🔰अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून राज्यातील करोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर कमी होण्यास मदत होत आहे. करोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर कमी करण्यासाठी टेली आयसीयू संपूर्ण राज्यात सुरू करण्याचा विचार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
🔰सोलापूर, जालना आणि औरंगाबाद येथे टेली आयसीयूच्या ऑनलाइन लोकार्पणप्रसंगी टोपे बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त एन. रामस्वामी, आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालक डॉ. साधना तायडे, मेड स्केप इंडियाच्या संस्थापक आणि ‘वुई डॉक्टर कॅम्पेन’च्या डॉ. सुनीता दुबे, सीआयआय फाउंडेशनचे बी. थायगाराजन, डॉ. संदीप दिवाण, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, औरंगाबाद आणि जालन्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, आयसीयू प्रमुख यांची ऑनलाइन उपस्थिती होती.
🔰टोपे म्हणाले, ‘मेड स्केप इंडिया’च्या मदतीने राज्यात सहा ठिकाणी टेली आयसीयू सुरू आहेत. त्याचे काम उत्कृष्ट सुरू आहे. टेली आयसीयूद्वारे करोनाच्या काळात रुग्णांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळत आहे. त्याचा अत्यवस्थ रुग्णांना लाभ होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून संपूर्ण राज्यात टेली आयसीयू सुरू करण्याचा विचार आहे.
🔰टली आयसीयू हे नवीन तंत्रज्ञान आहे, यामुळे आणखी प्रशिक्षणाची गरज आहे. करोना रुग्णांना इतर औषधे दिली जात आहेत. टेली आयसीयूमुळे कोणत्याही प्रकारच्या रुग्णांना सर्वोत्तम डॉक्टरचा सल्ला घेता येतोय, ग्रामीण भागात याचा उपयोग झाला पाहिजे. यात आणखी काही सुधारणा अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment