Thursday 8 October 2020

मध्यप्रदेश नव्या राष्ट्रीय भरती संस्थेच्या परीक्षेमार्फत नोकरी देणारा पहिला राज्य असणार



🔸नव्या राष्ट्रीय भरती संस्था (NRA) मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारावर सरकारी नोकरी देण्याची घोषणा मध्यप्रदेश सरकारने केली आहे. असा निर्णय घेणारा हा देशातला पहिला राज्य ठरला.


पार्श्वभूमी


🔸कद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय भरती संस्था (NRA) याची स्थापना करण्याला मान्यता दिली आहे. केंद्र सरकारमधले सचिव दर्जाचे अधिकारी संस्थेचे अध्यक्ष असणार. सरकारी आणि सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातल्या अराजपत्रित पदांसाठी NRA मार्फत एक सामाईक पात्रता परीक्षा घेतली जाणार.


🔸दरवर्षी साधारणपणे, 1.25 लक्ष सरकारी नोकऱ्यांसाठी 2.5 कोटी इच्छुक उमेदवार विविध परीक्षा देतात. मात्र, आता एकाच सामाईक पात्रता परीक्षेमुळे या उमेदवारांना एकदाच ही पात्रता परीक्षा द्यावी लागणार आणि ती उत्तीर्ण झाल्यावर त्यानंतर ते यापैकी कोणत्याही एका भरती समितिकडे किंवा एकाच वेळी विविध समित्यांकडे उच्चस्तरीय परीक्षा देण्यासाठी अर्ज सादर करु शकणार.


परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये


🔸सामाईक पात्रता परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाणार.


🔸पदवी, 12 वी उत्तीर्ण आणि दहावी उत्तीर्ण अशा पातळ्यांसाठी वेगवेगळ्या सामाईक पात्रता परीक्षा असणार, जेणेकरुन विविध पातळ्यांवर वेगवेगळी भरती प्रक्रिया करता येणार.


🔸सामाईक पात्रता परीक्षा प्रमुख 12 भारतीय भाषांमध्ये घेतली जाणार.

No comments:

Post a Comment