Sunday, 20 September 2020

दिल्ली विधानसभा समितीकडून फेसबुकच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला समन्स.

☑️दिल्ली विधानसभेच्या एका समितीनं द्वेषमूलक मजकूरप्रकरणी फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांना समन्स बजावले असून १५ सप्टेंबरला समितीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडिया मंच या संघटनेकडून देशात द्वेषमूलक मजकूराचे प्रसारण रोखण्यात फेसबुककडून आवश्यक पावलं न उचलल्याबद्दलच्या तक्रारींवरुन समितीनं हा निर्णय घेतला आहे.


☑️समितीनं शनिवारी निवेदनाद्वारे म्हटलं की, “हे समन्स प्रमुख साक्षीदारांनी दिलेला जबाब आणि त्यांनी नोंदवलेली आक्षेपार्ह माहिती सादर केल्यानंतर बजावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” दिल्ली विधानसभेच्या शांतात आणि सौहार्द समितीद्वारे हे समन्स वॉलस्ट्रीट जर्नलच्या त्या बातमीनंतर बजावण्यात आले आहे. ज्यामध्ये हा दावा करण्यात आला आहे की, फेसबुकच्या भारतातील अधिकाऱ्याने तेलंगणातील भाजपाच्या एका नेत्यावर बंदी घालण्यापासून रोखले होते. या भाजापा नेत्यानं कथित स्वरुपात जातीयवादी आणि चिथावणी देणारी पोस्ट शेअर केली होती.


☑️दिल्ली विधानसभेच्या उपसचिवांनी १० सप्टेंबर रोजी पाठवलेल्या नोटीशीत म्हटलं आहे की, “आम्ही तुम्हाला (अजित मोहन) विधानसभा परिसरात समितीसमोर १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता हजर राहण्याचा आदेश देत आहोत. यावेळी मोहन यांचा शपथपत्रावर जबाब नोंदवण्यात येणार आहे, तसेच समितीद्वारे करण्यात येत असलेल्या चौकशीत त्यांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...