आफ्रिका खंडातून पोलिओ हद्दपार झाला आहे. आफ्रिका खंड पोलिओमु्क्त झाला असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेकडून 25 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आली. आफ्रिका खंडात नायजेरिया हा शेवटचा देशही पोलिओमु्क्त जाहीर करण्यात आला.
📚 इतर ठळक बाबी :
जगात आता फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये पोलिओ आढळला जात आहे.
भारताला 2011 साली पोलिओमुक्त देश जाहीर करण्यात आले होते.
जागतिक आरोग्य संघटना (WHO), संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) आणि रोटरी इंटरनॅशनल या संस्था जगभरात पोलिओ निर्मूलन कार्यक्रम राबवितात.
📚 पोलिओ :
पोलिओ (शास्त्रीय नाव: पोलिओमायलिटिस) हा विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलिओ या आजारास लहान मुलांचा पक्षाघात म्हणून ओळखले जाते. संसर्गजन्य असा हा आजार मध्यवर्ती चेता संस्थेवर परिणाम करतो.
पोलिओच्या विषाणूचे तीन प्रकार हे ’RNA‘ वर्गीय असून, त्यांची नावे ब्रुनहिल्ड, लॅन्सिंग आणि लिऑन अशी आहेत. ब्रुनहिल्डमुळे अर्धांगवायू होतो. लॅन्सिंग आणि लिऑन मज्जारज्जूच्या पेशींवर हल्ला करतात.
पिटसबर्ग युनिव्हर्सिटीचे प्रो. जोनास सॉल्क यांनी 1951 साली पोलिओचे विषाणू शोधले आणि त्यांच्यापासून लस तयार केली.
पोलिओला प्रतिबंध करणाऱ्या दोन लस – 1) सॅबिन लस ही तोंडाने घेण्याची पोलिओप्रतिबंधक लस आहे. 2) साल्क लस ही मृत पोलिओ विषाणूपासून बनविलेली आहे. त्वचेखाली तीन इंजेक्शन्सच्या स्वरूपात ही लस द्यावी लागते.
📚 आफ्रिका खंड :
आफ्रिका हा आकाराने आणि लोकसंख्येने आशियानंतर क्रमांक दोनचा भौगोलिक खंड (एकूण क्षेत्रफळ: 3.02 कोटी चौ. किलोमीटर) आहे. हा खंड पृथ्वीचा 6% पृष्ठभाग व्यापतो. मादागास्कर आणि इतर बेटांचे समुह मिळून खंडात एकूण 56 सार्वभौम देश आणि दोन मान्यता नसलेले देश आहेत.
आफ्रिकेच्या उत्तरेला भूमध्य समुद्र, ईशान्येला सुएझ कालवा, लाल समुद्र आणि सिनाई बेटे आहेत. आग्नेयला हिंदी महासागर आणि पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला हा खंड आहे. उत्तर आणि दक्षिण दोन्ही उष्ण कटिबंध सामावणारा आफ्रिका हा एकमेव खंड आहे.
No comments:
Post a Comment