Tuesday, 29 September 2020

भारत आणि जपान या देशांच्या नौदलांची द्विपक्षीय सागरी कवायती-JIMEX 20


- भारत आणि जपान या देशांच्या नौदलांदरम्यान ‘JIMEX 20’ नामक द्विपक्षीय सागरी कवायती


◾️कालावधी- 

26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 


◾️ ठिकाण- उत्तर अरबी समुद्रात आयोजित करण्यात आली.


◾️ठळक बाबी


- ‘JIMEX’ या द्विपक्षीय सागरी कवायतीची ही चौथी आवृत्ती आहे. 


-हा कार्यक्रम दोन्ही नौदलांमधला सहकार्य आणि परस्पर विश्वास वाढवण्यास आणि दोन्ही देशांमधले मैत्रीचे दीर्घकाळचे संबंध दृढ करण्यास मदत करणार आहे.


- रिअर अ‍ॅडमिरल कृष्णा स्वामीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलाकडून स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार केलेले विनाशक ‘चेन्नई’ जहाज, ‘तरकश’ लढाऊ जहाज, ‘दीपक’ फ्लीट टँकर यांचा सहभाग आहे.


-  जहाजांव्यतिरिक्त P8I हे सागरी गस्त विमान, एकात्मिक हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमाने कवायतीत सहभागी होणार आहेत.


- सागरी सहकार्यावर लक्ष केंद्रीत करुन भारतीय नौदल आणि जपान मेरीटाइम सेल्फ-डिफेन्स फोर्स (JMSDF) यांच्या ‘JIMEX’ कवायती 2012 सालापासून आयोजित केली जात आहे.


- ‘JIMEX 20’ यामध्ये सागरी मोहीमांची व्याप्ती, मोठ्या प्रमाणात प्रगत कवायती कौशल्याच्या माध्यमातून उच्च प्रतिची आंतर-कार्यप्रणाली आणि संयुक्त मोहीम कौशल्यांचे प्रदर्शन सादर करण्यात येणार आहे.


- बहु-आयामी व्युहात्मक कवायती यात शस्त्रास्त्र गोळीबार, क्रॉस डेक हेलिकॉप्टर ऑपरेशन्स आणि जटील पृष्ठभाग, पाणबुडीरोधक आणि हवाई युद्ध अभ्यासातून दोन्ही नौदलांदरम्यानचा एकत्रित समन्वय अधिक बळकट होणार.


◾️जपान देश


- जपान हा पूर्व आशियामधला एक द्वीप-देश आहे. तसेच हा औद्योगिक दृष्ट्या जगातील अत्यंत पुढारलेल्या देशांपैकी एक आहे. 


- जपानच्या पश्चिमेला जपानी समुद्र, चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया व रशिया, उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र व दक्षिणेला पूर्व चीन समुद्र व तैवान आहेत.


-  जपानच्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला “उगवत्या सूर्याचा देश” असे संबोधण्यात येते. टोकियो ही जपानची राष्ट्रीय राजधानी आहे आणि जपानी येन हे राष्ट्रीय चलन आहे.


- आशिया खंडाच्या पूर्व किनाऱ्यालगत, तैवान बेट आणि कूरील बेटे यांच्या दरम्यान लहानमोठ्या बेटाच्या तीन चंद्रकोरी मालिका तयार झाल्या आहेत. यांनाच पुष्कळ वेळा ‘तोरण बेटे’ म्हणून संबोधण्यात येते. 


- या तोरण बेटांत होन्शू, क्युशू, शिकोकू व होक्कायडो या चार मोठ्या व इतर 3400 बेटांचा समावेश होतो. ही सर्व बेटे मिळूनच जपान देश झाला आहे.

---------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...