Friday, 16 October 2020

चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 1.3 टक्के एवढी घसरण होणार.

 


🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधी

चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 1.3 टक्के एवढी घसरण होण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) त्याच्या ‘ए लॉन्ग अँड डिफिकल्ट अॅसेंट’ या शीर्षकाच्या सुधारित अहवालात व्यक्त केला आहे.


🔴इतर ठळक बाबी...


🔰पढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेऊन 8.8 टक्क्यांचा विकासदर गाठण्याची अपेक्षा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केली आहे.

कोविड-19 महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून, चालू आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 4.4 टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


🔰जन महिन्यात जागतिक अर्थव्यवस्थेच्या घसरणीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा आता त्यामध्ये 0.8 टक्क्यांनी अधिक घट होण्याची अपेक्षा वर्तविली गेली आहे.

जगाच्या शीत प्रदेशामध्ये (युरोप, उत्तर अमेरिका आणि पूर्व आशिया) हवामान बदलामुळे होणारे नुकसान हे उष्ण प्रदेशांपेक्षा कमी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


🔴आतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) विषयी...


🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund -IMF) ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवघेवींच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणार्‍या बृहत-अर्थशास्त्रीय धोरणांबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. मुख्यतः गरीब राष्ट्रांना ती दीर्घमुदतीची कर्जे देते.


🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना 27 डिसेंबर 1945 रोजी ब्रेटोन वूड्स परिषदेत झाली. संघटनेचे मुख्यालय वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका येथे आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...