Thursday, 29 October 2020

जागतिक भूकबळी निर्देशांक 2020’ यादीत भारत 94 व्या स्थानी...



इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इंस्टीट्यूट (IFPRI) या संस्थेच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘जागतिक भूकबळी 2020’ अहवालामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘जागतिक भूकबळी निर्देशांक 2020’ या 107 देशांच्या यादीत भारताला 94 व्या स्थानावर ठेवण्यात आले आहे.


📚 ठळक बाबी...


शेजारच्या नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तान या देशांच्याही खाली भारताचे स्थान आहे.


सध्या भारत भूकबळीच्या अशा स्तरावर आहे, जो गंभीर मानला जातो.

देशातल्या 1.3 अब्ज लोकसंख्येपैकी 50 टक्के लोकसंख्या निर्धारीत पौष्टीक आहारापासून वंचित आहे.भारतातली 14 टक्के लोकसंख्या कुपोषित आहे. देशात लहान मुलांमध्ये खुंटलेल्या वाढीचे प्रमाण 37.4 टक्के आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम ― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठ...