Saturday 17 October 2020

'चांद्रयान-२'



🚀  यत्या १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी भारताचं 'चांद्रयान -२' 🛰अवकाशात झेपावणार आहे.


🚀   6 सप्टेंबरला "चांद्रयान-2'🛰 चद्रावर दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल, असा विश्‍वास "इस्रो'ने व्यक्त केला आहे. 


🚀   इस्रो'चे अध्यक्ष के. सिवान यांनी या मोहिमेची माहिती दिली.


🚀   परेक्षपणासह या संपूर्ण मोहिमेवर 978 कोटी रुपये खर्च होतील, असं सिवान यांनी सांगितलं.


🚀  इस्रो'ने 2008 मध्ये "चांद्रयान-1 चे प्रक्षेपण केले होते.


🚀  श्रीहरीकोटा येथून "जीएसएलव्ही एमके-3 '(GSLV MK|||) या प्रक्षेपकाद्वारे "चांद्रयान-2'चे उड्डाण होणार आहे.


🚀   चांद्रयान-2'चे ऑर्बिटर, लॅंडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) असे तीन भाग आहेत.


🚀   इस्रो'चे संस्थापक आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांचे "विक्रम' हे नाव "चांद्रयान-2'मधील लॅंडरला देण्यात आले आहे


🚀  चांद्रयान-2' वैशिष्ट म्हणजे यात एकही उपकरण (पेलोड) विदेशी नाही(संपूर्ण स्वदेशी). या यानाचे सर्व भाग संपूर्णपणे स्वदेशी आहेत. "चांद्रयान-1'च्या अवकाश यानात युरोपचे तीन व अमेरिकेचे दोन पेलोड होते.


🚀  यानाचं एकूण वजन 3800(3.8 टन) किलो आहे


🚀  रोव्हरचं वजन २७ किलो  व लांबी १ मीटर आहे.


🚀  लँडरचं वजन १४०० किलो  आणि लांबी ३.५ मीटर आहे.


 🚀  ऑर्बिटरचं वजन २४०० किलो आणि लांबी २.५ मीटर आहे.


👇👇👇👇👇👇

🚀  रशियाची अंतराळ संस्था "रॉसकॉसमॉस'ने 2007 मध्ये "चांद्रयान-2' मोहिमेला सहकार्य करण्याची तयारी दाखविली होती पण त्यांनी नंतर त्यातून माघार घेतली 

इस्रो'ने स्वतःच स्वदेशी🇮🇳🇮🇳 लडर व रोव्हर तयार केले.

No comments:

Post a Comment