Thursday, 6 June 2024

राज्यसेवा पूर्व परीक्षा सराव पेपर :-

 १८४६) खालीलपैकी कोणत्या तरतूदीव्दारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते ?

   1) अनुच्छेद 32 

   2) अनुच्छेद 25 

   3) अनुच्छेद 14 

   4) अनुच्छेद 30

उत्तर :- 1


१८४७) खालीलपैकी कोणते विधान चूक आहे ?

   1) अनुच्छेद 29 च्या शिर्षकात अल्पसंख्याक शब्द आहे.

   2) अनुच्छेद 29 च्या बहुसंख्यासाठीही लागू आहेत.

   3) अल्पसंख्याकाचा निकष धर्म आणि भाषा आहे.

   4) सर्व विधाने खरी आहेत.

उत्तर :- 4


१८४८) खालीलपैकी कोणता हक्क “सविधांनिक” आहे परंतु मूलभूत हक्क नाही ?

   1) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क

   2) मालमत्तेविषयक हक्क

   3) संपूर्ण भारतात मुक्त संचार करण्याचा हक्क

   4) धर्म स्वातंत्र्याचा हक्क

उत्तर :- २


१८४९) भारतीय राज्यघटनेचे कलम 16 कशाशी संबंधित आहे ?

   1) राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये

   2) मूलभूत कर्तव्ये व अधिकार

   3) नववा परिशिष्ट व सातवा परिशिष्ट

   4) मूलभूत अधिकार

उत्तर :- 4


१८५०) भारतीय राज्य घटनेच्या कलम 12 नुसार “राज्य” या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था / यंत्रणा अंतर्भूत होत नाही ?

   1) विधानसभा   

 2) विधान परिषद  

  3) उच्च न्यायालय    

4) जिल्हा परिषद

उत्तर :- 3



१९४६) जमिनीची होणारी धूप हे जमिनीच्या कमी उत्पादकतेचे एक कारण आहे. यामुळे वार्षिक सरासरी ..................... पोषणद्रव्ये नष्ट 
     होतात.

   1) 5.0 ते 8.0 दशलक्ष टन   

   2) 5.4 ते 8.4 दशलक्ष टन

   3) 6.4 ते 8.5 दशलक्ष टन    

  4) 8.0 ते 10.0 दशलक्ष टन

उत्तर :- 2


१९४७) योग्य पर्याय निवडा.
     राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फलोत्पादन विकासासंबंधी बाबी :
   अ) उत्तम बाजारपेठेची स्थापना 

   ब) उच्च मूल्यांकित पिकांची लागवड

   क) उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब  

  ड) कंत्राटी शेती पध्दतीचा अवलंब

   इ) संशोधन व शास्त्रीय प्रक्रिया

   वरीलपैकी कोणता / ते पर्याय योग्य आहे / त ?

   1) अ, ब व क    
 2) ड व इ  
  3) वरील सर्व योग्य   
 4) वरील सर्व अयोग्य

उत्तर :- 3


१९४८) योग्य पर्याय निवडा.
     भारतातील पाणलोट व्यवस्थापनाची उद्दिष्टये :-

   अ) जंगल लागवड व वृक्षारोपण   

   ब) पाऊसाच्या पाण्याचे संवर्धन

   क) जमिनीचे पाणी वाढविण्यासाठी क्षमता वाढविणे 

 ड) खड्डे खोदून त्यात पाणी जिरविणे

   इ) कृषी उद्योग वाढीस लावणे

   1) अ व इ   
 2) ब, क व ड 
   3) वरील सर्व बरोबर 
   4) वरील सर्व चूक

उत्तर :- 3  


१९४९) भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जगातील एकूण मुलांच्या संख्येपैकी 20 टक्क्याहून कमी मुले आढळतात. परंतु 
     .................... टक्के मुले ही कुपोषित आहेत. 
  
   1) 30 टक्के
    2) 35 टक्के   
  3) 40 टक्के   
   4) 45 टक्के

उत्तर :- 3


१९५०) महाराष्ट्राच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर/सत्य आहे ?

   अ) महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे.

   ब) महाराष्ट्रातून अन्नधान्याची निर्यात मोठया प्रमाणात केली जाते.

   क) अन्य राज्यांकडून महाराष्ट्र अन्नधान्याची आयात करतो.

   ड) महाराष्ट्रातून अन्नधान्याची आयात निर्यात केली जात नाही.

   खाली दिलेल्या पर्यांयामधून योग्य पर्याय निवडा :
 
   1) अ  
    2) ब व क 
    3) क 
     4) क व ड
उत्तर :- 3


1856) श्री. एक्स हे अनिवासी भारतीय नागरिक आहेत. त्यांना लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान करावयाचे आहे. त्यांच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत. ते कशाप्रकारे मतदान करू शकतील ?

   अ) ते मतदान करु शकरणार नाहीत.

   ब) ते त्यांची मतपत्रिका पोस्टाने पाठवू शकतील.

   क) ते परदेशातील भारतीय दूतवासात जाऊन मतदान करु शकतील.

   ड) भारतीय निवडणुक आयोगाने तयार केलेल्या संकेत स्थळावर जाऊन ते मतदान करु शकतील.

   इ) भारतात जिथे त्यांची मतदार म्हणून नोंद झाली आहे. अशा मतदान केंद्रावर जाऊन ते मतदान करु शकतील.

   1) अ हे बरोबर उत्तर आहे   
   2) इ हे बरोबर उत्तर आहे
   3) क हे बरोबर उत्तर आहे      
4) ब, क आणि ड ही सर्व बरोबर उत्तरे आहे

उत्तर :- 2

1867) खालील जोडया जुळवा :

   अ) मुलभूत अधिकार      i) भाग I

   ब) राज्यनितीची मार्गदर्शक तत्वे    ii) भाग II

   क) संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र    iii) भाग III

   ड) नागरिकत्व        iv) भाग IV

  अ  ब  क  ड

         1)  i  ii  iii  iv
         2)  ii  i  iv  iii
         3)  iv  iii  ii  i
         4) iii  iv  i  ii

उत्तर :- 4

1868) भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) नागरिकाने लबाडीने नागरिकत्व ‍मिळविले असेल.

   2) नागरिकाने भारतीय राज्यघटनेप्रती बेईमानी दाखविली.

   3) नागरिक सामान्यपणे सलग वर्षे भारताबाहेर राहिला.

   4) नागरिकास नोंदणीनंतर पाच वर्षाच्या आत अन्य देशात एक वर्षांचा तुरुंगवास झाला.

उत्तर :- 4

1859) ओ.बी.सी. चळवळ .................. प्रभावीत झाली.

   1) मंडळ आयोगामुळे 
   2) महाजन आयोगामुळे
   3) सरकारिया आयोगामुळे   
 4) फजल अली आयोगामुळे
उत्तर :- 1

1860) भारताच्या राज्यघटनेच्या ............... भागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांविषयी तरतूदी करण्यात आल्या.

   1) पहिल्या  
  2) दुस-या  
  3) तिस-या
    4) चौथ्या

उत्तर  :- 3

1861) राज्यांची पुनर्रचना किंवा संघराज्य संबंध याच्याशी संबंधित आयोग व समित्या कोणत्या आहेत ?

   अ) जे.व्हि.पी. समिती  
  ब) सरकारीया आयोग    
   क) इंद्रजित गुप्ता समिती    
ड) राजमन्नार समिती

   1) फक्त अ, ब, क 
   2) फक्त अ, ब, ड   
 3) फक्त अ, क, ड
    4) फक्त ब, क, ड

उत्तर :- 2


1862) भारतीय संघराज्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

   अ) भारतीय राज्यघटनेच्या तिस-या कलमानुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा, त्यांचे क्षेत्र कमी करण्याचा किंवा त्यांचे नाव बदलण्याचा अधिकार आहे.

   ब) राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेत राज्ये सहभागी होत नाहीत.

        वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) फक्त अ    
 2) फक्त ब    
3) अ आणि ब  
  4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 1


1863) नागपूर कराराच्या कोणत्या तरतूदी आहेत ?

   अ) विकास व प्रशासनासाठी महाराष्ट्राची तीन विभाग – महाविदर्भ, मराठवाडा, राज्याचा उर्वरित भाग

   ब) मराठवाडयाच्या विकासाकडे विशेष लक्ष

   क) उच्च न्यायालयाचे मुख्यपीठ मुंबई येथे तर दुसरे पीठ नागपूर येथे

   ड) नागपूर येथे विधीमंडळाचे एक अधिवेशन राहील

   1) फक्त अ, ब, क    
2) फक्त अ, क, ड   
 3) फक्त क, ड, ब    
4) वरीलपैकी सर्व

उत्तर :- 4

1864) भारतीय ‘नागरिकत्व कायदा’ केव्हा बनविण्यात आला ?

   1) 1956      
2) 1955      
3) 1935     
 4) 1951

उत्तर :- 2


1865) संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरता कोणती अट आवश्यक नव्हती ?

   1) भारताचा अधिवास आणि
   2) भारतात जन्म किंवा
   3) माता व पितांचा भारतात जन्म किंवा
   4) अशा प्रारंभापूर्वी किमान 5 वर्षे भारतात सामान्यत: निवास

उत्तर :- 3


1866) संघराज्यात नवीन प्रदेशाच्या प्रवेशाबाबत कोणत्या घटनादुरुस्त्या संबंधित आहेत ?

   अ) 10 वी घटनादुरुस्ती      
ब) 12 वी घटनादुरुस्ती    
   क) 14 वी घटनादुरुस्ती      
ड) 16 वी घटनादुरुस्ती

   1) फक्त अ, ब, क    
2) फक्त अ, क, ड    
3) फक्त अ, ब, ड  
  4) फक्त ब, क, ड

उत्तर :- 1


1867) 2000 साली भारतीय संघराज्यात उत्तराखंड, छत्तीसगढ व झारखंड या तीन नवीन राज्यांची जवळपास एकाचवेळी निर्मिती   झाली. परंतु या तीन राज्यांचे निर्मिती अधिनियम जेव्हा वास्तव्यात आले तेव्हा त्यांचा कालानुक्रम काय होता ?

   1) उत्तराखंड, छत्तीसगढ, झारखंड      2) झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगढ
   3) छत्तीसगढ, उत्तराखंड, झारखंड      4) उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगढ

उत्तर :- 3


1868) राज्य पुनर्रचना अधिनियम, 1956 नुसार संपूर्ण देशाचे विभाजन खालीलप्रमाणे झाले होते –

   1) 22 राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेश    2) 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश
   3) 17 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश    4) 4 प्रकारची राज्ये

उत्तर :- 2


1869) नवीन राज्याच्या स्थापनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) संविधानाने संसदेला राज्यांच्या प्रदेशाची फेररचना त्यांच्या अनुमती किंवा सहमतीविना करण्याचा अधिकार दिला आहे.

   2) या संबंधीचे विधेयक संसदेत राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही.

   3) प्रभावित राज्य किंवा राज्ये मतप्रदर्शन करू शकतील परंतु संसदेच्या ईच्छाशक्तीला विरोध करू शकत नाही.
   4) संसदेमध्ये असा ठराव केवळ विशेष बहुमताने मंजूर होऊ शकतो.

उत्तर :- 4


1870) ‘क्ष’ या ब्रिटीश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल ?

   1) ती पुणे विद्यापीठात प्राध्यापिका आहे    

2) तिने भारतीय पुरषाशी विवाह केला आहे

   3) ती भारतात ब्रिटीश शिष्टमंडळास आली आहे 

 4) ती ब्रिटीश वकिलातीत नोकरी करीत आले.

उत्तर :- 2

1961) ग्रामीण पतपुरवठयाचा आढावा घेण्याच्या उद्देश्याने भारत सरकारने सन 1989 साली ‘कृषी पतपुरवठा आढावा समितीची’ स्थापना  केली. या समितीचे अध्यक्ष ............................ होते.

   1) एस.बी.वेंकटपय्या 

   2) ए.एम. खुसरो

   3) डी.आर. गाळगीळ    

4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 2

1962) ..................... हा भारतातील व्दितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे.

   1) कापड उद्योग   
 2) साखर उद्योग  
  3) चहा उद्योग  
  4) ताग उद्योग

उत्तर :- 2

1963) महाराष्ट्रातील पिकांचा त्यांचा 2011 – 2012 मधील लागवडीखालील क्षेत्रानुसार उतरता क्रम लावा :

   अ) कापूस  
  ब) ऊस      
क) ज्वारी  
  ड) गहू
   इ) तांदूळ

   1) क, अ, ब, ड, इ  
2) अ, क, इ, ब, ड    
3) अ, इ, क, ड, ब   
 4) इ, क, ड, अ, ब

उत्तर :- 2

1964) पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सुचनेनुसार दुस-या हरित क्रांतीत खालील बाबींचा समावेश नाही :

   अ) शेती व्यापाराच्या जागतिकरणात भारतीय शेतक-याच्या सहभागास मदत करणे.

   ब) पीक हंगामातील नुकसान कमी करणे.

   क) अन्नसाठयात सुधारणा करणे. 

   ड) शेतीमधील परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे.

   वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त  ?

   1) फक्त अ व ब    
2) क व ड   
 3) अ   
   4) फक्त ड

उत्तर :- 4

1965) भरपूर कृषि उत्पादन झालेल्या काळात जर किमतीत जास्त घसरण झाली तर उत्पादक शेतक-यांना  देण्यासाठी केंद्र सरकार ................................. किंमत निश्चित करते.

   1) किमान आधारभूत किंमत   
 2) वैधानिक किमान किंमत
   3) शासकीय खरेदी किंमत   
   4) वितरण किंमत

उत्तर :- 1


1961) ग्रामीण पतपुरवठयाचा आढावा घेण्याच्या उद्देश्याने भारत सरकारने सन 1989 साली ‘कृषी पतपुरवठा आढावा समितीची’ स्थापना  केली. या समितीचे अध्यक्ष ............................ होते.

   1) एस.बी.वेंकटपय्या 

   2) ए.एम. खुसरो

   3) डी.आर. गाळगीळ    

4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 2

1962) ..................... हा भारतातील व्दितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे.

   1) कापड उद्योग   
 2) साखर उद्योग  
  3) चहा उद्योग  
  4) ताग उद्योग

उत्तर :- 2

1963) महाराष्ट्रातील पिकांचा त्यांचा 2011 – 2012 मधील लागवडीखालील क्षेत्रानुसार उतरता क्रम लावा :

   अ) कापूस  
  ब) ऊस      
क) ज्वारी  
  ड) गहू
   इ) तांदूळ

   1) क, अ, ब, ड, इ  
2) अ, क, इ, ब, ड    
3) अ, इ, क, ड, ब   
 4) इ, क, ड, अ, ब

उत्तर :- 2

1964) पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सुचनेनुसार दुस-या हरित क्रांतीत खालील बाबींचा समावेश नाही :

   अ) शेती व्यापाराच्या जागतिकरणात भारतीय शेतक-याच्या सहभागास मदत करणे.

   ब) पीक हंगामातील नुकसान कमी करणे.

   क) अन्नसाठयात सुधारणा करणे. 

   ड) शेतीमधील परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे.

   वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त  ?

   1) फक्त अ व ब    
2) क व ड   
 3) अ   
   4) फक्त ड

उत्तर :- 4

1965) भरपूर कृषि उत्पादन झालेल्या काळात जर किमतीत जास्त घसरण झाली तर उत्पादक शेतक-यांना  देण्यासाठी केंद्र सरकार ................................. किंमत निश्चित करते.

   1) किमान आधारभूत किंमत   
 2) वैधानिक किमान किंमत
   3) शासकीय खरेदी किंमत   
   4) वितरण किंमत

उत्तर :- 1


1966) नाफेड (NAFED) .......................... चे कार्य करते.

   अ) सहकार विपणन  
  ब) शासकीय अभिकरण
   क) विमा अभिकर्ता    
ड) करारशेती प्रेरक

   1) अ, ब      
2) अ, ब आणि क    
   3) अ, ब, क आणि ड  
  4) ब, क आणि ड

उत्तर :- 2

1967) भारतीय अन्नधान्य उत्पादनांचा उतरता क्रम खालीलपैकी कोणता आहे, ते सांगा.

   1) गहू-तांदूळ-डाळी-भरड धान्ये  
    2) तांदूळ-गहू-डाळी-भरड धान्ये
   3) गहू-तांदूळ-भरड धान्ये-डाळी    
  4) तांदूळ-गहू-भरड धान्ये-डाळी

उत्तर :- 4

1968) 31 मार्च 2013 अखेरीस महाराष्ट्रात ...................... मुख्य नियमित बाजारपेठा व .................... दुय्यम बाजारपेठा अस्तित्त्वात 
     होत्या.

   1) 278, 577    
2) 327, 826    
   3) 228, 623   
 4) 305, 603

उत्तर :- 4

1969) 2013-2014 या वर्षी भारतात ......................... या पिकाची लागवड अन्न धान्याखालील एकूण क्षेत्राच्या सर्वात जास्त प्रमाणात 
     दिसून येते.

   1) गहू      2) तांदूळ      
   3) ज्वारी    4) मका

उत्तर :- 2

1970) सहकारी तत्त्वावरील विपणनात खालीलपैकी कोणती राज्ये अग्रेसर आहेत ?

   1) मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि आसाम 

   2) महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू

   3) जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश आणि आसाम 

 4) झारखंड, मध्यप्रदेश आणि अरुणाचल प्रदेश

उत्तर :- 2


1876) सध्या भारतीय संघराज्यात किती घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत ?

   1) 28 व 7 
   2) 26 व 9    
3) 27 व 8 
   4) 29 व 6

उत्तर :- 1

1877) 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या ‘भाषावार प्रांतरचना आयोगाचे’ अध्यक्ष कोण होते ?

   1) न्या. एस.के. दार 
 2) एस.के. पाटील    
3) ब्रिजलाल बियाणी 
 4) काकासाहेब गाडगीळ

उत्तर :- 1

1878) कोणत्याही संघराज्य क्षेत्राचे क्षेत्र वाढविण्याबाबतचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येत जर त्यास  ?

   1) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

   2) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय

   3) राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय परंतु संबंधित संघराज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

   4) राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय

उत्तर :- 2

1879) घटक राज्यांची पुनर्रचना किंवा त्यांच्या सीमा बदलण्याबाबतच्या खालील विधानांपैकी कोणते विधान चूक आहे ?

   1) संसदेला तो अधिकार दिला आहे.

   2) संसद साध्याबहुमताने तसा कायदा करू शकते.

   3) विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संबंधित विधीमंडळांची मते ‘आजमावली’ आहेत.

   4) सीमा बदलण्यासाठी संबंधित घटकराज्यांची संमती आवश्यक आहे.

उत्तर :- 4

1880) आंध्रप्रदेशाच्या राज्य पुनर्रचना विधेयक 2013 व्दारे तेलंगणा राज्याची स्थापना प्रस्तावित आहे. ज्यामध्ये खालीलप्रमाणे रचना 
     असेल –
  
I        II
        अ) लोकसभा मतदार संघ    i) 07 

        ब) जिल्हे        ii) 22

       क) राज्यसभा मतदारसंघ    iii) 17

       ड) विधान परिषदेतील जागा    iv)
 40
          v) 10 

  अ  ब  क  ड

         1)  i  v  ii  iii  
         2)  iii  ii  i  iv
         3)  iii  v  i  iv
         4)  iv  iii  i  iii

उत्तर :- 3


1976) 2013 च्या राष्ट्रीय पशुधन योजनेच्या उद्दिष्टांत .................... यांचा समावेश आहे ?

   अ) पशुधन उत्पादकता वाढविणे   
 ब) समावेशक विकास
   क) स्त्री – सक्षमीकरण     
 ड) ग्रामीण उत्पन्न विषमता कमी करणे

   1) अ, ब  
  2) अ, ब आणि क    
  3) क, ड    
  4) अ, क आणि ड

उत्तर :- 2

1977) माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सुचविलेल्या दुस-या हरित क्रांती योजनेत काय समाविष्ट नव्हते ?

   1) जागतिक शेती व्यापारातील सहभागासाठी भारतीय शेतक-यांना मदत      2) कापणीनंतरची हानी कमी करणे
   3) धान्य साठवणुकीत वाढ          
    4) यापैकी कोणतेही नाही

उत्तर :- 4

1978) सन 2012-13 या वर्षात देशाचे अन्न – धान्याचे एकूण उत्पादन हे ..................... होते.

   1) 257.13 दशलक्ष टन   
   2) 264.38 दशलक्ष टन
   3) 259.32 दशलक्ष टन     
 4) 244.49 दशलक्ष टन

उत्तर :- 1

1979) ॲगमार्क नेटच्या माहिती यंत्रणेतून शेतक-यांना खालील मुद्यावर माहिती दिली जाते :

   अ) विविध पिकांच्या अद्यावत किंमती     ब) ग्राहकांची आवडनिवड आणि पुरवठा परिस्थिती
   क) जागतिक व्यापाराविषयी माहिती  
  ड) देशांतर्गत बाजार विषयक माहिती गोळा करणे व प्रसारण करणे

   1) अ विधान योग्य आहे.     
 2) अ आणि ब विधाने योग्य आहेत.
   3) अ, ब, ड विधाने योग्य आहेत.  
  4) अ, ब, क, ड विधाने योग्य आहेत.
उत्तर :- 4

1980) राष्ट्रीय बांबू मिशन 2006-2007 मध्ये पुढीलपैकी एक सोडून इतर उद्दिष्टांसमवेत सुरु करण्यात आले :

   1) बांबू लागवडीखालील क्षेत्र वाढविणे
   2) बांबूच्या सर्व प्रजातींच्या उच्च प्रतीच्या रोपांचे मोठया प्रमाणात उत्पादन
   3) मानव साधनसंपत्तीचा विकास      4) विपणन सुविधांचा विकास

उत्तर :- 2

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...