Monday, 26 October 2020

परदेशी नागरिकांना भारतात येण्यास मुभा


🖋पर्यटकवगळता सर्व परदेशी नागरिकांना भारतात येण्याची परवानगी देण्यात आली असून केंद्रीय गृहमंत्रालयाने व्हिसा निर्बंध गुरुवारी शिथिल केले. करोनामुळे फक्त परदेशात राहत असलेल्या भारतीय नागरिकांना देशात येण्याची मुभा होती.


🖋आता व्यापारीभेट, परिषदा, नोकरी, शिक्षण, संशोधन, वैद्यकीय उपचार आदी कारणांसाठी व्हिसा दिले जातील.


🖋विमान वा जलवाहतुकीच्या मार्गाने विदेशी नागरिक, परदेशस्थ भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींना भारतात येता येईल. भारताचा अन्य देशांशी झालेला विमान करार (एअर बबल), वंदे भारत मोहीम, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या मंजुरीनंतर बिगरव्यावसायिक कारणांसाठी होणाऱ्या विमानफेऱ्या याद्वारे परदेशातून प्रवाशांना भारतात येणे शक्य होणार आहे. मात्र, या प्रवाशांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लागू केलेल्या करोनासंदर्भातील सूचनांचे पालन करणे सक्तीचे असेल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले.


🖋कद्र सरकारने जूनमध्ये अल्पवयीन परदेशी मुला-मुलींना भारतात येण्याची मुभा दिली होती मात्र, परदेशस्थ भारतीय नागरिक वा भारतीय नागरिक असलेल्या किमान एका पालकाचे मुलांबरोबर असणे सक्तीचे होते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...