🔰टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज होण्याकरिता भारताची अव्वल वेटलिफ्टर मीराबाई चानूला अमेरिकेत सरावाची परवानगी मिळाली आहे.
🔰मीराबाईच्या सरावासाठी लागणारा 40 लाखांचा खर्च भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून (साइ) करण्यात येणार आहे.
🔰मीराबाई तिच्या दोन प्रशिक्षकांसह लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहे.
अमेरिकेतील कॅन्सास सिटी येथे ती दोन महिने सराव करणार आहे.
🔰मीराबाई ही ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम’ या उपक्रमातील निवडक खेळाडू असल्याने तिच्या सरावाचा खर्च ‘साइ’ करणार आहे.अमेरिकेत मीराबाईच्या सरावाचा खर्च एकूण 40 लाख रुपये अपेक्षित आहे. तो आम्ही उचलणार आहोत.
🔰अमेरिकेतील सरावाचा फायदा मीराबाईला ऑलिम्पिक पात्रतेसाठी होईल,’’ असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment