Thursday, 22 October 2020

12 वी BRICS शिखर परिषद.



🔰17 नोव्हेंबर 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमाने 12 वी BRICS शिखर परिषद आयोजित करण्याचे नियोजित आहे.


🔴ठळक बाबी...


🔰कार्यक्रमात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे प्रतिनिधी परस्पर सहकार्यावर चर्चा करणार.कार्यक्रमाचा विषय - “जागतिक स्थिरता, सामायिक सुरक्षा आणि नाविन्यपूर्ण वाढ यासाठी BRICS भागीदारी”.परिषदेचे अध्यक्षपद रशियाकडे आहे.


🔴BRICS विषयी...


🔰BRICS हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच राष्ट्रांचा समूह आहे. 2006 साली समूहाची स्थापना झाली. 2011 साली BRIC समुहात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आणि समूहाला BRICS हे नाव दिले गेले. BRICS देशांमधले द्विपक्षीय संबंध प्रामुख्याने हस्तक्षेप-मुक्त, समानता आणि परस्पर लाभाच्या आधारे प्रस्थापित केले जातात.


🔰रशियाच्या येकतेरिनबर्ग शहरात दिनांक 16 जून 2009 रोजी BRIC समूहाची पहिली औपचारिक परिषद आयोजित करण्यात आली होती. 2009 सालापासून BRICS राष्ट्रे औपचारिक परिषदेत दरवर्षी भेट घेतात.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...