💬 पूर्व हिंद महासागर प्रदेशात 23 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय नौदल आणि ऑस्ट्रेलियाचे रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही यांच्यामधला संयुक्त “पॅसेज एक्सरसाईज” (PASSEX) नामक सागरी सराव आयोजित करण्यात आला.
♦️ठळक बाबी....
💬 दोन्ही नौदलांच्या दरम्यान होणाऱ्या कार्यात सुसूत्रबद्धता राखणे, एकमेकांना समजून घेणे तसेच सुयोग्य पद्धतीना आत्मसात करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते.
💬 सरावात भारतीय नौदलाच्या INS सह्याद्री आणि INS कर्मुक या जहाजांनी भाग घेतला होता.हा भारतीय नौदलाच्या पुढाकाराने मित्र राष्ट्रांच्या नौदलासोबत नियमितपणे आयोजित केला जाणार सराव आहे.
♦️ऑस्ट्रेलिया देश....
💬 ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रकुल दक्षिण गोलार्धाच्या खंडाच्या अंतर्गत असलेला एक देश आहे, जो जगातला सर्वात छोटा खंड आहे आणि जगातला सर्वात मोठा बेट देखील आहे, जो हिंद व प्रशांत महासागरात पसरलेला आहे. ऑस्ट्रेलिया हा एकमेव असा प्रदेश आहे, जो एक खंड, एक राष्ट्र आणि एक बेट आहे. कॅनबेरा हे देशाचे राजधानी शहर आहे आणि ऑस्ट्रेलियाई डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे
No comments:
Post a Comment