Thursday, 22 October 2020

सयुक्त राष्ट्रसंघ अन्न व कृषी संघटनेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 75 रुपयांच्या विशेष नाण्याचे प्रकाशन.


🔰सयुक्त राष्ट्रसंघ अन्न व कृषी संघटना (FAO) याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त 16 ऑक्टोबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 75 रुपये एवढे मूल्य असलेल्या एका विशेष नाण्याचे प्रकाशन होणार आहे.


🔴भारत आणि अन्न व कृषी संघटना....


🔰दशातल्या दुर्बल घटक आणि सर्वसामान्य जनतेला आर्थिक तसेच पोषक आहारादृष्ट्या अधिक मजबूत बनवण्यासाठी, अन्न आणि कृषी संघटनेने आजवर केलेले कार्य अतुलनीय आहे.

भारतीय सनदी अधिकारी डॉ. बिनय रंजन सेन यांनी वर्ष 1956-1967 मध्ये या संस्थेचे महासंचालक म्हणून जबाबदारी सांभाळली.


🔰वर्ष 2016 हे डाळींसाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून आणि वर्ष 2023 हे बाजरीसाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करावे, अशा भारताच्या दोन्ही प्रस्तावांचे अन्न आणि कृषी संघटनेने स्वागत आणि कौतुक केले आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) मार्गदर्शनाखाली, कार्यरत राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेने गेल्या पाच वर्षात असे 53 वाण विकसित केले आहेत. 


🔰2014 पूर्वी असे बायोफोर्टीफाईड म्हणजेच, अधिक पोषणमूल्य असलेले केवळ एकच वाण विकसित झाले होते.

संयुक्त राष्ट्रसंघ अन्न व कृषी संघटना 


🔴(FAO) विषयी...


🔰सयुक्त राष्ट्रसंघाच्या कायमस्वरूपी प्रातिनिधिक संस्थांपैकी 16 ऑक्टोबर 1945 रोजी क्वेबेक (कॅनडा) येथे स्थापना झालेली ही पहिली संस्था आहे. FAOच्या सदस्य व सहसदस्य देशांची संख्या 197 आहे. भारत FAOचा स्थापनेपासूनचा सभासद आहे.


🔰जगातल्या सर्व देशांमधल्या लोकांचे आहारपोषण व जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने तेथील कृषी, मत्स्योद्योग व वनोद्योगांचा विकास होत जाणार असे प्रयत्न करणे, हे FAOचे प्रधान उद्दिष्ट आहे.

No comments:

Post a Comment