आपल्या शरीरात रक्ताचे अभिसरण करतात. आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांची लांबी सुमारे 97 हजार किमी असते. रक्तवाहिन्यांचे तीन मुख्य प्रकार पडतात.
१) धमन्या (Arteries)
२) शिरा (Veins)
३) केशिका (Capillaries).
१) धमन्या (Arteries) :
हृदयाकडून ऑक्सिजनयुक्त रक्ताचे वहन करतात. अपवाद – फुफ्फुसधमनी (Pulmonary Artery)भित्तिका जाड असून कमी लवचिक असतात.
शरीरात खोलवर स्थित असतात व झडपा नसतात.रक्तदाब खूप जास्त म्हणजेच 100 mm Hg एवढा असतो.
महाधमनी – धमन्या – धमनिका
२) शिरा (Veins) :
उतींकडून कार्बन डायॉकसाईड युक्त रक्ताचे वहन हृदयाकडे करतात.
अपवाद – फुफ्फुसशिरा (Pulmonary Veins)
भित्तिका पातळ असून जास्त लवचिक असतात.शरीरात त्वचेखाली स्थित असतात व झडपा असतात.रक्तदाब खूप कमी म्हणजेच 2 mm Hg एवढा असतो.महाशिरा -शिरा – शिरिका.
३) केशिका (Capillaries) :
धमनिका आणि शिरिका यांच्या पेशीतील जाळ्याला केशिका असे म्हणतात.
केशिका अत्यंत बारीक, एकस्तरीय असून भित्तिका पातळ असतात.
केशिकांमुळे पेशींमध्ये पोषद्रव्ये, ऑक्सिजन,कार्बन डायॉकसाईड, विकरे, संप्रेरके तसेच टाकाऊ पदार्थांची देवाण – घेवाण घडून येते.
No comments:
Post a Comment