Thursday, 8 October 2020

भारत सरकारच्या केंद्रीय योजना

 


1) स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया


▪️परारंभ - १६ जानेवारी २०१६


▪️उद्देश - या योजनेअंतर्गत नवउद्योजकांना त्यांचा व्यवसाय [स्टार्ट अप ] सुरु करण्यासाठी साहाय्य केले जाते.

__________


2) दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना [DDUGKY]


▪️परारंभ - २५ सप्टेंबर २०१४


▪️योजनेचा उद्देश - ग्रामीण युवकांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करणे आहे.

__________


3) प्रसाद [Piligrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive]


▪️परारंभ - ९ मार्च २०१५


▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत अमृतसर, अजमेर, अमरावती, द्वारका, गया, कांचीपुरम, केदारनाथ, कामाख्य, मथुरा, पुरी, वाराणसी, वेल्लकनी, या तीर्थक्षेत्रामध्ये जागतिक दर्जाच्या पर्यटनासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत.

__________


4) उडाण योजना


▪️परारंभ - १४ नोव्हेंबर २०१४


▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत उच्च तांत्रिक शिक्षणासाठी मुलींना प्रोत्साहन दिले जाते.

__________


5) प्रधानमंत्री उज्वला योजना


▪️परारंभ - १४ नोव्हेंबर २०१४


▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत दारिद्ररेषेखालील ५ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जात आहे.

__________


6) नमामि गंगे प्रकल्प


▪️परारंभ - १० जुलै २०१४


▪️उद्देश - गंगा नदीचे शुद्धीकरण, संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

__________


7) सेतू भारतम प्रकल्प


▪️परारंभ - ४ मार्च २०१६


▪️उद्देश - रेल्वे क्रॉसिंगपासून सर्व राष्ट्रीय महामार्ग मुक्त करण्यासाठी आणि २०१९ राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या पुलांच्या दुरुस्तीसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...