Friday, 3 May 2024

राज्यसेवा पूर्व परीक्षा

1) खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापतीपद भूषविलेले नाही ? 

 A. के.एस. हेगडे

 B. हुकुम सिंह

 C. कृष्णकांत🔰

 D. गुरदयालसिंग धिल्लन.


____________________________


2) खालीलपैकी कोणते विधान भारतीय संघामध्ये राज्यांच्या निर्मिती बद्दल योग्य आहे?

(a) ते विद्यमान राज्यांतील प्रदेश वेगळे करून केले जाऊ शकते.

(b) ते आणखी दोन राज्ये किंवा राज्यातील भाग एकत्रित करून करता येईल.

(c) नव्या राज्यांची निर्मिती एका सामान्य कायद्याने करता येते.

(d) राज्यांच्या संमती शिवाय संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकत नाही.


पर्यायी उत्तरे 

A. (a), (b), (d)

B. (a), (b), (c)🔰

C. (a), (c), (d)

D. (b), (c), (d).


____________________________


3) राज्यघटनेनुसार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित केली जावू शकते :

(a) जेंव्हा राज्यशासनाद्वारे मांडलेले विधेयक राज्य विधिमंडळात नामंजूर होते.

(b) जर राज्यघटनेतील तरतूदीप्रमाणे राज्यशासन काम करीत नसेल,

(c) जर केन्द्राने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यास राज्य शासन असमर्थ असेल.

(d) जेंव्हा राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात महत्वाच्या मुद्यावर मतभिन्नता असेल.


पर्यायी उत्तरे :

 A. (a), (b) आणि (c)

 B. (b) आणि (c)🔰

 C. (a), (b) आणि (d)

 D. (a), (c) आणि (d).


___________________________


____________________________


4) अचूक जोड़ी कोणती ?

 A. कलम 79 - लोकसभेची रचना

 B. कलम 84 - संसद सदस्यत्वाची पात्रता🔰

 C. कलम 99 - संसद सचिवालय 

 D. कलम 85 - सदस्यांची अपात्रता.

____________________________


5) भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठीच्या निर्वाचक गणांमध्ये (इलेक्टोरल कॉलेज)

_____ समावेश होतो.


 A. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निवडून आलेल्या सदस्यांचा 

 B. संसदेतील निवडून आलेल्या सदस्यांचा आणि राज्यांच्या विधान सभांमधील निवडून आलेल्या सदस्यांचा

 C. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सर्व सदस्यांचा🔰

 D. संसद आणि राज्यांच्या विधान सभांमधील सर्व सदस्यांचा.


____________________________


6) पुढील विधानांपैकी कोणती बरोबर आहेत ?

(a) केंद्रातील मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असतात.

(b) लोकसभा व राज्यसभा यांचे सदस्य असलेल्या व्यक्ती ह्या केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये मंत्री होण्यास पात्र असतात.

पर्यायी उत्तरे :

 A. फक्त (a)

 B. फक्त (b)🔰

 C. दोन्ही

 D. कोणतेही नाही.


____________________________


7) भारतीय राज्यघटनेतील ___ सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते.

 A. कलम 20 

 B. कलम 21🔰

 C. कलम 22

 D. कलम 31.


____________________________


8) राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने जानेवारी 2014 पर्यंत भारतातील ____ समुदायांना अल्पसंख्यांक समुदाय म्हणून सूचित केले होते.

 A. पाच

 B. सहा🔰

 C. सात

 D. आठ.


____________________________


9) खालीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहेत ?

(a) राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे त्या सभागृहाचे सदस्य नसतात.

(b) उपाध्यक्ष जेव्हा सभागृहाचे कामकाज चालवतात तेव्हा ते पहिल्या फेरीत मतदान करू शकतात.


पर्यायी उत्तरे :

 A. केवळ (a) योग्य आहे

 B. केवळ (b) योग्य आहे

 C. (a) आणि (b) दोन्ही योग्य आहेत

 D. (a) आणि (b) दोन्ही अयोग्य आहेत.🔰


____________________________


10) राज्यसभेचे अध्यक्ष ___ पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनेलचे नामांकन करतात

 A. दोन

 B. पाच 

 C. सहा🔰

 D. चार.


1) खालीलपैकी कोणती संघननाची रूपे नाहीत?

  A. पर्जन्य🔰

 B. देव

 C. दहिवर

 D. सर्व प्रकाराचे मेघ.


2) खालीलपैकी कोणता वायू ओझोन स्तराच्या क्षयास कारणीभूत ठरतो?

 A. कार्बन डायऑक्साइड

 B. सल्फर डायऑक्साइड 

 C. क्लोरोफ्लोरोकार्बन🔰

 D. नाइट्रोजन डायऑक्साइड.



3) खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतिचा मानला जातो ?

 A. अॅन्थ्रासाईट🔰

 B. बिटूमिनस

 C. लिग्नाईट

 D. पीट.


4) उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी पर्वत रांगांचा कोणता क्रम बरोबर आहे ?

 A. सातपुडा, हरिश्चंद्रगड, सातमाळ, शंभूमहादेव

 B. सातपुडा, सातमाळ, हरिश्चंद्रगड, शंभूमहादेव 🔰

 C. शंभूमहादेव, सातमाळ, सातपुडा, हरिश्चंद्रगड

 D. सातपुडा, सातमाळ, शंभूमहादेव, हरिश्चंद्रगड.


5) उष्मागतिक रूपांतरणाचा वायूराशीवर होणारा परिणाम :

 A. शीत किंवा उबदार🔰

 B. स्थिर व अस्थिर

 C. शीत व स्थिर

 D. उबदार व अस्थिर.



6) कोरड्या व ओल्या फुग्याचा तापमापक कशाचे मोजमाप करण्यासाठी वापरतात ? 

 A. हवेचा भार

 B. तापमान 

 C. सापेक्ष आर्द्रता🔰

 D. वृष्टी.



7) ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो ?

 A. तपांबर

 B. स्थितांबर 🔰

 C. बाह्यांबर

 D. दलांबर.


8) दक्षिणेकडून उत्तरेकडे खालील नद्यांचा कोणता क्रम बरोबर आहे ?

 A. भिमा, निरा, कृष्णा, वारणा

 B. वारणा, कृष्णा, भिमा, निरा 

 C. कृष्णा, वारणा, भिमा, निरा

 D. वारणा, कृष्णा, निरा, भिमा.🔰


9) _________ या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फुलकोबीचे खोड पोकळ होते.

A. मॉलीबडेनम

B. जस्त

C. मँगनीज

D. बोरॉन.🔰



10) ________ हा न्युक्लीक आम्ल, फायटीन आणि फॉस्फोलिपिडचा महत्वाचा घटक आहे. 

A. फॉस्फरस🔰

B. नायट्रोजन

C. पोटॅशियम

D. कॅल्शियम.




१)  भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधनाचां उल्लेख आधुनिक भारताचे चाणक्य असा केला जातो.

१. चरणसिंग

२. व्ही.पी.सिंग

३. अटलबिहारी वाजपेयी

४. पी.व्ही.नरसिंहराव


२) सचिन तेंडूलकरने आपले १०० वे शतक कोणत्या मैदानवर झळ\कावले होते.

१. वानखेडे स्टेडीयम

२. ईडन गार्डन

३. लॉर्डस

४. शेर- ए - बांगला स्टेडीयम


३) २०१८ च्या प्रारंभी कोणत्या राज्यात राष्ट्रीय कर्करोग संस्था स्थापन करण्यात आली.

१. राजस्थान

२. पंजाब

३. हरियाणा

४. हिमाचल प्रदेश


४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात आपले पहिले भाषण खालीलपैकी कोणत्या वर्षी दिले होते.

१. ऑक्टोंबर १४

२. ऑक्टोंबर १५

३. ऑगस्ट १४

४. सप्टेंबर १४


५)  खालीलपैकी भारताच्या कोणत्या पंतप्रधनांनी संसदेत मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा केल्यानंतर त्याला देशव्यापी विरोध झाला होता.

१. राजीव गांधी

२. व्ही.पी. सिंग

३. चौथरी चरणसिंग

४. चंद्रशेखर


६) १९८३ मध्ये कन्याकुमारी ते दिल्लीतील राजघाटापर्यंत पदयात्रा काढणारे नेते खालीलपैकी कोण आहे?

१. चंद्रशेखर

२. लालकृष्ण अडवाणी

३. रामविलास पासवान

४. व्ही. पी.सिंग


७) सर डॉन ब्रॅडमॅन यांच्यानंतर कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जलद २५ शतक झळकवणारा दुसरा फलंदाज ------------ हा आहे.

१. विराट कोहली

२. महेला जयवर्धने

३. केन विल्यम्सन

४. स्टीव्ह स्मिथ


८)  ------------- हा देश ऑस्ट्रेलीया समुहाचा ४३ वां सदस्य देश ठरला.

१. चीन

२. पाकिस्तान

३. भारत

४. ब्राझील


९)  युनेस्को द्वारा ----ते ------ पर्यंत युनेस्को वारसा सप्ताह साजरा केला जातो.

१. १४ ते २० नोव्हेंबर

२. २० ते २४ नोव्हेंबर

३. १९ ते २५ नोव्हेंबर

४. ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर


१०) जागतिक व्यापार संघटनेने २०१९ या वर्षापासून ------- हा दिवस जागतिक कापूस दिवस म्हणून घोषित केले.

१. ७ ऑक्टोंबर

२. १५ ऑक्टोंबर

३. ६ नोव्हेंबर

४. २६ नोव्हेंबर


११) अवयवदानात परिणामकारक चळवळ उभी करणाऱ्या ----------------- या राज्याला केंद्र सरकरने सर्वोत्तम राज्याचा दर्जा दिला.

१. गुजरात

२. महाराष्ट्र

३. तामिळनाडू

४. आंध्र प्रदेश


१२) बाळाच्या नैसर्गिक संगोपनासाठी आणि आईच्या दुधाचे महत्व लक्षात घेऊन ---------- शहरामध्ये पहिलीह्युमन मिल्क बँक स्थापन करण्यात येणार आहे.

१. पुणे

२. नागपूर

३. औरंगाबाद

४. नाशिक

 

१३)  ग्रीनपीस इंडिया नावाच्या स्वयंसेवी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ………….हे शहर भारतातील सर्वात प्रदूषित शहर आहे

१.      झरिया

२.      धनबाद

३.      नोएडा

४.      गाज़ियाबाद – उत्तर प्रदेश

 


१४) 6 जानेवारी 2020 रोजी किसान विज्ञान कॉंग्रेस कोठे आयोजित केली गेली होती? 

१. नवी दिल्ली

२. बंगळुरू

३. पुणे

४. मुंबई

 


१५) राज्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी मात करता यावी म्हणून सर्व नदी खोऱ्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी शासनाने जल आराखडा तयार केला आहे. असा एकात्मिक जल आराखडा तयार करणारे ............ देशातील पहिले राज्य ठरले.

१.     केरळ

२.     तामिळनाडू

३.     महाराष्ट्र

४.     आंध्र प्रदेश




राज्यसेवा पूर्व परीक्षा 


उत्तरे :-

१:-४, २:-४, ३:-३, ४:-१, ५:-२, ६:-२, ७;-४, ८:३, ९:-३, १०:-१ ११:-१ १२:-४, १३:.-१, १४:-२ १५:-४



1) 1875 मध्ये बाबू शिशिर घोष यांनी 'इंडियन लीग' नावाची संघटना कोणत्या उद्देशाने स्थापन केली होती ?

(a) लोकांना राजकीय शिक्षण देणे

(b) लोकांमध्ये राष्ट्रवादी भावना जागृत करणे

(c) जमिनदारांच्या हिताचे रक्षण करणे

(d) जनतेला त्यांचे न्याय व अधिकार मिळवून देणे


पर्यायी उत्तरे :

A. (a), (b) फक्त🔰

B. (c) आणि (d) फक्त 

C. (b) आणि (c) फक्त

D. (a) आणि (c) फक्त.



2) 1946 साली पुणे कराराच्या निषेधार्थ दलित सत्याग्रहींनी मोर्चे काढले होते. त्यातील स्त्री-सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत ____ सहभागी होत्या.

A. बेबी कांबळे

B. ताराबाई शिंदे 

C. शांताबाई दाणी🔰

 D. आवंतिकाबाई गोखले.


3) _ यांनी 'नॅशनल इंडियन अॅसोसिएशनची' स्थापना केली.

A. मेरी कारपेंटर🔰

 B. सिस्टर निवेदीता

 C. मॅडम कामा

D. डॉ. अॅनी बेझंट.


4) न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे केवळ समाज सुधारकच नव्हते तर ते  ही होते.

(a) इतिहासकार

(b) अर्थशास्त्रज्ञ

(c) शिक्षणतज्ञ

(d) कवी


पर्यायी उत्तरे :

 A. (a) आणि (c) फक्त

 B. (b) आणि (d) फक्त 

C. (c) आणि (d) फक्त

 D. (a), (b), (c) फक्त.🔰



5) एल्फिन्स्टनने सुरू केलेली जमीन महसुल निश्चितीची पद्धत म्हणजे ____ यांचा समन्वय होता.

 A. मक्ता, रयतवारी, कायमधारा 

 B. रयतवारी, महालवारी, मौजेवारी 

 C. मौजेवारी, कायमधारा, रयतवारी🔰

D. मक्ता, मौजेवारी, महालवारी.


6) पुढील ओळीत कोणाचे वर्णन केले आहे?

(a) त्यांनी त्यांचे शिक्षण कैरो येथील अल् -अझर विद्यापीठातून पूर्ण केले होते.

(b) वयाच्या चौविसाव्या वर्षी त्यांनी अल्-हीलाल हे वृत्तपत्र सुरू केले होते.

पर्यायी उत्तरे :

A. महमद इक्बाल

B. बॅरिस्टर जिन्हा

C. अबूल कलाम आझाद🔰

D. शौकत अली.


7) पुढीलपैकी कोणते पुस्तक प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहीले नाही ?

A. वक्तृत्त्व - कला आणि साधना

B. आमच्या आठवणी🔰

C. दगलबाज शिवाजी

D. माझी जीवन गाथा.


8) होमरूल चळवळी बद्दल पुढीलपैकी काय खरे नाही ?

A. खापर्डेनी अमरावतीला होमरूल लीगची शाखा सुरू केली.

B. अमरावती होमरूल लीगचे खापर्ड अध्यक्ष होते. 

C. यवतमाळ होमरूल लीगचे अध्यक्ष महादेव अणे होते🔰

D. नागपूरच्या परिसरात मुंजेनी होमरूल लीगच्या शाखा स्थापन केल्या.



9) ते लहूजींचे शिष्य होते.लहूजींना त्यांचा अभिमान होता.ते लहूजींकडून मल्लविद्या, तलवार चालवणे, दांडपट्टा, बंदूक चालविणे इत्यादी शिकले.त्यांचा कल सामाजिक सुधारणांकडे होता.ते कोण?

A. जोतीबा फुले🔰

 B. यशवंत फुले 

 C. मेघाजी लोखंडे

D. नारायण लोखंडे.


10) खालील व्यक्तींपैकी कोणी फग्र्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन केले होते ?

(a) बी.जी. टिळक

(b) जी.के. गोखले

(c) धों.के. कर्वे

पर्यायी उत्तरे :

A. (a), (b) फक्त 

 B. (b), (c) फक्त 

C. (a), (c) फक्त

D. (a), (b), (c). 🔰



1) स्वराज पक्षाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते सभासद होते ?

(a) न.चि. केळकर

(b) शांताराम दाभोळकर

(c) पुरूषोत्तमदास त्रिकमदास

(d) भूलाभाई देसाई 

(e) जाफरभाई लालजी


पर्यायी उत्तरे :

 A. (a), (b), (c) फक्त

 B. (c), (d), (e) फक्त

 C. (a), (b), (c) आणि (d) फक्त 

 D. (a), (b), (c), (d) आणि (e). 🔰



2)पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा.

(a) : ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी

(b) द डिस्कवरी ऑफ इंडिया

(c) अँन ऑटोबायोग्राफी


पर्यायी उत्तरे :

 A. (a), (b), (c)

 B. (b), (c), (a)

 C. (c), (a), (b) 

 D. (a), (c), (b). 🔰



3) 'रयत शिक्षण संस्थेचे' _ हे उद्दिष्ट नव्हते.

 A. मागासलेल्या जातीत शिक्षणाची अभिरुची निर्माण करणे. 

 B. मुलाना स्वावलंबी, उद्योगी व शीलवान बनविणे. 

 C. मागासलेल्या जातीतील गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण देणे.

 D. समाजाच्या उद्धारासाठी निस्वार्थी स्त्रि-पुरुषांचे संघ निर्माण करणे.🔰



4) 1942 च्या भूमिगत क्रांतीकारकांचे नेतृत्व केल्या बद्दल दैनिक ट्रिब्यूनने '1942 ची झाँशीची राणी' म्हणून कोणाचा सन्मान केला होता?

 A. सुचेता कृपलानी

 B. मृदूला साराभाई

 C. अरुणा असफ अली🔰

 D. लीलाताई पाटील.


5)_________ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती स्थापन झाली होती.

 A. शंकरराव देव🔰

 B. जमनालाल बजाज 

 C. के.एफ्. नरिमन

 D. किशोरलाल मश्रूवाला.


6) महात्मा गांधींच्या भारतातील प्रारंभीच्या आंदोलनांचा कालक्रम लावा.

 A. अहमदाबाद, चंपारण, खेड़ा

 B. खेडा, अहमदाबाद, चंपारण

 C. चंपारण, अहमदाबाद, खेड़ा 🔰

 D. चंपारण, खेडा, अहमदाबाद.


7) गो.ग. आगरकरांविषयी काय खरे नाही?

 A. धर्माच्या चौकटित राहूनच विवेकाचे पालन केले पाहीजे.🔰

 B. नीतीमान होण्यासाठी ईश्वरनिष्ठ असलेच पाहिजे असे नाही.

 C. प्रखर बुद्धिवाद हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

 D. 'कवि, काव्य व काव्यरति' हा त्यांचा निबंध आहे.


8) साबरमती आश्रम पूर्वी अहमदाबाद जवळील ____ येथे होता. तो पूर्वीच्या जागेवरून प्लेगची साथ आल्यामुळे हालविण्यात आला.

 A. कोचार्ज 🔰

 B. आनंदपुरा

 C. जालीसाना 

 D. दलोद.


9) पहिल्या गोलमेज परिषदे विषयी काय खरे आहे ?

(a) 12 नोव्हेंबर 1930 रोजी तिचे उद्घाटन झाले.

(b) ब्रिटीश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड तिचे अध्यक्ष होते.

(c) काँग्रेस धरून 57 ब्रिटीश अमला खालील भारतीय सभासद तिला उपस्थित होते.

(d) परिषदेस एकूण 89 सभासद होते.


पर्यायी उत्तरे :

 A. (a) आणि (b) फक्त

 B. (a), (b) आणि (d) फक्त🔰

 C. (b), (c) आणि (d) फक्त

 D. (c) आणि (d) फक्त.


10) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढीलपैकी कोणती वर्तमानपत्रे सुरू केली होती ?


A. समता, गुलामी, जनता

B. बहिष्कृत भारत, जनता, गुलामी 

C. बहिष्कृत भारत, जनता, समता🔰

D. बहिष्कृत भारत, समता, गुलामी.


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...