Friday, 16 October 2020

जागतिक मानसिक आरोग्य दिन: 10 ऑक्टोबर.



🌼दरवर्षी 10 ऑक्टोबर ही तारीख ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ म्हणून पाळला जातो. यावर्षी "मेंटल हेल्थ फॉर ऑल: ग्रेटर इन्व्हेस्टमेंट - ग्रेटर अ‍ॅक्सेस" या विषयाखाली जागतिक मानसिक आरोग्य दिन पाळला गेला.


🌼या दिनानिमित्त, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी 8 ऑक्टोबर 2020 रोजी “मानसिक आरोग्य: कोविड 19च्या पल्याड दृष्टीकोन” याविषयी एका आभासी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. हा कार्यक्रम भारत सरकारचे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाचे अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभाग आणि मेलबर्न विद्यापीठ (ऑस्ट्रेलिया) यांनी आयोजित केला होता. ऑस्ट्रेलिया-इंडिया इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रा. क्रेग जेफ्री हे परिषदेचे सहअध्यक्ष होते.


🌿पार्श्वभूमी....


🌼अमेरिकेतल्या (ऑकोकन, व्हर्जिनिया) जागतिक मानसिक आरोग्य महासंघ (WFMH) या संस्थेच्यावतीने 1992 साली पहिल्यांदा ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ पाळला गेला होता. जागतिक मानसिक आरोग्य महासंघ (WFMH) ही मानसिक आरोग्याच्या संदर्भात जनजागृती करणारी एक जागतिक संघटना आहे. 1948 साली संघटनेची स्थापना झाली आणि त्याचे 150 हून अधिक देश सदस्य आहेत.


🌼मानसिक विकार हा जगभरात आढळणारा एक सामान्य विकार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरात मानसिक विकाराने ग्रस्त लोकांची संख्या अंदाजे 450 दशलक्ष आहे. मानसिक विकारामध्ये, व्यक्तीच्या सभोवतालची परिस्थिती आणि त्या व्यक्तीची विचारसरणी यामध्ये जेव्हा तफावत निर्माण होते आणि ती व्यक्ती आलेल्या परिस्थितीला स्वीकारू शकली नाही, त्यावेळी अश्या विकारांचा जन्म होतो. त्यामधून त्या व्यक्तीमध्ये असामान्य वर्तन तयार होते.


🌼आजही भारतामध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागृती नाही आणि त्याअभावी भविष्यात याचा उद्रेक होण्याचे संकेत निर्माण झाले आहे. जनसामान्यांना हे समजने अत्यावश्यक झाले आहे की, हा आजार नसून ही एक स्थिती आहे. त्यामुळे भारत सरकारने सन 1982 मध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम (NMHP) सुरू केले होते.

No comments:

Post a Comment