) अ, ब, क
3) ब, क, ड
4) अ, ब, क, ड
उत्तर :- 2
4) वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे कोणती भौतिक राशी होय ?
1) चाल
2) घनता
3) जडत्व
4) त्वरण
उत्तर :- 4
5) खालीलपैकी कोणता मूलद्रव्य पहिल्या महायुध्दात हत्यार म्हणून वापरण्यात आला होता.
1) मिथेन 2) क्लोरीन 3) फ्लोरीन 4) आयोडीन
उत्तर :- 1
6) अ) ज्या भौतिक राशी व्यक्त करताना परिमाण आणि दिशा दोघांची आवश्यकता असते त्या राशींना आदिश राशी असे म्हणतात.
ब) ज्या भौतिक राशी व्यक्त करताना फक्त दिशेची आवश्यकता असते त्या भौतिक राशींना सदिश राशी असे म्हणतात.
वरीलपैकी सत्य विधान / विधाने कोणते ?
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ, ब दोन्ही
4) एकही नाही
उत्तर :- 4
7) धातूबद्दल खालील विधानांचा विचार करा.
अ) धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देऊन धन आयन प्राप्त करतात.
ब) धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेऊन ऋण आयन प्राप्त करतात.
क) आधुनिक आवर्तसारणीत धातू मूलद्रव्य डाव्या बाजूला व मध्यभागी आहेत.
ड) टेक्नेशिअम हा सर्वांत पहिला कृत्रिम मूलद्रव्य आहे.
1) अ, क, ड बरोबर
2) अ, क बरोबर
3) ब, क बरोबर
4) अ, ब, क, ड बरोबर
उत्तर :- 1
8) खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
अ) हिपॅरीन - रक्त शरीरात गोठू नये म्हणून असणारे रसायन आहे.
ब) हिस्टामाइन - सूल आल्यानंतर तिथे स्त्रवणारे रसायन आहे.
1) अ योग्य
2) ब योग्य
3) दोन्ही योग्य
4) दोन्ही अयोग्य
उत्तर :- 3
9) खालील विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा.
अ) एक किलोग्रॅम म्हणजे पॅरीस येथील आंतरराष्ट्रीय मोजमाप कार्यालयातील 90% प्लॅटीनम, 10% इरिडीयम या मिश्रधातूचा 39
मि.मी. उंची व व्यास असणा-या ठोकळयाचे वजन होय.
ब) एक किलोग्रॅम म्हणजे 4° c तापमानात सामान्य वायूदाबाला 1 लिटर पाण्याचे वजन होय.
1) अ, ब दोन्ही
2) फक्त अ
3) फक्त ब
4) एकही नाही
उत्तर :- 1
10) खालील विधानांचा विचार करा.
अ) चांदीपेक्षा सोन्याची तन्यता जास्त आहे.
ब) चांदीपासून 8,000 फूट लांबीचा तार काढता येतो.
क) चांदीनंतर तांबे दुसरा आणि सोने तिसरा विजेचा सर्वोत्तम वाहक आहे.
ड) चांदी हा मानवासाठी विषारी नाही आणि आपण जेवण डेकोरंटमध्ये चांदीचा वापर करू शकतो.
1) ब, क, ड बरोबर अ चूक
2) अ, ब, क, ड बरोबर
3) अ, ब, ड बरोबर
4) वरीलपैकी नाही
उत्तर :- 1
No comments:
Post a Comment