Friday 16 October 2020

रद्रम”: स्वदेशी बनावटीचे अँटी-रेडिएशन (विकिरण-रोधी) क्षेपणास्त्र



🔰9 ऑक्‍टोबर 2020 रोजी संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्यावतीने (DRDO) विकसित करण्यात आलेल्या ‘रूद्रम’ नामक स्वदेशी बनावटीच्या अँटी-रेडिएशन क्षेपणास्त्राच्या उड्डाणाची चाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वी झाली.


🔰ओडिशाच्या व्हीलर बेटावर ही चाचणी घेण्यात आली. सुखोई लढाऊ विमानातून रूद्रम क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले.


🔴रद्रम क्षेपणास्त्राविषयी


🔰भारतीय हवाईदलासाठी तयार करण्यात आलेले ‘रूद्रम’ हे संपूर्णपणे भारतीय बनावटीचे पहिले विकिरण-रोधी क्षेपणास्त्र आहे.


🔰अतिम हल्ल्यासाठी या क्षेपणास्त्रामध्ये पॅसिव होमिंग हेडसह INS-GPS नॅव्हिगेशनची सुविधा आहे. त्यामुळे रूद्रमच्या मदतीने अधिक दूरवरचे लक्ष्य अचूक टिपणे शक्य होणार आहे. पॅसिव्ह होमिंग हेड प्रोग्रॅममुळे व्यापक फ्रिक्वेन्सी बँडच्या मदतीने वर्गीकरण करून लक्ष्य निर्धारित करणे शक्य झाले आहे.


🔰कषेपणास्त्राच्या मदतीने शत्रू सैन्याची रडार यंत्रणा, संपर्क स्थाने आणि इतर RF (रेडियो फ्रिक्वेन्सी) उत्सर्जित करणाऱ्या दूरसंचार घटकांना लक्ष्य करून या गोष्टी उद्ध्वस्त करता येतात.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...