Tuesday, 15 September 2020

संयुक्त राष्ट्रात चीनला झटका; भारताला मिळालं ‘ECOSOC’चं सदस्यत्व



🔶संयुक्त राष्ट्रात चीनला पुन्हा एकदा झटका लागला आहे. चीनवर मात करत आर्थिक आणि सामाजिक परिषद (ECOSOC) ची संस्था ‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन’ या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली. भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती.

🔶“प्रतिष्ठीत ECOSOC चं सदस्यत्व भारतानं मिळवलं आहे. भारताची कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनच्या (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. आमच्या सर्व प्रयत्नांमधील समानता आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं महत्त्वपूर्ण समर्थन देतो. आम्ही सदस्य देशांना समर्थन दिल्याबद्दल धन्यवाद देतो,” अशी प्रतिक्रिया टीएस. तिरूमूर्ती यांनी दिली. त्यांनी यासंदर्भात ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.

🔶भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती. यामध्ये भारत आणि अफगाणिस्ताननं ५४ सदस्यांच्या मताद्वारे विजय मिळवला. यामध्ये चीनला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. चीनला या प्रक्रियेत अर्धीदेखील मतं मिळाली नाहीत. बीजिंग कॉन्फरन्स ऑन वुमनचं (१९९५) यावर्षी २५ वं वर्ष आहे. असं असतानाही चीनला भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...