Saturday, 26 September 2020

RAISE 2020: कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देणारी आभासी शिखर परिषद


🌺सामाजिक हितार्थ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने 5 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2020 या कालावधीत एक आभासी महाशिखर परिषद आयोजित केली जाणार आहे, जिचे नाव आहे – “RAISE 2020” (सामाजिक सशक्तीकरणासाठी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता 2020). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.


🔰कार्यक्रमाविषयी...


🌺भारत सरकारचे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नीती आयोग यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.


🌺AI तंत्रज्ञानाद्वारे सामाजिक परिवर्तन, समावेश आणि सशक्तीकरणासाठी भारताची कल्पना आणि रूपरेषा तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर जगभरातल्या विचारवंतांची ही अशा प्रकारची पहिलीच बैठक आहे.


🌺इतर क्षेत्रांबरोबर आरोग्यसेवा, कृषी, शिक्षण आणि स्मार्ट वाहतूक यासारख्या क्षेत्रात सामाजिक परिवर्तन, समावेशकता आणि सशक्तीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी अभ्यासक्रम आखणे आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी हा जागतिक मंच असणार आहे.


🌺परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन, धोरण आणि नवसंशोधन विषयातले प्रतिनिधी आणि तज्ञ जगभरातून सहभागी होणार आहेत.


🌺‘महामारी सज्जतेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’, ‘डिजिटलीकरणाला नवसंशोधनाची चालना’, ‘सर्वसमावेशक AI’, ‘यशस्वी नवसंशोधनासाठी  भागीदारी’ इत्यादी विविध विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे.


🌺कार्यक्रमांचाच एक भाग म्हणून, ‘AI सोल्यूशन चॅलेंज’द्वारे निवडलेले  स्टार्टअप 6 ऑक्टोबर 2020 रोजी ‘AI स्टार्टअप पिच फेस्ट’ या प्रदर्शनीत सादरीकरण करणार.


🌺भारत या क्षेत्रासाठी जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी परिसंस्था आहे. उद्योग विश्लेषकांचा असा अंदाज आहे की, 2035 सालापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता भारताच्या अर्थव्यवस्थेत 957 अब्ज डॉलर एवढ्या उत्पन्नाची भर घालू शकते.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...