Friday, 11 September 2020

DRDO कडून हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी.



🔰ओदिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर सोमवारी भारताने स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेतली.

🔰या स्वदेशी टेक्नोलॉजीमुळे हवेत ध्वनिच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगाने (माच 6) लक्ष्याच्या दिशेने झेपावणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे.

🔰हायपरसॉनिक टेस्ट डेमॉनस्ट्रेटर व्हेइकलची (HSTDV) ही चाचणी होती.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने हे व्हेइकल विकसित केले आहे. सकाळी 11 वाजून तीन मिनिटांची चाचणी करण्यात आली. त्यासाठी अग्नि मिसाइलचा बूस्टर म्हणून वापर  करण्यात आला.

🔰या क्षेपणास्त्राचा वेग प्रति सेकंद दोन किलोमीटरपेक्षा जास्त असेल.
डीआरडीओचे प्रमुख सतीश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हायपरसोनिक मिसाइल टीमने ही चाचणी केली. HSTDV चाचणीचे सर्व निकष पूर्ण केले.

No comments:

Post a Comment