Wednesday, 21 October 2020

सर्वात प्रभावशाली देशांच्या ‘एशिया पॉवर इंडेक्स 2020’ यादीत भारत चौथ्या क्रमांकावर.


🔰सिडनी (ऑस्ट्रेलिया) शहरातल्या लोवी इन्स्टिट्यूट या संस्थेनी ‘एशिया पॉवर इंडेक्स 2020’ नामक एक अहवाल प्रकाशित केला आहे. 


🔰कलेल्या अभ्यासामध्ये आशिया-प्रशांत प्रदेशामधल्या सर्वात प्रभावशाली / सामर्थ्यशाली देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे.


🔰जगातल्या प्रमुख देशांची आर्थिक क्षमता, लष्करी क्षमता, देशांतर्गत परिस्थिती, भविष्याचे नियोजन, जगातील इतर देशांसोबत असलेले संबंध, राजकीय व कूटनीतिक प्रभाव इत्यादी घटकांचा विचार करून दरवर्षी शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली जाते.


🔴ठळक बाबी...


🔰आशिया प्रशांत प्रदेशामध्ये भारत हा चौथा सर्वात प्रभावशाली देश ठरला आहे. भारताला 2020 साली 39.7 गुण मिळाले आहेत.


🔰आशिया प्रशांत प्रदेशामध्ये प्रथम तीन सर्वात प्रभावशाली देश (अनुक्रमे) - अमेरिका, चीन आणि जपान

आशिया प्रशांत प्रदेशामध्ये महामारीमुळे सरासार परिस्थिती खालावत चाललेल्या 18 देशांमध्ये भारताचा समावेश आहे. 


🔰महामारीमुळे देशाच्या आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवर मोठा ताण पडला असून यामुळेच भारताचा विकास मंदावला आहे, असे अहवालात म्हटले आहे.


🔰आशियातल्या सर्वाधिक लोकसंख्येच्या यादीत दुसऱ्या स्थानी असणारा भारत देश चांगली कामगिरी करणारा हिंद-प्रशांत प्रदेशातला मध्यम स्तरावरील देश आहे. भारताने राजनयिक प्रभावात दक्षिण कोरिया आणि रशियालाही मागे टाकले आहे.या दशकाच्या अखेरपर्यंत भारत चीनच्या एकूण आर्थिक उत्पादनाच्या केवळ 40 टक्केच पोहचू शकतो, तर 2019 आधी ही शक्यता 50 टक्के इतकी वर्तवण्यात आली होती.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...