🔰कद्रीय अर्थ व कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते 9 सप्टेंबर 2020 रोजी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांकडून दिल्या जाणाऱ्या ‘डोअरस्टेप बँकिंग’ सेवेचे उद्घाटन केले. तसेच याप्रसंगी EASE बँकिंग सुधारणा निर्देशांकानुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांचा सत्कार देखील करण्यात आला.
🔰सार्वजनिक बँकांची ‘डोअरस्टेप बँकिंग’ सेवा.EASE सुधारणांचा एक भाग म्हणून, कॉल सेंटर, संकेतस्थळ किंवा मोबाइल ॲपच्या सार्वत्रिक ‘टच पॉइंट’ यांच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या दारात बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ‘डोअरस्टेप बँकिंग’ सेवेची कल्पना मांडण्यात आली आहे.
🔰या सुविधांच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या सेवा विनंतीचा मागोवा घेता येणार.या सेवा देशभरातल्या 100 केंद्रांवर निवडलेल्या सेवा पुरवठादारांद्वारे नियुक्त केलेल्या ‘डोअरस्टेप बँकिंग’ एजंटद्वारे सादर केल्या जाणार.
🔰या सेवा सार्वजनिक क्षेत्रातली बँकांच्या ग्राहकांना नाममात्र शुल्कात घेता येणार. या सेवेचा फायदा सर्व ग्राहकांना, विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना होणार.
🔴EASE बँकिंग सुधारणा निर्देशांक...
🔰EASE (Enhanced Access and Service Excellence) उपक्रमाचा उद्देश स्वच्छ आणि स्मार्ट बँकिंग संस्थात्मकीकरण करणे आहे.
🔰जानेवारी 2018 मध्ये याचा शुभारंभ करण्यात आला. EASE 2.0 मधील सुधारणा कृती मुद्दयांचा उद्देश सुधारणा प्रवास अपरिवर्तनीय बनवणे, प्रक्रिया आणि प्रणाली मजबूत करणे आणि याचे परिणाम दाखवणे हा आहे.
🔰EASE बँकिंग सुधारणा निर्देशांक किंवा EASE 2.0 निर्देशांक यामध्ये ‘सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बँका’ श्रेणीत अव्वल तीन स्थानावर असलेल्या बँका (अनुक्रमे) - बँक ऑफ बडोदा, भारतीय स्टेट बँक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स.
🔰‘सर्वोत्तम प्रगती करणारा बँका’ श्रेणीत अव्वल तीन स्थानावर असलेल्या बँका (अनुक्रमे) - बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि कॉर्पोरेशन बँक.
🔰‘निवडक संकल्पनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँका’ श्रेणीत अव्वल तीन स्थानावर असलेल्या बँका (अनुक्रमे) - पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँक.
No comments:
Post a Comment