1) खालीलपैकी गतीविषयक पहिले समीकरण कोणते ?
1) v² = u² + at 2) v = u + at
3) v = ut + ½at² 4) v = u + v/t
उत्तर :- 2
2) खालीलपैकी कोणते धातू आहेत ?
अ) ॲल्युमिनीअम, सोने ब) लोखंड, तांबे
क) चांदी, तांबे ड) आयोडीन, सिलिकॉन
1) अ, ब 2) ब, क
3) अ, ब, क 4) अ, ब, क, ड
उत्तर :- 3
1) खालीलपैकी कोणत्या शहरात देशातील प्रथम राष्ट्रीय डॉल्फीन संशोधन केंद्र उघडण्यात येणार आहे.
1) मुंबई 2) चेन्नई
3) पटना 4) बेंगळूरू
उत्तर :- 3
2) योग्य जोडया निवडा. (राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार)
अ) 2018 -- विराट कोहली, मीराबाई चानू
ब) 2017 -- सरदार सिंग, देवेंद्र झांझरिया
क) 2016 -- पी.व्ही. सिंधु, साक्षी मलिक, दिपा कर्माकर, जितू रॉय
ड) 2015 -- सानिया मिर्झा
1) अ, क, ड 2) अ, ब, क, ड
3) अ, ब, ड 4) अ, ब, क
उत्तर :- 2
3) खालीलपैकी कोणता दिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.
1) 15 सप्टेंबर 2) 15 ऑक्टोबर 3) 14 ऑगस्ट 4) 24 डिसेंबर
उत्तर :- 2
4) तृतीयपंथीय लोकांकरीता मैदानी स्पर्धा आयोजित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते.
अ) तामिळनाडू ब) केरळ क) गुजरात ड) महाराष्ट्र
1) ड 2) क
3) ब 4) अ
उत्तर :- 3
5) थेट जनतेकडून सरपंचाची निवड करण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील कितवे राज्य आहे.
1) पहिले 2) दुसरे
3) तिसरे 4) चौथे
उत्तर :- 3
3) खालील विधानांचा विचार करा.
अ) पेशीचा आकार मुख्यत्वे तिच्या कार्याशी निगडीत असतो.
ब) सूक्ष्मजीवांना गिळंकृत करण्यासाठी पांढ-या रक्तपेशी स्वत:चा आकार बदलू शकतात.
क) एका टोकाकडून दुस-या टोकाकडे आवेगाने वहन करण्यासाठी चेतापेशींची लांबी जास्त असते.
ड) केशिकांमधून सुलभ वहन होण्यासाठी मानवी लोहीत रक्तपेशींचा आकार व्दिबर्हिर्वक्री गोलाकार असतो.
1) अ, ब, क 2) अ, क, ड
3) अ, ब, ड 4) वरील सर्व बरोबर
उत्तर :- 1
4) v² = u² + 2as हे गतीविषयक कितवे समीकरण आहे ?
1) चौथे 2) पहिले
3) तिसरे 4) दुसरे
उत्तर :- 3
5) खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू तसेच अधातूंचे गुणधर्म दर्शविते.
1) आर्सेनिक, अँटीमनी
2) सेलिनिअम, सिलिकॉन
3) जर्मेनिअम
4) वरील सर्व
उत्तर :- 4
1) कँडेला (Candela) हे खालीलपैकी कशाचे एकक आहे.
1) ल्युमिनस इंटेनसिटी (Luminous Intensity)
2) चुंबकीय विकर्षरेषा
3) चुंबकीय क्षेत्र
4) विद्युत प्रभार
उत्तर :- 1
2) ॲल्युमिनीअम, लोखंड, जस्त या धातूंची थंड / उष्ण पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही मात्र
1) वाफेशी अभिक्रिया होऊन ऑक्साईड तयार होते.
2) ऑक्सिजन वायू मुक्त होतो.
3) 2 Al + 3 H2O Al2O3 + H2 ही अभिक्रिया होणार
4) वरील सर्व
उत्तर :- 4
3) खालील विधानांचा विचार करा.
अ) लाल रक्तपेशी या भ्रूणामध्ये यकृतात किंवा प्लिहामध्ये तयार होतात.
ब) लाल रक्तपेशी प्रौढ माणसांत अस्थिमज्जेत तयार होतात.
क) पांढ-या पेशी या अस्थिमज्जा तसेच प्लिहामध्ये तयार होतात.
ड) वरील सर्व विधाने बरोबर आहे.
1) अ, क 2) ड 3) ब, क 4) फक्त अ
उत्तर :- 2
4) खालीलपैकी कोणते मूलभूत एकक MKS, CGS आणि FPS या तिन्ही पध्दतीत सामाईक आहे.
1) मीटर 2) सेकंद 3) ग्रॅम 4) फूट
उत्तर :- 2
5) असे कोणते धातू मूलद्रव्ये आहेत ज्यांची पाणी व वाफ सोबत रासायनिक अभिक्रिया होत नाही.
1) सोने 2) चांदी
3) तांबे 4) वरील सर्व
उत्तर 4
📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌
1) 2018 चा मिस वर्ल्ड चा किताब कोणी जिंकला.
1) वेनेसा पोन्स डी लिऑन
2) निकालेन पिशाना
3) मानुषी छिल्लर
4) मानसी मल्होत्रा
उत्तर :- 1
2) पूर्णपणे भारतीय बनावटीची इंजिनविरहीत ............. ही देशातील सर्वात वेगाने धावणारी ट्रेन ठरली आहे.
1) ट्रेन 18 2) ट्रेन 20
3) ट्रेन 21 4) ट्रेन 25
उत्तर :- 1
3) खालील माहितीचा विचार करा.
अ) राजीव महर्षी यांची भारताच्या नियंत्रक व महालेखापालपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
ब) राजीव महर्षी हे भारताचे 13 वे नियंत्रक व महालेखापाल आहे.
क) भारताचे पहिले नियंत्रक व महालेखापाल व्ही. नरहरी राव होते.
ड) भारताचे संविधानाच्या कलम 148 नुसार नियंत्रक व महालेखापालाची रचना करण्यात आलेली आहे.
1) अ, ब, क बिनचूक
2) अ, क, ड बिनचूक
3) अ, ब, ड बिनचूक
4) अ, ब, क, ड बिनचूक
उत्तर :- 4
4) RBI ने जाहीर केलेल्या अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या देशांकडून भारताला सर्वाधिक (Remittances) प्राप्त होतो.1) UAE 2) USA
3) कतार 4) कुवेत
उत्तर :- 1
5) खालील माहितीचा विचार करा.
अ) मायकेल ॲन्डाटजे यांना जुलै 2018 मध्ये The English Patient या पुस्तकासाठी गोल्ड मॅन बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ब) मॅन बुकर पुरस्काराच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त खास गोल्ड मॅन बुकर पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते.
क) मॅन बुकर पुरस्काराची सुरुवात 1969 पासून झाली.
1) अ सत्य 2) अ, ब सत्य
3) अ, क सत्य 4) अ, ब, क सत्य
उत्तर :- 4
📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌
1) कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात विकास प्रकल्पाची साधनसामुग्री संरक्षण क्षेत्राकडे वळविणे भाग पडले ?
1) पहिली पंचवार्षिक योजना
2) दुसरी पंचवार्षिक योजना
3) तिसरी पंचवार्षिक योजना
4) पाचवी पंचवार्षिक योजना
उत्तर :- 3
2) भारतातील प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये ............... या उद्दिष्टावर भर दिला होता.
1) सहकार व स्वातंत्र्य
2) विकास व तंत्रज्ञान
3) आत्मनिर्भरता व स्वावलंबन
4) बेरोजगारी
उत्तर :- 3
3) पायाभूत व जड उद्योगावर भरीव खर्च व सार्वजनिक क्षेत्र वाढीवर जोर कुठपर्यंत चालू होता ?
1) तिसरी योजना 2) पाचवी योजना
3) आठवी योजना 4) दहावी योजना
उत्तर :- 3
4) दहाव्या पंचवार्षिक योजनेतील उद्देशिय स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचे उद्दिष्टे खालीलपैकी कोणते होते ?
1) 9.00% 2) 8.00%
3) 10.00% 4) 07.00%
उत्तर :- 2
5) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते लक्ष्य निश्चित केले नव्हते?
अ) दारिद्रयात घट
ब) सहकारास प्रोत्साहन
क) वृद्धीदर आणि रोजगारात वाढ
ड) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकण
1) अ फक्त 2) ब फक्त
3) क आणि ड 4) ड आणि अ
उत्तर :- 2
1) जोडया लावा.
अ) मूलभूत अधिकार i) जर्मनीचे वायमर संविधान
ब) निती निर्देशक तत्वे ii) कॅनडाचे संविधान
क) केंद्र सरकारला उर्वरित अधकार iii) आयरिश संविधान
ड) आणीबाणी iv) अमेरिकेचे संविधान
अ ब क ड
1) iv i iii ii
2) iv iii i ii
3) iv iii ii i
4) I iii iv ii
उत्तर :- 3
2) भारतीय संविधानाची वैशिष्टये आणि त्यांच्या स्त्रोतांच्या योग्य जोडया लावा.
अ) एकेरी नागरिकत्व i) ब्रिटीश राज्यघटना
ब) मूलभूत हक्क ii) फ्रान्स राज्यघटना
क) स्वातंत्र्य, समता, बंधुता iii) कॅनेडियन राज्यघटना
ड) उर्वरित अधिकार iv) अमेरिकेची राज्यघटना
अ ब क ड
1) iv iii i ii
2) i iv ii iii
3) iii i iv ii
4) i iii iv ii
उत्तर :- 2
3) राजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या ?
1) बिहार 2) केंद्रीय प्रांत 3) बाँम्बे 4) पंजाब
उत्तर :- 2
4) सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्टयांना संविधानाची पायाभूत वैशिष्टये म्हणून मान्यता दिली आहे. पुढीलपैकी कोणत्या
वैशिष्टयांचा त्यात समावेश होतो ते सांगा .
अ) समतेचे तत्व ब) स्वातंत्र्याचे तत्व क) संघराज्य ड) समाजवादी संरचना
इ) न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार फ) धर्मनिरपेक्षता
1) अ, ब, क, ड, इ, फ 2) अ, क, इ, फ 3) अ, ब, क, ड, फ 4) अ, ब, क, इ, फ
उत्तर :- 2
5) खालील विधानांचा विचार करा.
अ) डॉ. बी.आर. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.
ब) श्री. एच.जे. खांडेकर हे या समितीचे सदस्य होते.
1) ब बरोबर आहे 2) अ बरोबर आहे 3) दोन्ही बरोबर आहेत 4) दोन्ही चूक आहेत
उत्तर :- 2
1) एखाद्या नळीचा अंतर्गत व्यास मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते मापक वापरतात ?
1) मायक्रोमीटर 2) व्हर्निअर कॅलीपर 3) नॅनोमीटर 4) वरीलपैकी नाही
उत्तर :- 2
2) खालीलपैकी कोणत्या धातूची विरल HCl सोबत अभिक्रिया होत नाही.
1) लोखंड 2) जस्त
3) तांबे 4) वरील सर्व
उत्तर :- 3
3) खालीलपैकी कोणता घटक रक्त गोठण्याच्या क्रियेत भाग घेतो.
अ) कॅल्शिअम ब) व्हिटॅमीन क) रक्तपट्टीका ड) फायब्रीनोजीन इ) प्रोथ्रॉम्बीन
1) अ, ड, इ 2) फक्त ड, इ
3) क, ड, इ 4) वरील सर्व
उत्तर :- 4
4) खालीलपैकी संपूर्ण अदिश राशींचा समूह कोणता ?
1) वस्तुमान, घनता, कार्य, उष्णता
2) चाल, संवेग, बल, त्वरण
3) लांबी, वेग, विस्थापन, चाल
4) संवेग, तापमान, उष्णता, ऊर्जा
उत्तर :- 1
5) आम्लारीची धातूंवर अभिक्रिया झाली असता कोणता वायू बाहेर पडतो ?
1) CO2 2) O2
3) H2 4) यापैकी नाही
उत्तर :- 3
1) UNHRC चे पूर्ण रूप काय ?
अ) United Nations Human Right Counsil
ब) United Nations Higher Refugeas Counsil
क) United Nations Human Right Commision
ड) United Nations Human Right Court
1) अ 2) ब 3) क 4) ड
उत्तर :- 1
2) खालीलपैकी अभिनेत्री लालन सारंग बाबत काय खरे आहे.
अ) लालन सारंग यांचे 9 नोव्हेंबर 2018 रोजी वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले.
ब) रंगभूमीवरील बंडखोर अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जायच्या.
क) विजय तेंडूलकर यांच्या सखाराम बाईंडर या नाटकात त्यांनी साकारलेली चंपाची भूमिका वादळी ठरली होती.
ड) त्यांनी 87 व्या मराठी नाटयसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.
1) अ, ब, क 2) अ, क, ड
3) अ, ब, ड 4) अ, ब, क, ड
उत्तर :- 4
3) खालीलपैकी कोणत्या शहरात देशातील पहिले क्रिप्टोकरन्सी ATM सुरू करण्यात आले आहे.
1) मुंबई 2) दिल्ली
3) बेंगळूरू 4) नागपूर
उत्तर :- 3
4) ‘नालसा’ (NALSA) च्या कार्यकारी अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली.
1) न्या. मदन लोकूर 2) तुषार मेहता 3) रवी शर्मा 4) यापैकी नाही
उत्तर :- 1
5) खालीलपैकी कोणाची मालदीवच्या अध्यक्षपदी निवड झाली.
1) इब्राहीम महंमद सोलीह
2) अब्दुल्ला यामीन
3) महंमद नाशीद
4) यापैकी नाही
उत्तर :- 1
1) 12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पायाभूत क्षेत्रामधील अंदाजे गुंतवणूक किती आहे ?
1) 11 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या दुप्पट
2) 11 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या 120%
3) 11 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या 150%
4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 1
2) काही पंचवार्षिक योजनांकरिता विकासाच्या उद्दिष्टांची टक्केवारी व प्रत्यक्षात आत्मसात विकासाची टक्केवारी पुढे दिली आहे.
यातील कोणते विधान चुकीचे आहे ?
उद्दिष्ट प्रत्यक्षात
1) प्रथम योजना (1951 – 56) 2.1 3.6
2) चौथी योजना (1969 – 74) 5.7 2.05
3) आठवी योजना (1992 – 97) 5.6 6.68
4) दहावी योजना (2002 – 2007) 8.0 9.7
उत्तर :- 4
3) खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे ?
1) पहिली पंचवार्षिक योजना = (1951 – 56)
2) तिसरी पंचवार्षिक योजना = (1966 – 71)
3) सहावी पंचवार्षिक योजना = (1980 – 85)
4) दहावी पंचवार्षिक योजना = ( 2002 – 2007)
उत्तर :- 2
4) 12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये (2012 – 17) , नियोजन आयोगाने पायाभूत विकासासाठी अंदाजे रु. 45 लक्ष कोटींची
गुंतवणुकीची तरतूद केली आहे. या गुंतवणुकीपैकी खाजगी गुंतवणुकीची वाटा किती आहे ?
1) कमीत कमी 50% 2) 60%
3) कमीत कमी 45% 4) 75%
उत्तर :- 1
5) खालीलपैकी कोणती अकराव्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट समजता येतील ?
अ) संपूर्ण देशाकरिता सकलदेशीय उत्पादन (GDP) 9% पर्यंत नेणे.
ब) दुर्बल घटकांकरिता अन्न व पौष्टिक आहाराची व्यवस्था करणे.
क) सकल देशी उत्पादन (GDP) 8% पर्यंत नेणे.
ड) दरडोई सकल देशी उत्पादनात (GDP) वार्षिक वृद्धी 7.6% व्हावी.
1) अ, ब, क 2) अ, ड
3) ब, क 4) अ, ब, क, ड
उत्तर :- 2
1) योग्य जोडया लावा.
गती उदाहरण
1) स्थानांतरणीय अ) यात्रेतील फिरणारा पाळणा
2) परिवलन ब) पृथ्वीवरील दिवस – रात्र
3) नियतकालिक क) चालणारी व्यक्ती
4) यादृच्छिक ड) उडणारे फुलपाखरू
इ) सायकलचा ब्रेक
1) 1-क, 2-अ, 3-ब, 4-ड
2) 1-क, 2-ब, 3-अ, 4-ड
3) 1-अ, 2-ब, 3-क, 4-ड
4) 1-क, 2-ब, 3-ड, 4-अ
उत्तर :- 1
2) योग्य पर्याय निवडा.
धातू/अधातू उपयोग
1) पारा अ) लोखंड, कार्बन, निकेल, क्रोमिअम यांचे संमिश्र
2) ग्रॅफाइट ब) लोखंड, कार्बन, यांचे संमिश्र
3) सल्फर क) पेन्सिलीतील शिसे
4) पोलाद ड) औषधे
5) स्टेनलेस स्टील इ) तापमापी
1) 1-इ, 2-क, 3-ड, 4-ब, 5-अ
2) 1-इ, 2-क, 3-ड, 4-अ, 5-ब
3) 1-इ, 2-क, 3-अ, 4-ड, 5-ब
4) 1-इ, 2-क, 3-अ, 4-ब, 5-ड
उत्तर :- 1
3) खालील कोणत्या संघात खुली रक्ताभिसरण संस्था आढळते.
अ) संघ मोलुस्का ब) संघ आर्थोपोडा क) दोन्ही बरोबर ड) दोन्ही चूक
1) अ 2) ब 3) क 4) ड
उत्तर :- 3
4) अ) वेगबदलाच्या दराला त्वरण असे म्हणतात.
ब) हवेचा कुठलाही विरोध नसताना उंचीवरून खाली सोडलेल्या वस्तूचे त्वरण एकसमान त्वरण असे म्हणतात.
क) ऋण त्वरणाला ‘मंदन’ असेही म्हणतात.
वरीलपैकी सत्य विधान/ विधाने कोणती ?
1) फक्त अ 2) फक्त ब
3) फक्त क 4) अ, ब, क
उत्तर :- 4
5) मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षणबाबत योग्य विधान/विधाने ओळखा.
अ) लोखंड, जस्त, तांबे हे मध्यम अभिक्रियाशील धातू आहेत.
ब) हे सल्फाईड किंवा कार्बोनेटच्या रूपात आढळतात.
क) कार्बोनेट मर्यादित हवेमध्ये तीव्रपणे तापवून त्यांचे ऑक्साईडमध्ये रूपांतर कॅल्सिनेशन पध्दतीव्दारे केले जाते.
1) अ, ब बरोबर , क चूक
2) अ, ब, क बरोबर
3) अ, क बरोबर, ब चूक
4) सर्व अयोग्य
उत्तर :- 2
1) योग्य जोडया निवडा.
अ) धवलक्रांतीचे जनक -- वर्गीस कुरीयन
ब) जागतिक हरितक्रांतीचे जनक -- नॉर्मन बोरलाँग
क) भारतीय हरितक्रांतीचे जनक -- डॉ. स्वामीनाथन
ड) महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक -- वसंतराव नाईक
1) अ, क, ड 2) अ, ब, ड
3) अ, ब, क 4) अ, ब, क, ड
उत्तर :- 4
2) ज्यू समुदायाला धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देणारे गुजरात हे कितवे राज्य आहे.
1) पहिले 2) दुसरे
3) तिसरे 4) चौथ्ये
उत्तर :- 3
3) सह्योग HOP TAC – 2018 हा भारताचा कोणत्या देशाबरोबरचा संयुक्त युध्दाभ्यास आहे.
1) व्हिएतनाम 2) ऑस्ट्रेलिया
3) अमेरिका 4) यापैकी नाही
उत्तर :- 1
4) खालील माहितीचा विचार करा.
अ) केनियाची राजधानी नैरोबी येथे पहिल्या शाश्वत निल अर्थव्यवस्था परिषद नोव्हेंबर 2018 मध्ये पार पडली.
ब) या परिषदेचे यजमान पद केनियाने भूषविले.
क) या परिषदेची संकल्पना निला अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासासाठी 2030 अजेंडा अशी होती.
1) अ, क योग्य
2) अ, ब योग्य
3) अ योग्य
4) अ, ब, क योग्य
उत्तर :- 4
5) खालीलपैकी बिनचूक जोडया निवडा. ( 90 वे ऑस्कर पुरस्कार)
अ) सर्वोत्कृष्ट चित्रपट - द शेप ऑफ वाटर
ब) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - त्रिआमो डेलटोरो
क) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - फ्रान्सिस मॅकडोरमंड
ड) सर्वोत्कृष्ट अभिनेता - गॅरी ओल्ड मॅन
1) अ, ब, क 2) अ, ब, क, ड
3) अ, ब, ड 4) अ, क, ड
उत्तर :- 2
1) दहाव्या पंचवार्षिक योजनेत कोणते क्षेत्र ‘गाभा क्षेत्र’ मानण्यात आले ?
अ) औद्योगिक क्षेत्र
ब) शिक्षण क्षेत्र
क) पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा
ड) कृषी क्षेत्र
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
1) अ फक्त 2) अ आणि क
3) ब फक्त 4) ड फक्त
उत्तर :- 4
2) नियोजन आयोगाच्या मतानुसार नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका विशिष्ट मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले
गेले ?
1) सामाजिक न्याय आणि समतेसह विकास
2) सामाजिक न्याय आणि न्यायबुद्धीसह विकास
3) सामाजिक न्याय आणि रोजगारासहीत विकास
4) सामाजिक न्याय आणि आर्थिक समानतेसह विकास
उत्तर :- 2
3) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
अ) अकराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट ‘जलद आणि सर्वसमावेशी वृद्धी’ होते.
ब) अकराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट ‘अधिक आणि संतुलित वृद्धी’ होते.
1) फक्त अ बरोबर
2) फक्त ब बरोबर
3) दोन्ही बरोबर
4) दोन्ही चूक
उत्तर :- 1
4) 12 व्या योजनेच्या संदर्भात पुढील कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) योजनेचा कालावधी : 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017
ब) नियोजनाचे दोन मसुदे, 9 टक्के विकास दर आणि 9.5 टक्के विकास दर विचारात घेऊन ठरविले आहेत.
क) औद्योगिक विकासाचा दर 9.6 टक्के आणि 10.9 टक्के.
ड) शेती उत्पादन वाढीचा दर 5.0 टक्के आणि 5.5 टक्के.
1) फक्त अ आणि ब
2) फक्त क आणि ड
3) वरील सर्व
4) फक्त अ, ब, क
उत्तर :- 4
5) पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?
पहिल्या दहा पंचवार्षिक योजना काळात ठरविलेल्या उद्दिष्टांच्या संदर्भात भारताची अर्थव्यवस्थेची स्थूल आंतरदेशीय उत्पादन
स्वरूपात विकासाची कामगिरी कशी राहीली ?
अ) तिस-या पंचवार्षिक योजनेत सगळयात कमी
ब) दहाव्या पंचवार्षिक योजनेत सगळयात अधिक
1) केवळ अ अयोग्य
2) केवळ ब अयोग्य
3) अ व ब दोन्ही अयोग्य नाहीत
4) अ व ब दोन्ही अयोग्य आहेत
उत्तर :- 4
1) प्लाझ्मा पदार्थाच्या संशोधनासाठी भारत सरकारने ‘राष्ट्रीय प्लाझ्मा संशोधन केंद्र’ कोठे उभारले आहे ?
1) चेन्नई 2) अहमदाबाद
3) मुंबई 4) बेंगळुरू
उत्तर :- 2
2) अधातूचे भौतिक गुणधर्म विचारात घ्या आणि त्यापैकी कोणता गुणधर्म असा आहे ज्याला हिरा अपवाद आहे.
अ) चकाकी नसते ब) विजेचे वहन करत नाहीत
क) कठीणपणा नसतो ड) ठिसूळपणा असतो
1) फक्त क 2) क आणि अ
3) अ, ब, ड 4) यापैकी नाही
उत्तर :- 3
3) गाईच्या शेणावर उगवलेल्या कवकाला काय म्हणतात ?
अ) सेक्सिकॉल्स ब) टेरिकॉल्स क) कार्टिकॉल्स ड) क्रोप्रोफिलस
1) अ 2) ब 3) क 4) ड
उत्तर :- 4
4) विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा.
अ) बोस-आईनस्टाईन कंडनसेट ही पदार्थाची पाचवी अवस्था आहे.
ब) सत्येंद्रनाथ बोस यांच्या स्मरणार्थ ‘बोस’ आणि ‘अल्बर्ट आईनस्टाईन’ यांचे आईनस्टाईन संज्ञा देण्यात आलेल्या आहेत.
क) या अवस्थेच्या शोधाबाबत एरिक कार्नेल, यु.काटर्ले आणि कार्ल वेमेन या अमेरिकी शास्त्रज्ञांना 2001 चे नोबेल पारितोषिक
देण्यात आले.
वरीलपैकी सत्य नसलेले विधान/विधाने कोणती ?
1) अ, क 2) ब, क
3) फक्त क 4) एकही नाही
उत्तर :- 4
5) धातूंची ऑक्सिजनशी अभिक्रिया होऊन ऑक्साईड तयार होतात. मात्र खालीलपैकी असा कोणता धातू आहे. ज्याची
ऑक्सिजनसोबत अभिक्रया होत नाही.
अ) सोने ब) सोडिअम क) सिल्वर ड) मॅग्नेशिअम
1) फक्त अ, क 2) फक्त ब
3) फक्त क 4) यापैकी नाही
उत्तर :-1
📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌
1) मानव विकास निर्देशांक 2018 नुसार प्रथम पाच देशांचा बिनचूक क्रम निवडा.
अ) नॉर्वे, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, जर्मनी
ब) नॉर्वे, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, आयर्लंड
क) नॉर्वे, स्वित्झर्लंड, आयर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया
ड) नॉर्वे, स्वित्झर्लंड, जर्मनी, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया
1) क 2) ब 3) अ 4) ड
उत्तर :- 3
2) खालील माहितीचा विचार करा.
अ) सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयाचे (स्टॅच्यु ऑफ युनिटी) 31 ऑक्टोबर 2018 रोजी लोकार्पण करण्यात आले.
ब) स्टॅच्यु ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.
क) स्टॅच्यु ऑफ युनिटी या पुतळयाची उंची 182 मीटर आहे.
ड) सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते.
1) अ, ब, क बिनचूक
2) अ, क, ड बिनचूक
3) अ, ब, क, ड बिनचूक
4) अ, ब, ड बिनचूक
उत्तर :- 3
3) खालील माहितीचा विचार करा.
अ) 18 ऑगस्ट 2018 रोजी पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून इम्रान खानने शपथ घेतली.
ब) इम्रान खान हे पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे प्रमुख आहे.
क) जुलै 2018 मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूकीत इम्रान खानच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाने 116 जागा
जिंकल्या.
ड) पाकिस्तानच्या संसदेला “मजलिस-ए-शुरा” असे म्हणतात.
1) अ, ब, क, ड योग्य
2) अ, क, ड योग्य
3) अ, ब, ड यो ग्य
4) अ, ब, क योग्य
उत्तर :- 1
4) खालील माहितीचा विचार करा.
अ) प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारतातील डीएनए तंत्रज्ञानाचे जनक लालजी सिंह यांचे डिसेंबर 2017 मध्ये निधन झाले.
ब) लालजी सिंह यांनी बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले होते.
क) भारत सरकारने लालजी सिंह यांना पद्मश्री पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला होता.
1) अ सत्य 2) अ, क सत्य
3) अ, ब सत्य 4) अ, ब, क सत्य
उत्तर :- 4
5) खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी 2018 नोबेल पुरस्कार दिला गेला नाही.
अ) भौतिकशास्त्र ब) शांतता क) अर्थशास्त्र ड) साहित्य
1) अ, ड 2) ड 3) ब 4) क, ड
उत्तर :-2
📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌
1) समतोल प्रादेशिक वाढीसाठी, दहाव्या पंचवार्षिक योजनेतील नवीन उपक्रम म्हणजे :
1) “राष्ट्रीय समान उन्नती योजने” ची स्थापना
2) स्वर्णजयंती स्वरोजगार योजनेअंतर्गत साधनसामग्रींचे हस्तांतर
3) गरीब राज्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन
4) विशेष विभाग उन्नती कार्यक्रम
उत्तर :- 1
2) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
1) औद्योगिकीकरणामुळे भारतात वृद्धीची क्षमता निर्माण झाली.
2) भारतात जागतिकीकरणानंतर औद्योगिक उत्पादन वाढले.
3) दहाव्या पंचवार्षिक योजनाकाळात (2002-2007) औद्योगिक उत्पादनाचा वृद्धीदर जास्त होता.
4) जागतिकीकरणानंतर भारतीय मोठया उद्योगधंद्यांचा विस्तार झाला.
उत्तर :- 3
3) अ) दहाव्या योजनेदरम्यान सरकारच्या भूमिकेची नव्याने व्याख्या केली गेली.
ब) परंतु अकराव्या योजनेत समानता आणि सामाजिक न्याय याच्या खात्रीची गरज यावर भर देण्यात आला, दहाव्या योजनेत
नाही.
1) अ फक्त बरोबर आहे
2) ब फक्त बरोबर आहे
3)अ आणि ब दोन्ही बरोबर आहे
4) अ आणि ब दोन्ही चूक आहेत.
उत्तर :- 1
4) जलद औद्योगिक विकासासाठी आवश्यक औद्योगिकरण साध्य करण्याकरिता अवजड उद्योगांमधील गुंतवणूकीवर भर
देण्याविषयीची रणनीती म्हणजे :
1) गांधी प्रतिमान
2) नव – गांधी प्रतिमान
3) महालनोबिस प्रतिमान
4) मार्क्स प्रतिमान
उत्तर :- 3
5) दहाव्या पंचवार्षिक योजनेच्या तुलनेत अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत कृषि क्षेत्राचा सकल उत्पन्न दर कुठपासून कुठपर्यंत वाढला ?
अ) 2.0% ते 4.0 %
ब) 3.7% ते 4.5%
क) 5.7% ते 8%
ड) वरीलपैकी कुठलाही नाही
1) क 2) ड 3) अ 4) ब
उत्तर :-3
📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌
1) खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरता प्रसिद्ध आहे ?
1) सागेश्वर – सांगली
2) मेळघाट – अमरावती
3) राधानगरी – कोल्हापूर
4) तानसा – ठाणे
उत्तर :- 3
2) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठय प्रमाणात जंगले व प्राणी आहेत ?
1) विदर्भ 2) मराठवाडा
3) कोकण 4) वरील सर्व
उत्तर :- 1
3) महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण ................... आहे.
1) 21% 2) 25%
3) 27% 4) 10%
उत्तर :- 1
4) जोडया लावा.
वन उत्पादने विभाग
अ) तेंदूची पाने i) चंद्रपूर
ब) खैर कात ii) नागपूर, गोंदिया
क) रोशा गवत iii) डहाणू
ड) बांबू गवत iv) गडचिरोली, अमरावती
अ ब क ड
1) ii iii iv i
2) i ii iii iv
3) iii iv i ii
4) iv iii ii i
उत्तर :- 1
5) कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटयांचा काडया बनविण्यास वापरले जाते ?
1) सागवान 2) साल
3) पॉपलर 4) निलगिरी
उत्तर :- 3
📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌
1) कोणत्या राजकीय पक्षाचे सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?
अ) कृषक प्रजा पक्ष
ब) शेडयूलड् कास्टस् फेडरेशन
क) कम्युनिस्ट पक्ष
ड) अपक्ष
1) फक्त अ, क, ड 2) फक्त ब, क, ड 3) फक्त अ, ब, ड 4) फक्त अ, ब, क
उत्तर :- 4
2) खालील विधाने विचारात घ्या :
अ) भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली.
ब) सरदार हुकूम सिंग, के.टी. शाह, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.
क) संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लीम लीगचे सर्व सदस्य हजर होते.
वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?
1) अ आणि ब 2) ब आणि क
3) अ आणि क 4) अ, ब आणि क
उत्तर :- 1
3) सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्टयांना संविधानाची पायाभूत वैशिष्टये म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्या
वैशिष्टयांचा त्यात समावेश होतो ते सांगा ?
अ) समतेचे तत्व ब) न्यायालयीन पुनर्विलोकन
क) संघराज्य ड) सार्वभौमत्व
1) अ, ब, क, ड
2) ब, क, ड
3) अ, ब, क
4) अ, ड, क
उत्तर :- 1
4) भारताच्या संघराज्यात्मक पध्दतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
1) राज्यघटनेत ‘संघराज्य’ हा शब्दप्रयोग कोठेही केलेला नाही.
2) संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही.
3) अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वाचा भंग करतात.
4) राज्यपालाच्या नेमणूकीची पध्दत भारताने अमेरिकन पध्दती प्रमाणे स्वीकारली आहे.
उत्तर :- 4
5) भारतात खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संघराज्य पध्दतीच्या विरोधी आहेत ?
अ) राज्ये अविनाशी नाहीत.
ब) आणीबाणी तरतूदी
क) अखिल भारतीय सेवा
ड) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व
इ) राष्ट्रपतीव्दारे राज्यांचा विधेयकावर नकाराधिकार
1) अ, ब, क, ड 2) ब, क, ड, इ
3) अ, ब, क, इ 4) ब, क, इ
उत्तर :- 3
1) लार्ज हायड्रॉन कोलॉइडर (LHC) हा जगदविख्यात प्रयोग खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या सीमेवर पार पडला ?
1) फ्रान्स आणि स्वित्झर्लंड
2) रुमानिया आणि तुर्की
3) स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रीया
4) फ्रान्स आणि इटली
उत्तर :- 1
2) खालील काही रासायनिक समीकरण दिले आहेत. त्यापैकी अयोग्य समीकरण ओळखा.
1) 2 Zn + O2 2 ZnO
2) 4 Al + O2 4 AlO3
3) K2O + H2O 2 KOH 4) Na2O + H2O 2 NaoH
उत्तर :- 2
3) योग्य पर्याय निवडा.
अ) ग्लोब्युलीन - शरीरात प्रतिद्रव्ये तयार करतात.
ब) अलब्युलीन - शरीरातील पाण्याचा समतोल राखणे.
क) प्रोथ्राँबीन - रक्त गोठयाच्या प्रक्रियेत मदत करणे.
ड) फ्राब्रेनोगेन - सुज आल्यानंतर तिथे स्त्रवणारे रसायन.
1) अ, ब, क 2) अ, ब, ड
3) ब, क, ड 4) अ, ब
उत्तर :- 1
4) 10¼ Fermi म्हणजेच ......
1) 1 मीटर 2) 100 मायक्रॉन
3) 1 अँगस्ट्रॉम युनिट 4) 1 मि. मी.
उत्तर :- 3
5) ‘उभयधर्मी ऑक्साइड’ म्हणजे –
1) जे धातू ऑक्साईड आम्ल व आम्लारी दोन्हीसोबत अभिक्रिया करतात.
2) या अभिक्रियांतून क्षार आणि पाणी तयार होते.
3) Al2O3 हा धातू ऑक्साईड आम्ल व आम्लारी दोन्हीसोबत अभिक्रिया करू शकतो.
4) वरील सर्व
उत्तर :- 4
📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌
1) इस्त्रोचे पहिले ‘अवकाश तंत्रज्ञान उबवण’ केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले.
1) सिक्कीम 2) त्रिपूरा
3) कर्नाटक 4) यापैकी नाही
उत्तर :- 2
2) देशातील हरवलेल्या मुलांना शोधून काढण्यासाठी नुकतेच कोणते ॲप सुरू केले आहे.
1) निर्यात मित्र 2) रियुनाइट
3) प्राप्ती 4) सुखद
उत्तर :- 2
3) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने पहिल्या वित्तीय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली.
अ) सूधा मूर्ती ब) सुधा बालकृष्णन क) सुधा कोहली ड) सुधा चतुर्वेदी
1) ब 2) अ 3) ड 4) क
उत्तर :- 1
4) द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार या दोन्ही पुरस्कारांची सुरुवात केव्हा झाली.
1) 1985, 2002 2) 1988, 2004 3) 1988, 2006 4) 1992, 1961
उत्तर :- 1
5) व्यास सन्मान या पुरस्काराची सुरुवात केव्हा पासून झाली.
1) 1991 2) 1981
3) 1993 4) 1982
उत्तर :- 1
📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌
1) पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे ?
अ) शेतमालाच्या किंमती प्रथम पंचवार्षिक योजना काळात प्रत्यक्षात उतरल्या.
ब) तदनंतर शेतमालाच्या किंमती निरंतर वाढतच गेल्या केवळ 1971-72 वर्ष सोडून
1) केवळ अ 2) केवळ ब
3) कोणतेही नाही 4) दोन्हीही
उत्तर :- 1
2) किमान जीवनमान पुरविण्यासाठी भारतीयांचा भौतिक आणि सांस्कृतिक दर्जा सुधारणे हे .......... शी संबंधित आहे.
1) नेहरू – गांधी प्रतिमान
2) नव – गांधी प्रतिमान
3) नव – गांधी प्रतिमान
4) मार्क्स प्रतिमान
उत्तर :- 2
3) बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ‘उपभोग गरीबी’ चे शिरगणती गुणोत्तर किती टक्क्याने कमी करण्याचे उद्दिष्ट आहे ?
अ) 8 ब) 10 क) 12 ड) 6
1) ड 2) अ 3) ब 4) क
उत्तर :- 3
4) भारताच्या पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांमध्ये वाटपाचा सर्वात जास्त हिस्सा या एका क्षेत्राला मिळाला .
1) कृषी व संबंधित सहायक क्षेत्र
2) वीज
3) सिंचन
4) वाहतूक आणि दळणवळण
उत्तर :- 4
5) सर्व पंचवार्षिक योजनांमध्ये कृषी विकासाच्या व्यूह रचनेत ............... समाविष्ट होते.
अ) कृषी विस्तार सेवा ब) अनुकूल व्यापार शर्ती
क) सिंचन विस्तार ड) संस्थात्मक कर्ज
1) अ, क 2) अ, क आणि ड
3) अ, ब, ड 4) ब, क, ड
उत्तर :- 2
1) खालीलपैकी कोणते एकक ऊर्जेचे एकक नाही ?
1) न्यूटन 2) न्यूटन/ सेकंद
3) न्यूटन/ मिनट 4) यापैकी नाही
उत्तर :- 4
2) कॅल्शिअम हा धातू पाण्यावर तरंगतो कारण,
1) कॅल्शिअमची पाण्याबरोबर अभिक्रिया होत असताना तीव्रता कमी असते.
2) बाहेर पडलेली उष्णता ही हायड्रोजन वायूला पेट घेण्यास पुरेशी नसते.
3) हायड्रोजनचे बुडबुडे पृष्ठभागावर तयार झाल्यामुळे
4) वरील सर्व
उत्तर :- 4
3) योग्य पर्याय निवडा.
अ) झुरळाचे हदय हे तीन कप्प्यांचे असते.
ब) बेडकाचे हदय हे तीन कप्प्यांचे असते.
क) मासे यांचे हदय हे दोन कप्प्यांचे असते.
ड) सापाचे हदय हे दोन कप्प्यांचे असते.
1) अ, ब, क, ड 2) ब, क
3) ब, क, ड 4) फक्त अ, ब, क
उत्तर :- 2
4) खालीलपैकी संपूर्ण सदिश राशींचा समूह कोणता ?
1) बल, संवेग, त्वरण, वेग
2) चाल, वस्तुमान, लांबी, घनता
3) संवेग, तापमान, कार्य, बल
4) कार्य, ऊर्जा, उष्णता, विस्थापन
उत्तर :- 1
5) धातूची विरल HCl आम्लासोबत अभिक्रिया झाली तर धातूचे .............. तयार होतात व H2 मुक्त होतो आणि धातूंची सल्फुरिक
आम्ल सोबत अभिक्रिया होऊन ............... तयार होतात.
वरील दोन्ही रिक्त जागा भरा.
1) क्षार, क्लोराइड्स 2) क्लोराइड्स, क्षार
3) क्षार, पाणी 4) क्लोराइड्स, सल्फेट
उत्तर :- 4
📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌
1) जगातील सर्वांत लांब सागरी पुल कोणत्या देशांत बांधण्यात आला आहे.
1) जर्मनी 2) जपान
3) चीन 4) फ्रान्स
उत्तर :- 3
2) राष्ट्रीय जैवइंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते.
1) गुजरात 2) तामिळनाडू
3) महाराष्ट्र 4) राजस्थान
उत्तर :- 4
3) गायीला राष्ट्रमाता घोषीत करणारे भारतातील पहिले राज्य कोणते.
1) उत्तराखंड 2) उत्तरप्रदेश
3) मध्यप्रदेश 4) महाराष्ट्र
उत्तर :- 1
4) जागतिक शांतता निर्देशांक 2018 नुसार प्रथम स्थानी कोणता देश आहे.
1) आइसलँड 2) न्युझीलँड
3) ऑस्ट्रीया 4) डेन्मार्क
उत्तर :- 1
5) 21 वी राष्ट्रकूल स्पर्धा नुकतीच कोठे पार पडली ?
अ) ऑस्ट्रेलिया ब) स्वीडन क) इंग्लंड ड) स्कॉटलँड
1) ब 2) अ 3) क 4) ड
उत्तर :-. 2
📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌
1) अकराव्या पंचवार्षिक योजना आराखडयाचे शीर्षक ............... हे होते.
1) जलद आणि आर्थिक वृद्धीच्या दिशेने 2) जलद आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धीकडे
3) जलद, अधिक सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाकडे
4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 2
2) आपल्या पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांचे सुरुवातीपासूनचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट म्हणजे
1) समाजवादी समाज रचना निर्माण करणे
2) आर्थिक विषमता कमी करणे
3) विभागीय समतोल
4) औद्योगिकरण
उत्तर :- 1
3) 12 वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते.
1) डॉ. मोन्टेक सिंग अहलुवालिया 2) डॉ. मनमोहन सिंग
3) डॉ. अरविंद सुब्रमणियम
4) डॉ. रघुराम राजन
उत्तर :- 2
4) ही बाराव्या पंचवार्षिक योजनेंची (2012-2017) मुख्य लक्ष्ये आहेत –
अ) वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादन वृध्दी दर 8 टक्के राखणे.
ब) अर्भक मृत्युदर 25 प्रति 1000 पर्यंत खाली प्रमाणे.
क) पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठीची गुंतवणुक स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 9 टक्के पर्यंत वाढविणे.
1) अ फक्त बरोबर आहे
2) ब फक्त बरोबर आहे
3) अ व ब फक्त बरोबर आहे
4) वरील सर्व बरोबर आहेत
उत्तर :- 4
5) आर्थिक बाबी संदर्भातील कॅबिनेट समितीने ............ काळात कृषी विस्तार आणि तंत्रज्ञानवर राष्ट्रीय मिशन अंमलबजावणीस
मान्यता दिली आहे.
1) 9 वी पंचवार्षिक योजनेच्या
2) 10 वी पंचवार्षिक योजनेच्या
3) 11 वी पंचवार्षिक योजनेच्या
4) 12 वी पंचवार्षिक योजनेच्या
उत्तर :- 4
📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌
1) विषुववृत्तीय सदाहरित जंगलासंबधी खालीलपैकी कोणते वैशिष्टय बरोबर आहे ?
अ) अत्यंत दाट आहेत. ब) वार्षिक पानगळ आहे.
क) लाकूड टणक आणि टिकाऊ आहे. ड) एकाच प्रकारच्या वृक्षांची नसतात.
1) फक्त अ 2) फक्त अ, क आणि ड 3) फक्त क 4) फक्त ब आणि क
उत्तर :- 2
2) पुढील कोणते / ती विधान / ने योग्य आहे / त ?
अ) मोहगनी उष्ण कटिबंधीय पानझडी जंगलात आढळतात.
ब) सुंद्री किनारवर्ती जंगलात आढळतात.
1) केवळ अ योग्य 2) केवळ ब योग्य 3) अ व ब दोन्ही योग्य 4) अ व ब दोन्ही अयोग्य
उत्तर :- 2
3) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ) महाराष्ट्रात उष्ण कटिबंधीय दमट पानझडी अरण्ये व उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटी अरण्ये जवळपास सारख्याच क्षेत्रात
आहेत.
ब) वरील दोन्ही एकत्रितपणे परंतु उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यांच्या एक तृतीयांशही क्षेत्रात नाहीत.
1) अ
2) ब
3) दोन्ही
4) एकही नाही
उत्तर :- 1
4) उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यात खालीलपैकी कोणती झाडे आढळतात ?
अ) सागवान ब) सिसम क) अंजन ड) तिवर
इ) हिरडा
1) अ, क, ड, इ 2) क, ड, इ
3) अ, ब, क 4) अ, ब, क, इ
उत्तर :- 3
5) जोडया लावा.
वन्य प्राणी अभयारण्य प्रशासकीय विभाग
अ) फन्साड i) अमरावती
ब) नांदूर – मधमेश्वर ii) कोकण
क) किनवट iii) औरंगाबाद
ड) मेळघाट iv) नाशिक
अ ब क ड
1) ii iv iii i
2) ii iv i iii
3) iv ii iii i
4) i iii iii iv
उत्तर :- 1
1) कोणत्या समित्यांमध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले ?
अ) मूलभूत अधिकार समिती ब) अल्पसंख्यांक उपसमिती
क) सल्लागार समिती ड) राज्ये समिती
1) फक्त अ, ब, क 2) फक्त ब, क, ड 3) फक्त अ, ब, ड 4) फक्त अ, क, ड
उत्तर :- 1
2) भारतीय संघराज्य व्यवस्थेला ‘वाटाघाटीचे संघराज्य’ असे कोणी संबोधले आहे ?
1) के. सी. व्हिअर
2) आयव्हर जेनिंग्ज
3) ग्रॅनव्हिल ऑस्टिन
4) मॉरिस जोन्स
उत्तर :- 4
3) ‘भारत हे संघराज्य आहे’ यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ?
1) एक राज्यघटना
2) व्दिगृही कायदेमंडळ
3) राज्यघटनेची सर्वोच्चता
4) न्यायालयीन पुनर्विलोकन
उत्तर :- 1
4) भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?
1) स्वातंत्र्य 2) समता
3) न्याय 4) बंधुभाव
उत्तर :- 3
5) भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रीकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश 1976 च्या .............
घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला.
1) 44 वी 2) 41 वी
3) 42 वी 4) 46 वी
उत्तर :- 3
1) जेव्हा वस्तूमधील सर्व कणांचे विस्थापन एखाद्या स्थिर बिंदूभोवती अथवा त्या वस्तूच्या अक्षाभोवती वर्तुळाकार कक्षेत होते,
तेव्हा त्या गतीला कोणत्या प्रकारात समाविष्ट कराल ?
1) एकरेषीय गती 2) परिवलन गती
3) यादृच्छिक गती 4) नियतकालिक गती
उत्तर :- 2
2) ॲल्युमिनिअम निष्कर्षणाबाबत खालीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा.
1) बॉक्साइटचे ॲल्युमिनीअममध्ये रूपांतर
2) शुध्द ॲल्युमिनीअमचे विद्युत अपघटनी क्षपण
3) स्टीलच्या टाकीमध्ये विद्युत अपघटन केले जाते
4) ॲल्युमिनीअम हा ॲनोड वर जमा होतो
उत्तर :- 4
3) खालील रक्तपट्टीका, रक्तबिंबीकाबाबत काय खरे आहेत.
अ) यांचा आकार व्दबहिर्वक्र असते. ब) या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात.
क) या अस्थिमज्जा मध्येच तयार होतात. ड) या रक्तपेशी सर्व प्राण्यांत आढळतात.
1) अ, ब, ड 2) अ, ब, क
3) ब, क, ड 4) फक्त ब, क
उत्तर :- 2
4) गटात न बसणारा पर्याय निवडा.
1) लंबकाची गती
2) शिवणयंत्राची सुई
3) उडणा-या पक्ष्यांचे पंख
4) उडते फुलपाखरू
उत्तर :- 4
5) ॲल्युमिनीअम हा मुक्त अवस्थेत आढळत नाही आणि ॲल्युमिनीअमचा मुख्य धातुके बॉक्साइट आहे, तर बॉक्साइटमध्ये
साधारणत: किती टक्के Al2O3 असते.
1) 20 – 50% 2) 30 – 40%
3) 30 – 70% 4) 50 – 70%
उत्तर :- 3
📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌
1) खालील माहितीचा विचार करा.
अ) 21 वी राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा नुकतीच ऑस्ट्रेलिया येथे पार पडली.
ब) 20 व्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा 2014 स्कॉटलँड येथे पार पडल्या होत्या.
क) 22 व्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये इंग्लंड येथे होणार आहे.
1) अ, ब सत्य 2) अ, क सत्य
3) अ सत्य 4) सर्व सत्य
उत्तर :- 4
2) खालीलपैकी कोणते शहर आपले स्वत:चे ब्रँड आणि बोधचिन्ह असलेले भारतातले पहिले शहर ठरले आहे.
1) मुंबई 2) जयपूर
3) दिल्ली 4) बेंगळूरू
उत्तर :- 4
3) आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 पदतालिकांनुसार प्रथम पाच देशांचा योग्य क्रम निवडा.
अ) चीन, जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, उझबेकिस्तान
ब) चीन, जपान, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान, इंडोनेशिया
क) चीन, जपान, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान
ड) चीन, जपान, इंडोनेशिया, उझबेकिस्तान, दक्षिण कोरिया
1) अ 2) ब 3) क 4) ड
उत्तर :- 1
4) 2018 चा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला.
1) रघुनाथ माशेलकर 2) पुष्पा भावे 3) रणजित देसाई 4) राम लक्ष्मण
उत्तर :- 2
5) महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने कौटुंबिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण यासारख्या अन्यायाला बळी पडणा-या
महिल्यांच्या मदतीकरिता कोणत्या नावाची हेल्पलाईन सुरु केली.
1) सुहिता 2) वनिता
3) हेल्प वुमन 4) यापैकी नाही
उत्तर :- 1
📌📌
1) अकराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये सरासरी 4 टक्के अभिवृद्धीच्या उद्देशाने “राष्ट्रीय कृषी विकास
योजना” 2007-08 वर्षामध्ये सुरू करण्यात आली.
अ) या योजनेत कोणत्याही विशिष्ट भागाचा विकास अपेक्षित नाही.
ब) केशरी मोहीम या योजनेत अंतर्भूत नाही.
1) केवळ अ योग्य 2) केवळ ब योग्य 3) दोन्ही योग्य 4) एकही योग्य नाही
उत्तर :- 4
2) जोडया जुळवा.
योजना उद्दिष्टये
अ) पहिली पंचवार्षिक योजना i) जलद औद्योगीकरण
ब) दुसरी पंचवार्षिक योजना ii) जीवनमानाचा दर्जा उंचावणे
क) पाचवी पंचवार्षिक योजना iii) शेतीला प्राधान्य
ड) दहावी पंचवार्षिक योजना iv) गरीबी हटाव
अ ब क ड
1) ii i iii iv
2) iii i iv ii
3) ii iv i iii
4) iii iv i ii
उत्तर :- 2
3) सामाजिक, आर्थिक व लिंग सबलीकरण ही स्त्रियांच्या सबलीकरणाची त्रिसूत्री योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत
स्वीकारण्यात आली ?
1) आठवी योजना 2) नववी योजना
3) दहावी योजना 4) अकरावी योजना
उत्तर :- 3
4) महाराष्ट्र राज्याचा दहाव्या पंचवार्षिक योजनेतील स्थूल उत्पादनातील सरासरी चक्रवाढ वृध्दी दर किती होता ?
1) 8.3 टक्के 2) 8.6 टक्के
3) 8.7 टक्के 4) 8.2 टक्के
उत्तर :- 1
5) पंचवार्षिक नियोजनात ग्रामीण विकासावर विशेष भर देण्यात आला. एका पंचवार्षिक योजनेत एकूण गुंतवणूकीपैकी 43 टक्के
गुंतवणूक एकात्मिक ग्रामीण विकासाकरिता उपलब्ध करून देण्यात आली. कोणत्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ग्रामीण
विकासावर विशेष भर देण्यात आला ?
1) दुसरी पंचवार्षिक योजना
2) पाचवी पंचवार्षिक योजना
3) सहावी पंचवार्षिक योजना
4) अकरावी पंचवार्षिक योजना
उत्तर :- 3
1) महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षाची पाने उन्हाळयात गळून पडतात कारण
1) उन्हाळयात पाऊस पडत नाही.
2) उन्हाळयात तापमान जास्त असते.
3) उन्हाळयात हवामान विषम असते. 4) बाष्पीभवन कमी करण्यास्तव
उत्तर :- 4
2) महाराष्ट्रातील एकूण जंगल क्षेत्रापैकी .........% क्षेत्र राखीव, .........% क्षेत्र संरक्षित व ..........% क्षेत्र अवगीकृत जंगलाखाली
आहे.
1) 5, 11, 84 2) 11, 5, 84
3) 84, 11, 5 4) 85, 5, 10
उत्तर :- 3
3) खालील विधाने पहा.
अ) उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात.
ब) उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांची पाने रुंद असतात.
क) पळस, शिसम, खैर इ. वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनात आढळतात.
1) फक्त अ विधान बरोबर आहे.
2) फक्त ब विधान बरोबर आहे.
3) फक्त क विधान बरोबर नाही.
4) विधान अ, ब आणि क बरोबर नाहीत.
उत्तर :- 3
4) जोडया जुळवा.
अभयारण्य जिल्हा
अ) नरनाळा i) यवतमाळ
ब) टिपेश्वर ii) उस्मानाबाद
क) अनेर iii) अकोला
ड) येडशी रामलींग घाट iv) नंदूरबार
अ ब क ड
1) iii i iv ii
2) ii i iii iv
3) iv ii i iii
4) i iii iv ii
उत्तर :- 1
5) खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ?
1) लातूर 2) मुंबई उपनगर
3) उस्मानाबाद 4) जालना
उत्तर :- 1
1) गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट – 1935 मधील खालील तरतूदी विचारात घ्या :
अ) या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो-इंडियन यांच्यासाठीही स्वतंत्र प्रतिनिधित्व
प्रदान केले.
ब) शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे सोपविले होते.
क) या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणती मंत्री परिषद नियुक्त केली गेली.
1) विधाने अ, ब बरोबर आहेत
2) विधाने ब, क बरोबर आहेत
3) विधाने अ, क बरोबर आहेत
4) विधाने अ, ब, क बरोबर आहेत
उत्तर :- 3
2) 1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते
विधान बरोबर नाही ?
1) सभा पूर्णत: सार्वभौम संस्था बनली.2) सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली.
3) सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली.
4) मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली.
उत्तर :- 3
3) संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते.
1) डॉ. बी. आर. आंबेडकर
2) जे. बी. कृपलानी
3) सरदार वल्लभभाई पटेल
4) जवाहरलाल नेहरू
उत्तर :- 3
4) घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली.
1) आयर्लंड 2) यु. के.
3) यु. एस्. ए. 4) ऑस्ट्रेलिया
उत्तर :- 3
5) 42 व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे :
1) सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य
2) सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य
3) सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य 4) प्रजासत्ताक गणराज्य
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment