Thursday, 17 September 2020

ञानेंद्रिये (Sensory Organs)

प्राण्यांमध्ये पाच प्रकारची ज्ञानेंद्रिये असतात- डोळे, नाक, कान, त्वचा व जीभ.


डोळे (Eyes):

८० टक्के जगाचे ज्ञान आपल्याला डोळ्यांमुळे होते.

पापणीची सतत उघडझाप चालू असते. त्याद्वारे अश्रू डोळ्यावर समप्रमाणात पसरविले जाऊन डोळा ओलसर राहतो.

अश्रू हे सोडियम क्लोराईड व सोडियम बाय कार्बोनेटचे मिश्रण असते. त्यामध्ये लायसोझाइम (Lysozyme) नावाचे विकर असते. जे ऍन्टीसेप्टीक म्हणून काम करते.


बुबुळ (Cornea):

नेत्रदानामध्ये डोळ्याचा हा भाग काढला जातो. मृत्यूनंतर तो चार तासाच्या आत काढणे गरजेचे असते.

बुबुळ रोपणास Keratoplasty असे म्हणतात. मानवी अवयवाचे पहिले यशस्वी रोपण (Transplantation) बुबुळाचे करण्यात आले होते. ते एक्वर्ड कौराड झिर्म (Edward Kourad Zirm) या शास्त्रज्ञाने 7 डिसेंबर 1905 रोजी केले होते.


दृष्टिपटल (Retina):

हा डोळ्याचा पडदा असून वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर तयार होते. वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर उलटी (inverted & Reversed) पडत असते. मात्र, मेंदूमार्फत तिचे आकलन सुलट केले जाते.


दृष्टीसातत्य :

वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर १/१६ सेकंदासाठी राहत असते. त्याच्या आतच त्याच वस्तूची प्रतिमा पुन्हा पडल्यास त्या दोन प्रतिमांमधील फरक जाणवून येत नाही. याला दृष्टिसातत्य असे म्हणतात. त्यामुळेच सिनेमाच्या पडद्यावर हलणारी चित्रे पाहणे शक्य होते.


दृष्टिदोष (Defects Of Vision):


दृष्टिदोष हे प्रामुख्याने नेत्रभिंगातील संरचनात्मक दोषामुळे निर्माण होत असतात.

१) निकटदृष्टिता / हृस्वदृष्टी (Myopia/ Short-sightedness):

जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. तर लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.

डोळ्याचा आकार मोठा, लांबट व चपटा होतो, त्यामुळे वस्तूची प्रतिमा पडद्याच्या अलीकडेच पडते. प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्याच्या अलीकडेच काही अंतरावर होते. अर्थात, प्रकाशकिरण ज्यावेळी पडद्यावर पोहोचतात त्यावेळी ते विकेंद्रित झालेले असतात.

उपाय: अंतर्गोल भिंगाचा चष्मा.



२) दूरदृष्टिता/ दीर्घदृष्टी (Hypermetropia/Longsightedness):

दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, तर जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. डोळ्याचा आकार मोठा व उभट होतो. त्यामुळे प्रतिमा पडद्याच्या मागे पडते.

उपाय: बहिर्गोल भिंगाचा चष्मा


३) विष्मदृष्टी / अबिंदूकता (Astigmatism):

बुबुळाच्या किंवा भिंगाच्या किंवा दोघांच्या वक्रतेमध्ये कमी -जास्तपणा निर्माण झाल्यास हा दोष निर्माण होतो. त्यामुळे वस्तूपासून येणाऱ्या प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्यावर एकाच ठिकाणी न होता दोन किंवा अधिक ठिकाणी होते. त्यामुळे वस्तू अस्पष्ट दिसतात. हा दोष ह्रस्व व दीर्घदृष्टी या दोन्हींमध्ये आढळू शकतो.

 उपाय: दंडगोलाकार भिंगाचा चष्मा.


४) वृध्ददृष्टिता/ चाळीसी (Presbyopia):

वाढत्या वयामुळे होणार दोष दूरदृष्टीतेचा एक प्रकार समायोजी स्नायू दुर्बल बनल्याने भिंगाच्या समायोजन शक्तीमध्ये हळूहळू होणाऱ्या कमतरतेमुळे निर्माण होतो, त्यामुळे जवळच्या वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत.

उपाय: वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...